Home Bibles यिर्मया 45:1 · मराठी बायबल
यिर्मया 45:1 · मराठी बायबल

यहोयाकीम हा योशीयाचा मुलगा होता. यहोयाकीम यहूदावर राज्य करीत असताना, त्याच्या कारकिर्दीच्या चौथ्या वर्षी यिर्मया या संदेष्ट्याने नेरीयाचा मुलगा बारुख यास पुढील गोष्टी सांगितल्या. बारुखने त्या पटावर लिहिल्या, यिर्मयाने बारुखला सांगितलेल्या गोष्टी पुढीलप्रमाणे होत्या.

Cross references

2 इतिहास 36:5

यहोयाकीम पंचविसाव्या वर्षी यहूदाचा राजा झाला. त्याने यरुशलेममध्ये अकरा वर्षे राज्य केले. यहोयाकीमने परमेश्वर देवाच्या दृष्टीने वाईट गोष्टी केल्या. त्याने परमेश्वर देवा विरुध्द पाप केले.

यिर्मया 25:1

यहूदातील सर्व लोकांबद्दल यिर्मयाला मिळालेला देवाचा संदेश असा आहे. यहोयाकीम राजाच्या कारकिर्दीच्या चौथ्या वर्षीहा संदेश आला. यहोयाकीम योशीयाचा मुलगा होता. यहोयाकीम राजाच्या कारकिर्दींचे चौथे वर्ष हे बाबेलचा राजा नबुखद्नेस्सर ह्याच्या कारकिर्दीचे पाहिलेच वर्ष होते.

यिर्मया 26:1

यहूदाचा राजा यहोयाकीम ह्याच्या कारकिर्दीच्या पाहिल्याच वर्षी परमेश्वराकडून हा संदेश आला. यहोयकीम हा योशीया राजाचा मुलगा होता.

यिर्मया 32:12

त्या बारुखला दिल्या, बारुख हा नरीयाचा व नरीया हा महसेयाचा मुलगा होता. मोहोरबंद खरेदीखतात खरेदीच्या सर्व शर्ती नमूद केलेल्या होत्या. माझा चुलत भाऊ हानामेल व इतर साक्षीदार तेथे असतानाच मी खरेदीखत बारुखला दिले. त्यावर इतर साक्षीदारांनीही सह्या केल्या. ते खरेदीखत मी बारुखला देताना चौकात बसलेल्या यहूदाच्या पुष्कळ लोकांनी पाहिले.

यिर्मया 32:16

“नरीयाचा मुलगा बारुख ह्याला खरेदीखत दिल्यावर मी परमेश्वराची प्रार्थना केली. मी म्हणालो,

यिर्मया 36:1

यिर्मयाला परमेश्वराचा संदेश आला. योशीयाचा मुलगा यहोयाकीम हा यहूदाचा राजा असताना त्याच्या कारकिर्दीच्या चौथ्या वर्षी यिर्मयाला परमेश्वराचा हा संदेश मिळाला. तो असा होता.

यिर्मया 36:2

“यिर्मया, मोठा पट घे आणि मी तुला दिलेले सर्व संदेश त्यावर लिही. यहूदा, इस्राएल आणि इतर राष्ट्रे ह्यांच्याविषयी मी तुला सांगितले आहे. योशीयाच्या कारकिर्दीपासून आतापर्यंत मी तुला सांगितलेले सर्व लिही.

यिर्मया 36:4

मग यिर्ययाने बारुख नावाच्या माणसाला बोलाविले. बारुख नेरीयाचा मुलगा होता. यिर्मयाने, त्याला परमेश्वराकडून आलेले संदेश, सांगितले व ते बारुखने पटावर लिहून काढले.

यिर्मया 36:8

नेरीयाचा मुलगा बारुख याने, यिर्मयाने त्याला सांगितले होते त्याप्रमाणे केले. परमेश्वराचे संदेश लिहिलेला पट बारुखने मोठ्याने वाचला. तो त्याने परमेश्वराच्या मंदिरात वाचला.

यिर्मया 36:14

मग त्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी यहूदी नावाच्या माणसाला बारुखकडे पाठविले. यहूदी नथन्याचा व नथन्या शलेम्याचा मुलगा होता. शलेम्याच्या वडिलांचे नाव कुशी. यहूदी बारुखला म्हणाला, “ज्या पटावरुन तू वाचलेस तो घेऊन माझ्याबरोबर चल.”नेरीयाचा मुलगा बारुख याने पट घेतला व तो यहूदीबरोबर अधिकाऱ्यांकडे गेला.

यिर्मया 36:26

यहोयाकीम राजाने लेखनिक बारुख व संदेष्ट यिर्मया यांना अटक करण्याचा काही लोकांना हूकूम दिला. ते लोक म्हणजे राजपुत्र यमेल, अरहज्रीएलचा मुलगा सराया व अब्देलचा मुलगा शलेम्या हे होत, पण त्यांना बारुख व यिर्मया सापडले नाहीत कारण त्यांना देवाने लपविले होते.

यिर्मया 36:32

मग यिर्मयाने दुसरा पट घेतला व तो नेरियाचा मुलगा बारुख या लेखनिकाला दिला. यिर्मयाने सांगितले आणि बारुखने या पटावर लिहिले. या दुसऱ्या पटावरील संदेश, यहूदाचा राजा यहोयाकीम ह्याने जाळलेल्या पटावरील संदेशाप्रमाणेच होते. पण ह्या दुसऱ्या पटात त्या संदेशा बरोबरच त्या संदेशातील शब्दांप्रमाणे आणखी पुष्कळ शब्दांची भर घातलेली होती.

यिर्मया 43:3

“यिर्मया, नेरीयाचा मुलगा बारुख तुला आमच्याविरुद्ध भडकावीत आहे असे आम्हाला वाटते. आम्हाला खास्द्यांच्या हाती देण्याची त्याची इच्छा आहे त्यांनी आम्हाला मारावे अथवा कैदी म्हणून बाबेलला न्यावे म्हणून तो तुझ्यामार्फत असे सांगत आहे.”

Interlinear

Choose Theme