Home Bibles ईयोब 37:14 · मराठी बायबल
ईयोब 37:14 · मराठी बायबल

“ईयोब, एक क्षणभर थांब आणि लक्ष दे. थांब आणि देव ज्या अद्भुत गोष्टी करतो त्यांचा विचार कर.

Cross references

निर्गम 14:13

परंतु मोशेने उत्तर दिले, “भिऊ नका! स्थित उभे राहा आणि परमेश्वर आज तुम्हाला वाचवील ते पाहा. आजच्या दिवसानंतर हे मिसरचे लोक तुम्हाला पुन्हा कधीही दिसणार नाहीत.

ईयोब 26:6

परंतु देव मृत्युलोकात स्वच्छपणे बघू शकतो. मृत्यु देवापासून लपून राहात नाही.

ईयोब 36:24

“देवाने जे काही केले त्याबद्दल नेहमी त्याची स्तुती करायची आठवण ठेव. लोकांनी देवाच्या स्तुतीवर अनेक गाणी रचली आहेत.

स्तोत्रसंहिता 46:10

देव म्हणतो, “शांत राहा आणि मी देव आहे हे लक्षात घ्या. मी राष्ट्रांचा पराभव करतो व जगाला ताब्यात ठेवतो.”

स्तोत्रसंहिता 111:2

परमेश्वर अद्भुत गोष्टी करतो देवाकडून येणाऱ्या चांगल्या गोष्टीलोकांना हव्या असतात.

स्तोत्रसंहिता 145:5

तुझे राजवैभव आणि तेज अद्भुत आहे. मी तुझ्या अद्भुत चमत्काराबद्दल सांगेन.

स्तोत्रसंहिता 145:10

परमेश्वरा, तू ज्या गोष्टी करतोस त्यामुळे तुला गौरव प्राप्त होतो. तुझे भक्त तुला धन्यवाद देतात.

उपदेशक 7:13

देवाने केलेल्या गोष्टी पाहा. एखादी गोष्ट चुकीची आहे असे तुम्हाला वाटले तरी तुम्ही ती बदलू शकत नाही.

हबक्कूक 2:20

पण परमेश्वर वेगळा आहे. परमेश्वर त्याच्या पवित्र मंदिरात आहे. म्हणूनच सर्व पृथ्वीवर शांतता असावी व सर्वानीच परमेश्वराचा मान राखावा.

Interlinear

Choose Theme