Home Bibles यिर्मया 35:16 · मराठी बायबल
यिर्मया 35:16 · मराठी बायबल

योनादाबच्या वंशजांनी त्यांच्या पूर्वजांनी दिलेल्या आज्ञा पाळल्या. पण यहूदाच्या लोकांनी माझेही ऐकले नाही.”

Cross references

यशया 1:3

गाय आपल्या मालकाला ओळखते. गाढवालासुध्दा, आपला मालक आपल्याला कोठे खायला देणार ते, कळते. पण इस्राएल लोक मला जाणत नाहीत. माझ्या लोकांना काही समजत नाही.”

यिर्मया 7:3

परमेश्वर हा इस्राएलच्या लोकांचा देव आहे. सर्वशक्तिमान परमेश्वर असे म्हणतो ‘तुमची जगण्याची पद्धत बदला आणि सत्कृत्ये करा. तुम्ही असे केल्यास मी तुम्हाला या ठिकाणी राहू देईन

यिर्मया 35:14

“रेखाबचा मुलगा योनादाब याने आपल्या मुलांना मद्य ‘पिऊ नका’ असे सांगितले आणि त्यांनी त्याचे ऐकले. आजपर्यंत त्यांच्या वंशजांनी आपल्या पूर्वजांच्या आज्ञेचे पालन केले. त्यांनी मद्य घेतले नाही. पण मी परमेश्वराने स्वत: तुम्हाला पुन्हा पुन्हा संदेश दिले, तरी यहूदाच्या लोकांनो, तुम्ही माझे ऐकले नाही.

मलाखी 1:6

सर्वशक्तिमान परमेश्वर म्हणाला, “मुले वडिलांना मान देतात. सेवक मालकांना मान देतात. मी तुमचा पिता आहे, मग तुम्ही माझा आदर का करीत नाही? मी तुमचा प्रभू आहे, मग मला तुम्ही मान का देत नाही? याजकांनो, तुम्ही माझ्या नावाचा मान राखत नाही.”उलट तुम्ही म्हणता “आम्ही तुझ्या नावाचा मान राखत नाही, असे तुला वाटावे असे आम्ही काय केले आहे?”

मत्तय 11:28

जे थकलेले व ओझ्याने लादलेले असे सर्व तुम्ही मजकडे या आणि मी तुम्हांला विश्रांति देईन.

लूक 15:11

मग येशू म्हणाला, “एका मनुष्याला दोन मुलगे होते.

लूक 15:28

मोठा मुलगा रागावला त्याला आत जाण्याची इच्छा होईना. तेव्हा वडिलांनी येऊन त्याची समजूत काढली.

Interlinear

Choose Theme