परमेश्वर हा इस्राएलच्या लोकांचा देव आहे. सर्वशक्तिमान परमेश्वर असे म्हणतो ‘तुमची जगण्याची पद्धत बदला आणि सत्कृत्ये करा. तुम्ही असे केल्यास मी तुम्हाला या ठिकाणी राहू देईन
Cross references
आता देवासमोर आपले अपराध कबूल करा. आपल्या पूर्वजांच्या देवाची आज्ञा तुम्ही पाळली पाहिजे. तुमच्या मध्ये राहणारे लोक आणि आपल्या परक्या बायका यांच्यापासून वेगळे व्हा.”
माणसाने जर त्याची पापे लपवायचा प्रयत्न केला तर तो कधीही याशस्वी होणार नाही. पण जर त्याने त्याच्या पापांची कबुली दिली आणि लोकांना सांगितले की त्याचे चुकले तर देव आणि इतर लोक त्याला दया दाखवतील.
“शुचिर्भूत व्हा. स्वच्छ व्हा. तुमची दुष्कृत्ये थांबवा. मला वाईट गोष्टी बघायच्या नाहीत. चुकीचे वागू नका.
“तुम्ही माझे म्हणणे ऐकाल तर ह्या देशातील चांगल्या वस्तू तुम्हाल प्राप्त होतील.
दुष्टांनी दुष्टपणाने जगणे थांबवावे. त्यांनी वाईट विचार सोडून द्यावे. त्यांनी परमेश्वराला शरण यावे. मग परमेश्वर त्यांचे दु:ख हलके करील. आमचा देव क्षमाशील आहे म्हणून त्यांनी परमेश्वराला शरण जावे.
परमेश्वर पुढील गोष्टी सांगतो: “चौकात उभे राहा आणि पाहा. जुना रस्ता कोणता ते विचारा. चांगल्या रस्त्याची चौकशी करा व चांगल्या रस्त्यावरुन चाला. तुम्ही असे केल्यास तुमचा तुम्हाला विश्वास सापडेल. पण तुम्ही लोक म्हणाला आहात की, ‘आम्ही चांगल्या रस्त्यावरुन चालणार नाही.’
तुम्ही तुमचा जीवनमार्ग बदललात आणि सत्कृत्ये केलीत तर मी तुम्हाला येथे राहू देईन. तुम्ही एकमेकांशी प्रामाणिक असले पाहिजे.
“तुम्ही जर ही आज्ञा पाळलीत, तर दावीदाच्या सिंहासनावर बसणारे राजे यरुशलेमच्या प्रदेशद्वारांतून येतील. ते रथांतून आणि घोड्यावरुन येतील. यहूदाचे आणि यरुशलेमचे नेते त्यांच्याबरोबर असतील. यरुशलेममध्ये लोक कायमचे वास्तव्य करतील.
“म्हणून, यिर्मया, यरुशलेम आणि यहूदा येथे राहणाऱ्या लोकांना सांग की परमेश्वर असे म्हणतो: ‘आताच्या आता तुमच्यावर संकटे आणण्याची मी तयारी करीत आहे. मी तुमच्याविरुद्ध बेत आखत आहे. तेव्हा तुम्ही पापे करण्याचे थांबवा. प्रत्येकाने बदलावे व सत्कृत्ये करावीत.”
तुम्ही तुमची वागणूक बदला. तुम्ही सत्कृत्ये करायला सुरवात केलीच पाहिजे. तुम्ही परमेश्वराचे, तुमच्या देवाचे ऐकलेच पाहिजे. तुम्ही असे वागलात, तर परमेश्वराचे हृदयपरिवर्तन होईल. त्याने सांगितलेल्या वाईट गोष्टी तो करणार नाही.
इस्राएल आणि यहूदा येथील लोकांकडे मी माझे सेवक-संदेष्टे पाठविले. मी त्यांना तुमच्याकडे पुन्हा पुन्हा पाठविले. ते संदेष्टे म्हणाले ‘इस्राएल आणि यहूदा येथील प्रत्येक माणसाने दुष्कृत्ये करणे बंद करावे. तुम्ही चांगलेच असले पाहिजे. दुसऱ्या दैवतांना अनुसरु नका. त्यांची पूजा वा सेवा करु नका. तुम्ही माझे ऐकलेत, तर तुमच्या पूर्वजांना व तुम्हाला दिलेल्या देशात तुम्ही राहाल.’ पण तुम्ही माझ्या संदेशाकडे लक्ष दिले नाही.
योनादाबच्या वंशजांनी त्यांच्या पूर्वजांनी दिलेल्या आज्ञा पाळल्या. पण यहूदाच्या लोकांनी माझेही ऐकले नाही.”
का? इस्राएलच्या लोकांनो, प्रत्येक माणसाच्या कर्माप्रमाणे मी त्या माणसाचा न्यायनिवाडा करतो.” परमेश्वर, माझा प्रभू, असे म्हणाला,“म्हणून माझ्याकडे परत या. वाईट गोष्टी करण्याचे सोडून द्या. त्या भयंकर गोष्टींना, (मूर्तींना) तुम्हास पाप करण्यास, प्रवृत्त करु देऊ नका.
जर लोकांनी तुतारीचा आवाज ऐकूनही त्याकडे दुर्लक्ष केले, तर शत्रू त्यांना पकडतील व कैदी म्हणून घेऊन जातील. अशा वेळी मृत्यूला ज्याचा तोच जबाबदार असेल.
म्हणून पश्चात्तापास योग्य अशी फळे द्या.
देवाजवळ या, आणि तो तुमच्याजवळ येईल. पाप्यांनो, तुमचे हात स्वच्छ करा. आणि तुमची अंत:करणे शुद्ध करा, जे तुम्ही द्विबुद्धीचे आहात.