परंतु देव मृत्युलोकात स्वच्छपणे बघू शकतो. मृत्यु देवापासून लपून राहात नाही.
Cross references
त्याचं शहाणपण स्वर्गाच्या उंचीइतकं आहे, तू काय करु शकतोस? ते मृत्यूच्या ठिकाणापेक्षा शेओलपेक्षा खोल आहे. तू काय जाणू शकतोस?
मृत्यू आणि विनाशम्हणतात, ‘आम्हाला शहाणपण सापडले नाही. आम्ही त्याबद्दलच्या फक्त अफवाच ऐकल्या आहेत.’
लैंगिक पाप माझ्या सर्वस्वाचा नाश करील. सर्वस्वाचा होम करणारी ती आग आहे.
मी (देव) कुणाचाही देणेकरी नाही. या नभोमंडळाखाली जे जे आहे ते सर्व माझे आहे.
परमेश्वरा, तू मृतांसाठी चमत्कार करतोस का? भुते उठून तुझी स्तुती करतात का? नाही.
परमेश्वरा, मी जर स्वर्गात गेलो तर तिथे तू असतोस मी जर खाली मृत्यूलोकात गेलो तर तिथे ही तू असतोस.
परमेश्वरा, कदाचित् मी तुझ्यापासून लपण्याचा प्रयत्न करीन आणि म्हणेन, “दिवस रात्रीत बदलला आहे आणि आता काळोख मला खरोखरच लपवेल.”
परमेश्वराला सर्व माहीत असते. मृत्युलोकांत काय घडते ते देखील त्याला माहीत असते. म्हणून लोकांच्या मनात आणि हृदयात काय चालले आहे ते परमेश्वराला नक्कीच ठाऊक असेल.
राजा, तू येणार म्हणून अधोलोकात खळबळ उडाली आहे. पृथ्वीवरच्या नेत्यांच्या आत्म्यांना, तू येणार म्हणून जागे करीत आहे, सिंहासनावरून त्यांना उठवीत आहे, ते तुझ्या आगमनाची तयारी करतील.
त्यांनी जमिनीत खोल खणले, मी त्यांना तेथून ओढून काढीन. ते आकाशात उंच गेले, तरी मी त्यांना तेथून खाली आणीन.
आणि कोणतीही अशी निर्मित गोष्ट नाही की जी त्याच्यापासून लपलेली आहे आणि ज्याच्यापाशी आम्हांला सर्व गोष्टींचा हिशेब द्यावयाचा आहे. त्याच्यासमोर सर्व गोष्टी उघड व स्वष्ट अशा आहेत.