Home Bibles दानीएल 8:3 · मराठी बायबल
दानीएल 8:3 · मराठी बायबल

मी वर पाहिले तर मला एक मेंढा त्या नदीकाठी उभा असलेला दिसला. त्याला दोन लांब शिंगे होती. पण एक दुसऱ्यापेक्षा अधिक लांब होते, जास्त लांब शिंग दुसऱ्यापेक्षा काहीसे मागे होते.

Cross references

गणना 24:2

बलामने वाळवंटाच्या कडे पाहिले आणि त्याला इस्राएलचे सगळे लोक दिसले. त्यांनी आपापल्या भागात आपापल्या गंटासह तळ दिला होता. नंतर देवाचा आत्मा बलामावर आला.

यहोशवा 5:13

यरीहोजवळ असताना यहोशवाने समोर पाहिले तर एक माणूस पुढे उभा असलेला त्याला दिसला. त्या माणसाच्या हातात तलवार होती. यहोशवाने पुढे होऊन त्याला विचारले, “तू आमच्या बाजूचा आहेस की शत्रूच्या गोटातील?”

1 इतिहास 21:16

दावीदाने वर पाहिले तेव्हा त्याला परमेश्वराचा दूत आकाशात उभा असलेला दिसला. त्याने आपली तलवार यरुशलेम नगरावर उपसलेली होती. दावीद आणि पुढाऱ्यांनी नम्रपणे वाकून अभिवादन केले. या सर्वांनी दुखववड्याच्या वेळी घालतात तसे शोक प्रदर्शित करणारे कपडे घातलेले होते.

एज्रा 1:2

पारसचा राजा कोरेश म्हणतो:“स्वर्गातील देव परमेश्वर याने पृथ्वीवरील सर्व राज्ये मला दिली आहेत; यहूदातील यरुशलेम येथे त्याचे मंदिर बांधण्यासाठी त्याने मला निवडले.

एज्रा 4:5

यहूद्यांचा मंदिर बांधावयाचा संकल्प सिध्दीला जाऊ नये म्हणून विरोधकांनी पैसे चारुन मंत्र्यांना फितवले. त्या मंत्र्यांनी यहूद्यांचा मंदिर बांधण्याचा बेत बंद पाडण्यासाठी सतत कारस्थाने केली. पारसाच्या कोरेश राजाची कारकीर्द संपून दरायावेश राजा सत्तेवर येईपर्यंत असेच चालले.

एस्तेर 1:3

आपल्या कारकिर्दीच्या तिसऱ्या वर्षी त्याने आपले प्रधान आणि अधिकारी यांना मेजवानी दिली. पारस आणि मेदय या प्रांतांमधले सैन्याधिकारी आणि महत्वाचे कारभारीही त्या ठिकाणी होते.

यशया 13:17

देव म्हणतो, “पाहा! बाबेलोनवर हल्ला करण्यासाठी मी मेदीचे सैन्य वापरीन. मेदीच्या सैन्याला चांदी, सोने दिले तरी ते हल्ला करीतच राहील.

यशया 21:2

काहीतरी भयंकर घडणार असल्याचा दृष्टान्त मला होत आहे. विश्वासघातकी तुझ्याविरूध्द जाताना मला दिसत आहे. लोक तुझी संपत्ती लुटून नेताना मी पाहतोय, एलाम, जा आणि लोकांवर चढाई कर. मादया, शहराला वेढा घाल आणि त्याचा पाडाव कर. त्या शहरातील सर्व दुष्कृत्ये मी नाहीशी करीन.

यशया 44:28

परमेश्वर कोरेशला म्हणतो, “तू माझा मेंढपाळ आहेस. मला पाहिजे ते तू करशील. तू यरूशलेमला म्हणशील, ‘तुझी पुनर्बांधणी केली जाईल. ‘तू मंदिराला सांगशील, ‘तुझा पाया परत घातला जाईल.”‘

यिर्मया 51:11

बाण धारदार करा! ढाली घ्या. परमेश्वराला मेद्यांच्या राजाकडून बाबेल नष्ट करायचे होते, म्हणून त्याने त्यांना स्फूर्ती दिली. बाबेलच्या लोकांना योग्य अशी शिक्षा परमेश्वर करील. बाबेलच्या सैन्याने यरुशलेममधील परमेश्वराचे मंदिर उध्वस्त केले. त्याबद्दल परमेश्वर त्यांना यथायोग्य शिक्षा करील.

दानीएल 2:39

तुझ्यानंतर येणारे राज्य म्हणजेच पुतव्व्याचा चांदीचा भाग, हे राज्य तुझ्या राज्याएवढे श्रेष्ठ नसेल. नंतर, तिसरे राज्य पृथ्वीवर सत्ता गाजवेल हा काशाचा भाग होय.

दानीएल 5:31

आणि दारयावेश नावाचा बासष्ट वर्षे वयाचा मेदी नवा राजा झाला.

दानीएल 6:28

अशारीतीने राजा दारयावेश व पारसी राजा कोरेश या दोघांच्याही कारकिर्दोत दानीएल यशस्वी झाला.

दानीएल 7:5

“मग मी माझ्यासमोर दुसरा प्राणी पाहिला. तो अस्वलासारखा दिसत होता. तो त्याच्या एका अंगाने उचलला गेला होता. त्याच्या तोंडात त्याच्या दातांच्यामध्ये तीन फासव्व्या होत्या, “ऊठ आणि तुला पाहिजे तिकडे मांस खा” असे त्याला सांगितले गेले.

दानीएल 8:20

“तू दोन शिंगे असलेला मेंढा पाहिलास. ती शिंगे म्हणजेच मेदय व पारस ही राज्ये होत.

दानीएल 10:5

मी वर पाहिले, तर माझ्यासमोर एक माणूस उभा होता. त्याने तागाचे कपडे घातले होते उफाजमधील सोन्याचा कमरपट्टा त्याने बांधला होता.

जखऱ्या 1:18

मग मी वर बघितले असता मला चार शिंगे दिसली.

जखऱ्या 2:1

मग मी नजर वर वळविली, तेव्हा मला मोजमापाची दोरी घेतलेला एक माणूस दिसला.

जखऱ्या 5:1

मी पुन्हा वरती पाहिले आणि मला एक उडता पट दिसला.

जखऱ्या 5:5

मग माझ्याशी बोलणारा देवदूत बाहेर गेला. तो म्हणाला, “हे बघ! तुला काय येताना दिसतेय?”

जखऱ्या 5:9

नंतर मी वर पाहिले, तर मला करकोच्यासारखे पंख असलेल्या दोन स्त्रिया दिसल्या. त्या उडाल्या आणि पंखांनी वारा कापत त्यांनी ती बादली उचलली ती बादली घेऊन त्या उडू लागल्या.

जखऱ्या 6:1

मग मी वळून बघितले तेव्हा दोन जस्ताच्या पर्वतांतून चार रथ जाताना दिसले.

Interlinear

Choose Theme