परमेश्वर असे म्हणतो, “मी इस्राएलमधील आणि यहूदातील लोकांवर मोठे अरिष्टही आणीन. मी त्यांच्यासाठी चांगल्या गोष्टी करण्याचे कबूल केले आहे.
Cross references
“माझी अखेर आता जवळ येऊन ठेपली आहे. परमेश्वराने तुमच्यासाठी बऱ्याच महान गोष्टी केल्या हे तुम्ही जाणता व खरोखरच त्यावर विश्वास ठेवता. त्याने दिलेला शब्द पाळण्यात कुठेही कसूर केली नाही हे तुम्हाला माहीत आहेच. आपल्याला दिलेले प्रत्येक वचन त्याने पुरे केले.
परमेश्वर देवाने आपल्याला जी काही चांगली वचने दिली ती सर्व प्रत्यक्षात आली. पण तसेच त्याचे दुसरे वचनही प्रत्यक्षात आल्याखेरीज राहणार नाही. आपण चुकीने वागलो तर आपल्यावर संकटे ओढवतील असाही त्याने शब्द दिला आहे. त्याने दिलेली ही चांगली सुपीक जमीन सोडून आपल्याला जावे लागेल असेही त्याने शपथपूर्वक उच्चारले आहे.
पूर्वी मी यहूदा आणि इस्राएल यांच्यावर लक्ष ठेवले. व त्यांना उपटून काढण्यासाठी योग्य वेळ येण्याची वाट पाहिली मी त्यांना फाडून काढले. मी त्यांचा नाश केला. मी त्यांच्यावर खूप संकटे आणली. पण आता, त्यांनी पुन्हा उभे राहावे व सामर्थ्यवान व्हावे म्हणून लक्ष ठेवीन.” हा परमेश्वराचा संदेश आहे.
“तुम्ही लोक म्हणत आहात “आमचा देश म्हणजे ओसाड वाळवंट आहे. तेथे कोणी माणसे वा प्राणी राहत नाहीत.’ यरुशलेमच्या रस्त्यांवर व यहूदाच्या शहरात सध्या शांतता आहे. पण लवकरच तेथे कोलाहल सुरु होईल.
हा परमेश्वराकडून आलेला संदेश आहे. “मी इस्राएल आणि यहूदा येथील लोकांना विशेष वचन दिले आहे मी कबूल केलेल्या गोष्टी करण्याची वेळ येत आहे.
सर्व शक्तिमान परमेश्वर म्हणतो, “तुमच्या पूर्वजांनी मला संतापविले. म्हणून मी त्यांचा नाश करण्याचा निर्धार केला. माझा निश्चय बदलायचा नाही असे मी ठरविले.” सर्व शक्तिमान परमेश्वर असे म्हणाला.
सर्व जग, आकाश, पृथ्वी नाहीशी होतील पण माझी वचने कधीही नष्ट होणार नाहीत.