ईयोब 30:18 · मराठी बायबल
देवाने माझ्या कोटाची कॉलर खेचून माझे कपडे आकारहीन केले आहेत.
Cross references
ईयोब 2:7
मग सैतान परमेश्वराकडून निघाला. त्याने ईयोबाला ठणकणारी गळवे दिली. ईयोबच्या सर्वांगावर तळव्यापासून डोक्यापर्यंत गळवे होती.
ईयोब 7:5
माझे शरीर किड्यांनी आणि घार्णीनी भरलेले आहे. माझी कातडी सोलवटलेली आणि वाहत्या जखमांनी भरलेली आहे.
ईयोब 19:20
“मी इतका कृश झालो आहे की माझी कातडी हाडांवर लोबंते. आता माझ्यात जिवंतपणाचा मागमुसही उरलेला नाही.
स्तोत्रसंहिता 38:5
मी मूर्खपणा केला आता मला दुर्गंधीयुक्त जखमांनी पछाडले आहे.
यशया 1:5
देव म्हणतो, “मला तुम्हाला सतत शिक्षा का करावी लागावी? मी तुम्हाला शिक्षा केली तरी तुम्ही सुधारत नाही. तुम्ही माझ्याविरूध्द बंड करीतच राहता. सध्या प्रत्येकाचे डोके व हृदय कमकुवत झाले आहे.