Home Bibles यिर्मया 4:28 · मराठी बायबल
यिर्मया 4:28 · मराठी बायबल

म्हणून देशातील लोक मृतांसाठी शोक करतील. आकाश काळे होईल. मी बोललो आहे ते बदलणार नाही. मी निर्णय घेतला आहे आणि मी बदलणार नाही.”

Cross references

गणना 23:19

देव माणूस नाही. तो खोटे बोलणार नाही. देव म्हणजे काही माणूस नाही. त्याचे निर्णय बदलणार नाहीत. जर परमेश्वराने सांगितले की तो एखादी गोष्ट करील. तर तो ती करीलच. जर परमेश्वराने वचन दिले तर तो ते वचन दिलेली गोष्ट करीलच.

1 शमुवेल 15:29

परमेश्वर इस्राएलचा देव असून तो सर्वकाळ आहे. परमेश्वर आपला शब्द फिरवत नाही की विचार बदलत नाही. माणसासारखा तो चंचल नव्हे.”

यशया 5:30

मग ते “सिंह” समुद्रगर्जना करतात. बंदिवासातील लोकांची नजर खाली वळते. त्यांच्या डोळ्यांपुढे अंधकार पसरतो. अंधकाराशिवाय तेथे काहीच असत नाही. सर्व प्रकाश या अंधकारातच लुप्त होतो.

यशया 14:24

सर्वशक्तिमान परमेश्वराने वचन दिले आहे. परमेश्वर म्हणाला, “मी वचन देतो, मी सांगितल्याप्रमाणे गोष्टी घडून येतील. मी योजल्याप्रमाणे सर्व होईल.

यशया 24:4

देश ओस पडून त्याच्यावर शोककळा पसरेल. जग ओसाड व दु:खी होईल. ह्या देशातील महान नेते दुबळे होतील.

यशया 33:8

रस्ते नष्ट केले गेले आहेत. रस्त्यावर कोणीही नाही. लोकांनी केलेले करार मोडले आहेत. साक्षीदारांच्या पुराव्यावर विश्वास ठेवायला लोक तयार नाहीत. कोणी कोणाला मान देत नाही.

यशया 34:4

आकाश कागदाच्या गुंडाळीप्रमाणे गुंडाळले जाईल. द्राक्षाच्यावेलीवर ची सुकलेलीपाने वा सुकलेलीअंजिरे अंजिराच्या झाडावरून गळून पडावीत त्या प्रमाणे तारे गळून पडतील. आकाशातील सर्व तारे वितळून जातील.

यशया 46:10

अखेरीला काय होणार हे मी तुम्हाला आरंभीच सांगितले, फार वर्षांपूर्वी, ज्या गोष्टी घडल्या नव्हत्या, त्या मी तुम्हाला सांगितल्या म्हणजेच त्या गोष्टी घडण्यापूर्वी अनेक वर्षे मी त्या घडणार असल्याचे तुम्हाला सांगितले. मी योजतो, तसेच घडते मला पाहिजे ते मी घडवून आणतो.

यशया 50:3

मी आकाश काळे करू शकतो. मी काळोखाने आकाश शोकप्रदर्शक कपड्याइतके काळे करू शकतो.”

यिर्मया 4:23

मी पृथ्वीकडे पाहिले. पृथ्वी उजाड आणि अस्ताव्यस्त होती. पृथ्वीवर काहीही नव्हते. मी आकाशाकडे पाहिले त्याचा प्रकाश गेला होता.

यिर्मया 7:16

“यिर्मया, तुला सांगतो, यहूदाच्या लोकांसाठी प्रार्थना करु नकोस. त्यांच्यासाठी याचना व आळवणी करु नकोस. त्यांच्या मदतीकरिता मला विनवू नकोस. तू त्यांच्याकरिता केलेली प्रार्थना मी ऐकणार नाही.

यिर्मया 12:4

किती काळ जमीन कोरडी राहणार? किती काळ गवत वाळून मरणार? त्या दुष्ट लोकांच्या चुकीमुळे प्राणी आणि पक्षी मरुन गेले. तरीसुद्धा ते लोक म्हणतात, “आमचे काय होईल हे पाहण्याइतक्या दीर्घकाळ यिर्मया जगणार नाही.”

यिर्मया 12:11

त्यांनी माझा मळा उजाड केला. तो सुकून मरुन गेला. तेथे कोणीही राहत नाही. सर्व देश म्हणजे एक निर्जन वाळवंट झाले आहे. त्या मळ्याची काळजी घेण्यासाठी एकही माणूस उरला नाही.

यिर्मया 14:2

“यहूदा हे राष्ट्र, मेलेल्या लोकांकरिता आक्रंदत आहे. यहूदाच्या शहरामधील लोक अधिकाधिक क्षीण होत चालले आहेत ते जमिनीवर पडून आहेत. यरुशलेमधील लोक देवाकडे मदतीसाठी टाहो फोडत आहेत.

यिर्मया 14:11

नंतर परमेश्वर मला म्हणाला, “यिर्मया, यहूदाच्या लोकांच्या भल्यासाठी तू विनवणी करु नकोस.

यिर्मया 15:1

परमेश्वर मला म्हणाला, “यिर्मया, मोशे आणि शमुवेल जरी यहूदासाठी विनवणी करण्याकरिता माझ्याकडे आले असते तरी यहूदाची मला दया येणार नाही. यहूदाच्या लोकांची मला कीव वाटणार नाही. त्या लोकांना माझ्यापासून दूर ठेव. त्यांना निघून जाण्यास सांग.

यिर्मया 23:10

व्यभिचाराचे पाप केलेल्या लोकांनी यहूदा भरुन गेला आहे. लोकांनी अनेक मार्गांनी निष्ठेचा त्याग केला आहे. परमेश्वराने शाप दिला आणि ही भूमी ओसाड झाली. कुरणातील हिरवळ वाळून मरत आहे. शेते वाळवंटाप्रमाणे झाली आहेत. संदेष्टे दुष्ट आहेत ते त्यांचे बळ (वजन) व शक्ती चुकीच्या पद्धतीने वापरतात.

यिर्मया 23:20

परमेश्वराने जे करण्याचे ठरविले आहे, ते पूर्ण होईपर्यंत परमेश्वराचा राग शांत होणार नाही. पुढील दिवसांत तुम्हाला हे स्पष्टपणे समजेल.

यिर्मया 30:24

लोकांची शिक्षा पूर्ण होईपर्यंत परमेश्वराचा राग राहील. परमेश्वराने ठरविलेली शिक्षा पूर्ण होईपर्यंत तो शांत होणार नाही. यहूदाच्या लोकांनो, तो दिवस उजाडल्यावरच तुम्हाला हे समजेल.”

यहेज्केल 24:14

“मी परमेश्वर आहे. मी तुला सुनावलेली शिक्षा, तुला होईलच. मी तुला शिक्षा करायला कचरणार नाही. मला तुझ्याबद्दल वाईट वाटणार नाही. तू केलेल्या वाईट कृत्यांबद्दल मी तुला शिक्षा करीन.’ असे प्रभू, माझा परमेश्वर, म्हणाला.”

होशेय 4:3

म्हणून देश, मृतासाठी शोक करणाव्या माणसाप्रमाणे झाला आहे. देशातील सर्व लोक दुर्बल झाले आहेत. रानातील प्राणी, आकाशातील पक्षी आणि समुद्रातील मासेसुध्दा मरत आहेत.

होशेय 13:14

“मी त्यांना थडग्यापासून वाचवीन मी त्यांचा मृत्यूपासून बचाव करीन. मरणा, तुझी रोगराई कोठे आहे? थडग्या, तुझी शक्ती कोठे गेली? मला सूड घ्यायचा नाही.

योएल 1:10

शेतांचा नाश झाला आहे. भूमीसुध्दा रडत आहे. का? कारण धान्याचा नाश झाला आहे, नवे मद्य सुकून गेले आहे आणि जैतुनाचे तेल नाहीसे झाले आहे.

योएल 2:30

मी आकाशात आणि पृथ्वीवर आश्चर्यकारक खुणा दाखवीन तेथे रक्त, आग व दाट धूर दिसेल.

मत्तय 27:45

दुपारनंतर लगेच सुमारे तीन तास सर्व भूमीवर अंधार पसरला.

मार्क 15:33

दुपारची वेळ झाली. सगळ्या भूमीवर अंधार पडला, तो अंधार दुपारी तीन वाजेपर्यंत राहिला.

लूक 23:44

त्यावेळी जवळजवळ दुपारचे बारा वाजले होते आणि तीन वाजेपर्यंत सर्व प्रदेशावर अंधार पडला. त्यादरम्यान सूर्य प्रकाशला नाही.

इफिसकरांस 1:9

ख्रिस्तामध्ये आपणांला दाखविण्याच्या त्याच्या अनुग्रहाप्रमाणे त्याच्या इच्छेचे रहस्य आपल्याला कळविले.

इफिसकरांस 1:11

ख्रिस्तामध्ये आम्ही देवाचे लोक म्हणून निवडले गेलो होतो. यासाठी आम्ही अगोदरच निवडले गेलो होतो. देवाचा हेतू लक्षात घेऊन जो सर्व गोष्टी त्याच्या इच्छेच्या हेतूनुसार पूर्णत्वास नेतो

इब्री लोकांस 7:21

पण येशू जेव्हा याजक, बनला तेव्हा तो शपथेने बनला. ज्याने त्याला सांगितले की,“प्रभूने शपथ वाहिली आहे, आणि तो आपले मत बदलणार नाही: ‘तू अनंतकाळचा याजक आहेस.’

प्रकटीकरण 6:12

मग कोकऱ्याला सहावा शिक्का उघडताना मी पाहिले. तेव्हा मोठा भूकंप झाला, सूर्य मेंढीच्या केसांपासून बनविलेल्याकाळ्या कापडासारखा झाला, पूर्ण चंद्र रक्तासारखा लाल झाला.

Interlinear

Choose Theme