बाबेलविरुद्ध लढण्यासाठी राष्ट्रांची सिद्धता करा. मेद्यांच्या राजांना सज्ज करा. त्यांच्या अधिपतींना आणि अधिकाऱ्यांना लढण्यासाठी तयार करा. बाबेलच्या अंमलाखालच्या सर्व देशांना बाबेलच्या विरुद्ध लढण्यास सिद्ध करा.
Cross references
याफेथाचे मुलगे; गोमर, मागोग, मादय, यावान, तुबाल, मेशेख व तीरास हे होते.
गोमर, मागोग, मादय, यावान, तुबाल, मेशेख, तीरास
आपल्या कारकिर्दीच्या तिसऱ्या वर्षी त्याने आपले प्रधान आणि अधिकारी यांना मेजवानी दिली. पारस आणि मेदय या प्रांतांमधले सैन्याधिकारी आणि महत्वाचे कारभारीही त्या ठिकाणी होते.
आणि अहश्वेरोशने जे पराक्रम केले ते पारस आणि मेदय राजांच्या इतिहासाच्या पुस्तकात लिहिले आहेत. मर्दखयने केलेल्या इतर गोष्टीही या इतिहासग्रंथांमध्ये लिहिलेल्या आहेत. राजाने मर्दखयला महत्पदावर नेले.
देव म्हणतो, “पाहा! बाबेलोनवर हल्ला करण्यासाठी मी मेदीचे सैन्य वापरीन. मेदीच्या सैन्याला चांदी, सोने दिले तरी ते हल्ला करीतच राहील.
काहीतरी भयंकर घडणार असल्याचा दृष्टान्त मला होत आहे. विश्वासघातकी तुझ्याविरूध्द जाताना मला दिसत आहे. लोक तुझी संपत्ती लुटून नेताना मी पाहतोय, एलाम, जा आणि लोकांवर चढाई कर. मादया, शहराला वेढा घाल आणि त्याचा पाडाव कर. त्या शहरातील सर्व दुष्कृत्ये मी नाहीशी करीन.
जिमरी, एलाम व मेदी येथील सर्व राजांना मी द्राक्षरस पाजला.
बाण धारदार करा! ढाली घ्या. परमेश्वराला मेद्यांच्या राजाकडून बाबेल नष्ट करायचे होते, म्हणून त्याने त्यांना स्फूर्ती दिली. बाबेलच्या लोकांना योग्य अशी शिक्षा परमेश्वर करील. बाबेलच्या सैन्याने यरुशलेममधील परमेश्वराचे मंदिर उध्वस्त केले. त्याबद्दल परमेश्वर त्यांना यथायोग्य शिक्षा करील.
“देशात युद्धाचे निशाण उभारा! सर्व राष्ट्रांमध्ये कर्णा फुंका. बाबेलविरुद्ध लढण्यासाठी राष्ट्रांना सज्ज करा. अरारात, मिन्नी, आष्कनाज या राज्यांना बाबेलवर चढाई करण्यासाठी बोलवा. तिच्याविरुद्ध लढणाऱ्या सैन्याच्या सेनापतीची निवड करा. टोळधाडीप्रमाणे घोडे पाठवा.
उफारसीन: तुझे राज्य तुझ्याकडून काढून घेण्यात येत आहे. त्याचे विभाजन होईल व ते मेदी व पारसी यांच्यात विभागले जाईल.”
सर्व राज्याचा कारभार करण्यासाठी 120 प्रांताधिकारी (सत्रप) नेमल्यास चांगले होईल असा विचार दारयावेशाने केला.
तेव्हा राजा आताच्या आता हुकूम लिहून त्याच्यावर शिक्कामोर्तब कर. म्हणजे तो कोणीही बदलू शकणार नाही का? कारण मेदी का पारसी यांचे कायदे रद्द होऊ शकत नाहीत किवा बदलूही शकत नाहीत.”
मी वर पाहिले तर मला एक मेंढा त्या नदीकाठी उभा असलेला दिसला. त्याला दोन लांब शिंगे होती. पण एक दुसऱ्यापेक्षा अधिक लांब होते, जास्त लांब शिंग दुसऱ्यापेक्षा काहीसे मागे होते.
“तू दोन शिंगे असलेला मेंढा पाहिलास. ती शिंगे म्हणजेच मेदय व पारस ही राज्ये होत.
दारयावेश राजाच्या कारकिर्दोच्या पहिल्या वर्षातच ह्या गोष्टी घडल्या. दारयावेश हा अहश्वेरोशाचा मुलगा होता. तो मेदी वंशातील होता. तो बाबेलचा राजा झाला.