Home Bibles 2 राजे 20:18 · मराठी बायबल
2 राजे 20:18 · मराठी बायबल

बाबेलचे लोक तुझ्या मुलांना घेऊन जातील. ती मुले बाबेलच्या राजावाड्यात खोजे बनून राहतील.”

Cross references

2 राजे 24:12

यहूदाचा राजा यहोयाखीन बाबेलच्या या राजाच्या भेटीला आला. यहोयाखीनची आई, त्याचे कार- भारी, वडीलधारी मंडळी, सरदार हेही लोक त्याच्याबरोबर होते. तेव्हा बाबेलच्या राजाने यहोयाखीनला आपल्या ताब्यात घेतले. नबुखद्नेस्सरच्या कारकिर्दीच्या आठव्या वर्षी हे झाले.

2 राजे 24:15

यहोयाखीनला नबुखद्नेस्सरने बाबेलला कैदी म्हणून नेले. राजाची आई, बायका, सेवक, आणि गावातील प्रतिष्ठित लोक यांनाही त्याने नेले. हे सर्व त्याचे कैदी होते.

2 राजे 25:6

बाबेलच्या लोकांनी राजा सिद्कीयाला धरुन रिब्ला येथे आपल्या राजाकडे नेले. या लोकांनी सिद्कीयाला जबर शासन करण्याचे ठरवले.

2 इतिहास 33:11

तेव्हा अश्शूरच्या राजाच्या सेनापतीकरवी परमेश्वराने यहूदावर हल्ला केला. या सेनापतींनी मनश्शेला आकड्यांनी जखडून पकडले. त्याच्या हातात पितळी बेड्या ठोकल्या. अशा रितीने मनश्शेला कैद करुन त्यांनी बाबेलला नेले.

दानीएल 1:3

नंतर नबुखदनेस्सर राजाने अश्पनजला हुकूम केला. (अश्पनज हा, राजाच्या सेवेत असणाऱ्या नपुंसक अधिकाऱ्यांतील सर्वांत महत्वाचा अधिकारी होता.) राजाने अश्पनजला, काही इस्राएली लोकांना त्याच्या राजवाड्यात आणण्यास सांगितले. नबुखद्नेस्सरला महत्वाच्या घराण्यातील आणि राजघराण्यातील इस्राएली लोक हवे होते.

Interlinear

Choose Theme