Home Bibles यिर्मया 16:2 · मराठी बायबल
यिर्मया 16:2 · मराठी बायबल

“यिर्मया, तू लग्न करता कामा नये. या ठिकाणी तुला मुले होता कामा नयेत”

Cross references

उत्पत्ति 19:14

म्हणून मग लोट बाहेर गेला व आपल्या जावयांस भेटला. तो त्यांना म्हणाला, “चला उठा, त्वरा करा, व हे शहर सोडून लवकर बाहेर पडा; कारण परमेश्वर या नगराचा नाश करणार आहे.” परंतु लोट गंमत करीत आहे असे त्याच्या जावयांस वाटले.

यिर्मया 29:6

लग्न करा. तुम्हाला मुलेबाळे होऊ द्या. तुमच्या मुलांचीही लग्ने होऊ द्या. म्हणजे त्यांनाही संतती होईल. तुम्हाला खूप संतती होऊ द्या. तुमची संख्या बाबेलमध्ये वाढू द्या. तुम्ही अल्पसंख्यक राहून नका.

मत्तय 24:19

त्याकाळी गर्भवती असलेल्या अगर तान्ही बालके असलेल्या स्रियांना फार कठीण जाईल.

लूक 21:23

त्या दिवसांत ज्या गरोदर स्रिया आहेत, व ज्या बाळाचे पोषण करणाऱ्या स्रिया आहेत, त्यांच्यासाठी ते किती भयंकर होईल. अशा स्त्रियांची खरोखर दुर्दशा होईल. मी असे म्हणतो कारण देशावर मोठे संकट येईल आणि लोकांवर देवाचा कोप ओढवेल.

लूक 23:29

कारण असे दिवस येत आहेत, जेव्हा लोक म्हणतील, “धन्य त्या स्त्रिया ज्या वांझ आहेत, आणि धन्य ती गर्भाशये, ज्यांनी जन्मदिले नाहीत, व धन्य ती स्तने, ज्यांनी कधी पाजले नाही.’

1 करिंथकरांस 7:26

मी हे असे समजतो: सध्याच्या दुर्दशेत हे चांगले आहे, (होय) हे चांगले आहे की, एखाद्याने माइयासारखे एकटे राहावे.

Interlinear

Choose Theme