मग सैतान परमेश्वराकडून निघाला. त्याने ईयोबाला ठणकणारी गळवे दिली. ईयोबच्या सर्वांगावर तळव्यापासून डोक्यापर्यंत गळवे होती.
Cross references
त्या राखेचा धुरळा बनेल व तो सगव्व्या मिसरभर पसरेल आणि त्याच्या स्पर्शाने माणसांना व गुरांना फोड येऊन गव्ववे होतील.”
“परमेश्वराने पूर्वी मिसरच्या लोकांना गळवांनी पीडित केले तसेच तो यावेळी तुम्हाला करील. गळवे, वाहणारी खरुज, सतत कंड सुटणारा नायटा अशा गोष्टींनी तो तुम्हांला शासन करील.
तुमच्या गुडघ्यांवर, पायांवर, पावलांपासून डोक्यापर्यंत सर्व शरीरावर ठसठसणारी बरी न होणारी गळवे उठतील. अशा रीतीने परमेश्वर तुम्हाला शासन करील.
परमेश्वर त्याला म्हणाला, ‘तू अहाबची फसगत कशी करशील?’ यावर तो देवदूत म्हणाला, ‘मी अहाबच्या संदेष्ट्यांमध्ये गोंधळ माजवून देईन. त्यांना मी राजाशी खोटे बोलायला प्रवृत्त करीन संदेष्टे राजाला सांगतील ते खोटे असेल.’ यावर परमेश्वर म्हणाला, ‘हे चांगले झाले जा आणि अहाब राजाला या मोहात पाड तुला यश येईन.”‘
पण जर तू त्याच्या जवळ जे काही आहे त्या सगळ्यावर आघात केलास तर तो तुझ्या तोंडावर तुझी निंदा करील हे मी खात्रीपूर्वक सांगतो.”
माझे शरीर किड्यांनी आणि घार्णीनी भरलेले आहे. माझी कातडी सोलवटलेली आणि वाहत्या जखमांनी भरलेली आहे.
माझी सगळी हाडे रात्री दुखतात. वेदना मला कुरतडणे थांबवत नाहीत.
माझी कातडी काळी पडली आहे आणि शरीर तापाने फणफणले आहे.
तुमच्या पायापासून डोक्यापर्यंत शरीराच्या प्रत्येक अवयवावर जखमा, घाव व वाहते व्रण आहेत. त्या वाहत्या व्रणीची तुम्ही काळजी घेतली नाही. तुमच्या जखमा तेल सोडून नरम केल्या नाहीत आणि त्यावर पट्टीही बांधली नाही.
माझा प्रभु सीयोनच्या स्त्रियांच्या डोक्यांत व्रण करील. त्यांचे सर्व केस गळून पडतील.
लोकांनी स्वर्गाच्या देवाला शाप दिले. कारण त्यांना वेदना होत होत्या व फोड आलेहोते. पण लोकांनी आपल्या पापकृत्यांपासून पश्चात्ताप करण्याचे नाकारले.