सारया ह्या अधिकाऱ्याला यिर्मयाने पुढील संदेश दिला. सारया नेरीयाचा मुलगा होय व नेरीया हा मासेयाचा मुलगा होय. यहूदाचा राजा सिद्कीया ह्याच्याबरोबर सारया, सिद्कीयाच्या कारकिर्दीच्या चौथ्या वर्षी, बाबेलला गेला. त्याच वेळी, सारयाला यिर्मयाने संदेश दिला.
Cross references
आमच्या पूर्वजांच्या वागणुकीने देवाचा कोप ओढवला. तेव्हा परमेश्वराने त्यांना बाबेलचा राजा नबुखद्नेस्सर याच्या हाती दिले. नबुखद्नेस्सराने मंदिराचा विध्वंस केला आणि लोकांना जबरदस्तीने कैद करुन बाबेलला नेले.
यहूदाचा राजा सिद्कीया याच्या कारकिर्दींच्या चौथ्या वर्षाच्या पाचव्या महिन्यातहनन्या हा संदेष्टा माझ्याशी बोलला. हनन्या हा अज्जूरचा मुलगा होता. तो गिबोन गावचा रहिवासी होता. परमेश्वराच्या मंदिरात तो माझ्याशी बोलला. तेव्हा याजक व इतर सर्व लोक तेथे उपस्थित होते. हनन्या म्हणाला,
त्या बारुखला दिल्या, बारुख हा नरीयाचा व नरीया हा महसेयाचा मुलगा होता. मोहोरबंद खरेदीखतात खरेदीच्या सर्व शर्ती नमूद केलेल्या होत्या. माझा चुलत भाऊ हानामेल व इतर साक्षीदार तेथे असतानाच मी खरेदीखत बारुखला दिले. त्यावर इतर साक्षीदारांनीही सह्या केल्या. ते खरेदीखत मी बारुखला देताना चौकात बसलेल्या यहूदाच्या पुष्कळ लोकांनी पाहिले.
मग यिर्ययाने बारुख नावाच्या माणसाला बोलाविले. बारुख नेरीयाचा मुलगा होता. यिर्मयाने, त्याला परमेश्वराकडून आलेले संदेश, सांगितले व ते बारुखने पटावर लिहून काढले.
यहोयाकीम हा योशीयाचा मुलगा होता. यहोयाकीम यहूदावर राज्य करीत असताना, त्याच्या कारकिर्दीच्या चौथ्या वर्षी यिर्मया या संदेष्ट्याने नेरीयाचा मुलगा बारुख यास पुढील गोष्टी सांगितल्या. बारुखने त्या पटावर लिहिल्या, यिर्मयाने बारुखला सांगितलेल्या गोष्टी पुढीलप्रमाणे होत्या.
सिद्कीया त्याच्या वयाच्या 21व्या वर्षी यहूदाचा राजा झाला. त्याने 11 वर्षे यरुशलेमवर राज्य केले. त्याच्या आईचे नाव हमूटल. ती यिर्मयाची मुलगी होती. तिचे घराणे लिब्ना येथील होते.