Home Bibles यिर्मया 29:6 · मराठी बायबल
यिर्मया 29:6 · मराठी बायबल

लग्न करा. तुम्हाला मुलेबाळे होऊ द्या. तुमच्या मुलांचीही लग्ने होऊ द्या. म्हणजे त्यांनाही संतती होईल. तुम्हाला खूप संतती होऊ द्या. तुमची संख्या बाबेलमध्ये वाढू द्या. तुम्ही अल्पसंख्यक राहून नका.

Cross references

उत्पत्ति 1:27

तेव्हा देवाने आपल्या प्रतिरुपाचा मनुष्य निर्माण केला; देवाचे प्रतिरुप असा तो निर्माण केला; नर व नारी अशी ती निर्माण केली.

उत्पत्ति 9:7

“नोहा, तू व तुझी मुले तुम्हाला भरपूर संतती होवो व तुमच्या लोकांद्वारे पृथ्वी भरली जावो.”

उत्पत्ति 21:21

नंतर त्याच्या आईने त्याला मिसर देशातील मुलगी बायको करुन दिली. ते पारानच्या वाळवंटात राहिले.

उत्पत्ति 24:3

आणि आकाश व पृथ्वी यांचा निर्माणकर्ता परमेश्वर याजसमोर मला वचन दे की माझा मुलगा इसहाक याला तू कनान देशातील कोणत्याच मुलीबरोबर लग्न करु देणार नाहीस; आपण या कनान देशात राहतो हे खरे परंतु या देशातील कोणत्याच मुलीबरोबर त्याला लग्न करु देणार नाहीस.

उत्पत्ति 24:51

पाहा, रिबका तुमची आहे; तिला तुम्ही घेऊन जा आणि तिला तुमच्या स्वामीच्या मुलाशी लग्न करु द्या.”

उत्पत्ति 24:60

ते सर्व जाण्यास निघाले तेव्हा त्यांनी तिला निरोप देताना आशीर्वाद देऊन म्हटले,“आमचे भगिनी, तू लाखो लोकांची माता हो; तुझी संतती त्यांच्या शत्रुंचा बिमोड करुन त्यांची नगरे जिकूंन त्यांचा ताबा घेवोत.”

उत्पत्ति 28:1

नंतर इसहाकाने याकोबाला बोलावून त्याला आशीर्वाद दिला नंतर त्याने त्याला बजावून आज्ञा दिली; तो म्हणाला, “तू कनानी मुलीपैकी कोणत्याच मुलीशी लग्न करता कामा नये;

उत्पत्ति 29:19

लाबान म्हणाला, “परक्या कोणापेक्षा तिने तुझ्याशी लग्न करावे हे तिच्यासाठी चांगले आहे; म्हणून तू आता माझ्यापाशी राहा.”

उत्पत्ति 34:4

शखेमाने आपल्या बापास सांगितले, “कृपा करुन ही मुलगी मला मिळवून द्या; मला तिच्याशी लग्न करावयाचे आहे.”

शास्ते 1:12

यहूदाच्या लोकांनी उठाव करण्यापूर्वी कालेब त्यांना म्हणाला, “किर्याथ सेफरचा पाडाव व्हावा अशी माझी इच्छा आहे. जो कोणी युध्दात हे नगर घेईल त्याला मी माझी अखसा देईन. ती त्याची पत्नी होईल.”

शास्ते 12:9

त्याला तीस मुलगे आणि तीस मुली होत्या त्याने आपल्या तीसही मुलींना गोत्राबाहेर लग्ने जमवण्यास सांगितले आणि सर्व मुलांसाठी तशाच बाहेरच्या मुली केल्या. इब्सान सात वर्षे न्यायाधीश होता.

शास्ते 14:2

घरी परतल्यावर तो आपल्या आईवडीलांना म्हणाला, “तिम्ना येथे मी एक पलिष्टी मुलगी पाहिली आहे. मला तिच्याशी लग्न करायचे आहे.”

यिर्मया 16:2

“यिर्मया, तू लग्न करता कामा नये. या ठिकाणी तुला मुले होता कामा नयेत”

1 करिंथकरांस 7:36

जर एखाद्याला असे वाटते की, तो त्याच्या कुमारिकेविषयी योग्य ते करीत नाही आणि जर त्याच्या भावना तीव्र आहेत, तर त्या दोघांनी पुढे होऊन लग्न करुन घेणे आवश्यक आहे. त्याला जे वाटते ते त्याने करावे.

1 तीमथ्याला 5:14

यासाठी माझी अशी इच्छा आहे की, तरुण स्त्रियांनी (विधवांनी) लग्ने करावीत. मुलांचे संगोपन करावे व आपले घर चालवावे. आपल्या शत्रूला आपली निंदा करण्यास वाव मिळू देऊ नये.

Interlinear

Choose Theme