(राजा यकन्या, राजमाता, अधिकारी, यहूदाचे व यरुशलेमचे नेते, सुतार व लोहार ह्यांना यरुशलेममधून नेल्यावर यिर्मयाने हे पत्र पाठविले)
Cross references
येहूने वर खिडकीकडे पाहात म्हटले, “माझ्या बाजूने कोण आहे? बोला!”तेव्हा खिडकीतून दोन तीन खोजांनी त्याच्याकडे पाहिले.
बाबेलचे लोक तुझ्या मुलांना घेऊन जातील. ती मुले बाबेलच्या राजावाड्यात खोजे बनून राहतील.”
यहूदाचा राजा यहोयाखीन बाबेलच्या या राजाच्या भेटीला आला. यहोयाखीनची आई, त्याचे कार- भारी, वडीलधारी मंडळी, सरदार हेही लोक त्याच्याबरोबर होते. तेव्हा बाबेलच्या राजाने यहोयाखीनला आपल्या ताब्यात घेतले. नबुखद्नेस्सरच्या कारकिर्दीच्या आठव्या वर्षी हे झाले.
यहोखदीन यहूदाचा राजा झाला तेव्हा अठरा वर्षांचा होता.यरुशलेममध्ये त्याची कारकिर्द तीन महिने आणि दहा दिवस होती.परमेश्वराला अमान्य असलेले वर्तन करुन त्याने पाप केले.
“मी निश्र्चितपणे आहे म्हणूनच हे तुझ्याबाबत घडेल” हा परमेश्वराकडून आलेला संदेश आहे, “यहोयाकीन, यहोयाकीमच्या मुला, यहूदाच्या राजा, जरी तू माझ्या उजव्या हातातील मुद्रा असलास, तरीही मी तुला उखडून टाकले असते. तुझ्याबाबतीत असेच घडेल.
परमेश्वराने मला पुढील गोष्टींचा दृष्टांन्त दिला: परमेश्वराच्या मंदिरासमोर दोन अंजिराच्या टोपल्या व्यवस्थित मांडलेल्या मी पाहिल्या. (बाबेलचा राजा नबुखद्नेस्सर ह्याने यकोन्याला कैद करुन नेले, त्यांनंतर हा दृष्टांन्त झाला. यकोन्या हा यहोयाकीम राजाचा मुलगा होता. यकोन्या आणि त्याचे महत्वाचे अधिकारी ह्यांना यरुशलेममधून दूर नेले गेले. त्यांना बाबेलला नेले गेले. नबुखद्नेस्सरने यहूदातील सर्व सुतार व लोहार यांनाही नेले.)
बाबेलचा राजा नबुखद्नेस्सरने ह्या गोष्टीयरुशलेममध्येच सोडून दिल्या. त्याने यहूदाचा राजा यकन्या ह्याला कैद करुन नेले, तेव्हा ह्या गोष्टी नेल्या नाहीत. यकन्या हा यहोयाकीम राजाचा मुलगा होता. नबुखद्नेस्सरने यहूदातील व यरुशलेममधील इतर महत्वाच्या व्यक्तींनासुद्धा नेले.
यहूदाचा राजा यकन्या यालासुद्धा मी येथे परत आणीन. यकन्या यहोयाकीमचा मुलगा आहे. नबुखद्नेस्सरने यहूदातील ज्या लोकांना बळजबरीने घरे सोडून बाबेलला नेले, त्या सर्व लोकांनाही मी परत आणीन.’ हा परमेश्वराचा संदेश आहे. ‘अशा रीतीने बाबेलच्या राजाने यहूदाच्या लोकांवर लादलेले जोखड मी मोडीन.”‘
“तुम्ही कैदी आहात. मी तुम्हाला बळजबरीने यरुशलेम सोडायला लावले व बाबेलला पाठविले. म्हणून परमेश्वराचा संदेश ऐका.”
नंतर नबुखदनेस्सर राजाने अश्पनजला हुकूम केला. (अश्पनज हा, राजाच्या सेवेत असणाऱ्या नपुंसक अधिकाऱ्यांतील सर्वांत महत्वाचा अधिकारी होता.) राजाने अश्पनजला, काही इस्राएली लोकांना त्याच्या राजवाड्यात आणण्यास सांगितले. नबुखद्नेस्सरला महत्वाच्या घराण्यातील आणि राजघराण्यातील इस्राएली लोक हवे होते.