आणि त्यांनी काय चूक केली ते देव त्यांना सांगेल. देव त्यांना सांगेल की त्यांनी पाप केले आहे. देव त्यांना ते गर्विष्ठ होते असे सांगेल.
Cross references
“तुमच्यामुळे परमेश्वराचा माझ्यावर कोप झाला व त्याने निश्चयाने सांगितले की मी यार्देन नदीपलीकडे पाऊल ठेवू शकणार नाही. परमेश्वराने तुम्हाला दिलेल्या ज्या सुपीक भूमीत तुम्ही प्रवेश करणार आहात, तेथे मला मज्जाव आहे.
तेव्हा अश्शूरच्या राजाच्या सेनापतीकरवी परमेश्वराने यहूदावर हल्ला केला. या सेनापतींनी मनश्शेला आकड्यांनी जखडून पकडले. त्याच्या हातात पितळी बेड्या ठोकल्या. अशा रितीने मनश्शेला कैद करुन त्यांनी बाबेलला नेले.
त्याने देवाची प्रार्थना केली व मदतीसाठी याचना केली. मनश्शेचा धावा ऐकून परमेश्वराला त्याची दया आली. म्हणून त्याला पुन्हा यरुशलेमला आणून परमेश्वराने त्याला गादीवर बसवले. परमेश्वर हाच खरा देव आहे हे तेव्हा मनश्शेला पटले.
मी देवाला म्हणेन, ‘मला दोष देऊ नकोस. मी काय चूक केली आहे ते मला सांग. माझ्याविरुध्द तुझ्या मनात काय आहे?
का? कारण दुष्ट मनुष्य देवाची आज्ञा मानायला तयार नसतो. तो त्याच्या मुठी देवासमोर नाचवतो. तो सर्वशक्तिमान देवाचा पराभव करायचा प्रयत्न करतो.
देवा, तू त्यांना शिक्षा कर. त्यांना त्यांच्याच सापळ्यात अडकू दे. ते लोक तुझ्याविरुध्द गेले आहेत. म्हणून तू त्यांना त्यांच्या असंख्य गुन्ह्यांबद्दल शिक्षा कर.
परमेश्वर ज्या माणसाला शिस्त लावेल तो सुखी होईल. देव त्या माणसाल जगण्याचा योग्यमार्ग शिकवेल.
ख सोसण्यापूर्वी मी बऱ्याच चुकीच्या गोष्टी केल्या परंतु आता मी तुझ्या आज्ञा काळजी पूर्वक पाळतो.
ख सोसले ते चांगले झाले. त्यामुळेच मला तुझे नियम समजले.
का? कारण आम्ही देवाविरूध्द वागून खूप खूप पापे केली. आपली पापे आम्ही चुकलो ते दाखवितात. ह्या गोष्टी करून आम्ही अपराध केला हे आम्हाला माहीत आहे.
एखाद्याच्या पापांबद्दल परमेश्वराने त्याला शिक्षा केल्यास तो माणूस तक्रार करू शकत नाही.
तो किती वाईट होता. हे त्याचे त्यालाच कळेल व तो माझ्याकडे परत येईल. पूर्वीप्रमाणे वाईट गोष्टी तो करणार नाही. मग तो जगेल. तो मरणार नाही.”
नंतर तो शुद्धीवर आला आणि म्हणाला, “माझ्या पित्याच्या घरी किती तरी मजुरांना पुरुन उरेल इतके अन्न आहे आणि येथे मी भुकेने मरतो आहे!
पापे वाढवण्यासाठी म्हणून नियमशास्त्राचा प्रवेश झाला. परंतु जेथे पाप वाढले तेथे देवाची कृपाही विपुल झाली.
प्रभूकडून आमचा न्याय केला जातो तेव्हा आम्हांला शिस्त लावण्यात येते, यासाठी की, जगातील इतर लोकांबरोबर आम्हांलाही शिक्षा होऊ नये.
एक विश्वासनीय वचन आहे जे स्वीकारावयास पूर्णपणे योग्य आहे. येशू ख्रिस्त पाप्यांना तारावयास या जगात आला. मी त्या पाप्यातील पहिला आहे.