देव नेत्यांना मूर्ख बनवतो. तो त्यांना वाळवंटात इकडे तिकडे मार्गहीन भटकायला लावतो.
Cross references
देव विश्र्वासू उपदेशकांना गप्प बसवतो आणि वृध्दांची विद्वत्ता काढून घेतो.
“तू माझ्या मित्रांच्या मनाची कवाडे बंद करुन टाकलीस आणि आता त्यांना काही कळत नाही. कृपा करुन तू त्यांना विजयी होऊ देऊ नकोस.
ते दुष्ट लोक शाप देतात आणि खोटे बोलतात. ते ज्या गोष्टी बोलले त्याबद्दल त्यांना शिक्षा कर. त्यांचा अंहकार त्यांना सापळ्यात अडकवू दे.
त्यांतले काही वाळवंटात फिरले. ते राहाण्यासाठी जागा शोधत होते पण त्यांना शहर सापडले नाही.
देवाने त्यांच्या प्रमुखाला लज्जित केले आणि ओशाळवाणे वाटायला लावले आणि त्याला खाली पाहायला लावले. देवाने त्यांना रस्ते नसलेल्या वाळवंटातून हिंडायला लावले.
नंतर परमेश्वर म्हणाला, “जा आणि ह्या लोकांना सांग: ‘काळजीपूर्वक ऐका पण समजून घेऊ नका. काळजीपूर्वक पाहा पण शिकू नका.’
मिसरबद्दल शोक संदेश पाहा, परमेश्वर, जलद गतीने जाणाऱ्या मेघावर आरूढ होऊन येत आहे. देव मिसरमध्ये प्रवेश करील आणि तेथील खोटे देव भीतीने थरथर कापू लागतील. मिसर खरा धैर्यवान होता पण त्याचे धैर्य गरम मेणाप्रमाणे वितळून जाईल.
त्या वृक्षाची पाने सुंदर होती. त्याला पुष्कळ चांगली फळे आली होती. त्या वृक्षापासून प्रत्येकाला भरपूर अन्न मिळत होते. वन्य प्राण्यांना त्या वृक्षाच्या छायेत आसरा मिळत होता, तर पक्षी फांद्यांवर राहात होते. प्रत्येकाला वृक्षापासून भक्ष्य मिळत होते.
मी झोपलो असताना, दृष्टान्तात हे सर्व पाहात होतो. मग मी पवित्र देवदूताला स्वर्गातून खाली येताना पाहिले.
तो वृक्ष ह्यापुढे माणसाप्रमाणे विचार करणार नाही. मानव-हदयाऐवची त्याला पशुहदय मिळेल अशा रीतीने त्याला सात पावसाळे (सात वर्षे) काढावे लागतील.
ह्या गोष्टी ताबडतोब घडल्या नबुखद्नेस्सरला सक्तीने लोकांपासून दूर जावे लागले. त्यायाला गुरांप्रमाणे गवत खावे लागले. तो दवात भिजला. त्याचे केस गरूडाच्या पिसांप्रमाणे लांब वाढले,व नखे पक्ष्याच्या नखांप्रमाणे वाढली.
म्हणजेच एफ्राईम मूर्ख पारव्याप्रमाणे बेअक्कल झाला आहे. लोकांनी मदतीसाठी मिसरला हाक मारली. ते मदत मागायला अश्शूरकडे गेले.