यिर्मयाला दुसऱ्यांदा परमेश्वराचा संदेश आला. यिर्मया अजूनही पहारेकऱ्यांच्या चौकात कैद होता.
Cross references
त्यावेळी बाबेलच्या सैन्याने यरुशलेमला वेढा घातला होता आणि यिर्मया चौकीदारांच्या पहाऱ्यात असलेल्या यहूदाच्या राजवाड्याच्या चौकात कैद केला गेला होता.
“मग परमेश्वराने सांगितल्याप्रमाणेच घडले. माझा चुलतभाऊ हानामेल पहारेकऱ्यांच्या चौकात मला भेटला आणि म्हणाला, ‘यिर्मया, अनाथोथ गावाजवळचे माझे शेत तू विकत घे. अनाथोथ हे गाव बन्यामीनच्या कुळाच्या मालकीच्या प्रदेशात होते. तूच ते तुझ्यासाठी विकत घे. कारण ते विकत घेऊन त्याचा मालक होण्याचा तुझा हक्क आणि जबाबदारी आहे.’“तेव्हा मला कळले की हाच देवाचा संदेश होता. देवाचा संदेश असाच आहे हे मला माहीत होतेच.
म्हणून सिद्कीया राजाने यिर्मयाला पहारेकऱ्यांच्या चौकात ठेवण्याचा हुकूम दिला व यिर्मयाला रस्त्यावरील रोटीवाल्याकडून रोटी द्यावी असे ही सांगितले. नगरातील रोट्या संपेपर्यंत यिर्ममाला रोटी दिली गेली. अशा रीतीने यिर्मयाल चौकात पहारेकऱ्याच्या नजरेखाली राहिला.
मग यिर्मया, यरुशलेम जिंकले जाईपर्यंत, मंदिराच्या चौकात पहाऱ्यात राहिला.
कारण सुवार्तेमुळे मी दु:ख सहन करतो. येथपर्यंत की, गुन्हेगाराप्रमणे साखळदंडानी मला बांधण्यात आले. पण देवाचे शिक्षण बांधले गेले नाही.