Home Bibles ईयोब 21:2 · मराठी बायबल
ईयोब 21:2 · मराठी बायबल

“मी काय म्हणतो ते ऐक. माझे सांत्वन करण्याची ती तुझी पध्दत असू दे.

Cross references

शास्ते 9:7

हे वर्तमान योथामने ऐकले तेव्हा तो गेला आणि गरिज्जीम डोंगरावर उभा राहून मोठयाने लोकांशी बोलू लागला.“शखेम नगरातील अधिकाऱ्यांनो ऐका. मग परमेश्वरही तुमचे ऐकेले.”

ईयोब 13:3

परंतु मला तुझ्याशी वाद घालायचा नाही. मला सर्वशक्तीमान देवाशी बोलायचे आहे. मला देवाबरोबर माझ्या संकटांविषयी बोलायचे आहे.

ईयोब 13:6

“आता माझ्या युक्तिवादाकडे लक्ष द्या मी काय म्हणतो ते ऐका.

ईयोब 13:17

मी काय म्हणतो ते लक्षपूर्वक ऐका. मला नीट सांगू द्या.

ईयोब 15:11

देव तुझे सांत्वन करतो पण ते तुला पुरेसे वाटत नाही. देवाचा निरोप आम्ही तुला अगदी हळुवारपणे दिला आहे.

ईयोब 16:2

“या सर्व गोष्टी मी पूर्वी ऐकल्या आहेत. तुम्ही तिघे जण मला त्रास देता, आराम नव्हे.

ईयोब 18:2

“ईयोब, तू बोलणे केव्हा बंद करणार आहेस? शांत राहा आणि लक्ष दे. आम्हाला काही बोलू दे.

ईयोब 33:1

“ईयोब, आता माझ्याकडे लक्ष दे. मी काय म्हणतो ते लक्षपूर्वक ऐक.

ईयोब 33:31

“ईयोब, मी काय म्हणतो त्याकडे लक्ष दे. माझे ऐक! तू गप्प रहा आणि मला बोलू दे.

ईयोब 34:2

शहाण्या माणसांनो मी काय सांगतो ते ऐका. हुशार माणसांनो, माझ्याकडे लक्ष द्या.

यशया 55:2

जे खरोखरचे ‘अन्न’ नाही त्यासाठी पैसे वाया का घालविता? तुम्हाला ज्यापासून समाधान मिळत नाही असे काम तुम्ही का करता? माझे लक्षपूर्वक ऐका म्हणजे तुम्हाला चांगले अन्न मिळेल. तुमच्या जीवाला तृप्ती देणाऱ्या अन्नाचा आनंद तुम्हाला मिळेल.

इब्री लोकांस 2:1

त्यासाठी ज्या सत्याविषयी आपण ऐकलेले आहे त्याकडे आपण अधिक काळजीपूर्वक लक्ष दिले पाहिजे. यासाठी की, आपण त्यातून निसटून जाऊ नये.

Interlinear

Choose Theme