“खोट्या संदेष्ट्यांनी दृष्टान्त पाहिल्याचे सांगितले. ते जादू करतात आणि भविष्यात घडणाऱ्या गोष्टी सांगतात. पण ते खोटे बोलतात. त्यांना परमेश्वराने पाठविल्याचे ते सांगतात. पण ते खोटे आहे. खोटे खरे ठरावे म्हणून ते अजूनही वाट पाहत आहेत.
Cross references
तेव्हा अहाबने संदष्ट्यांची एक सभा घेतली. तेव्हा तिथे चारशे संदेष्टे हजर होते. अहाबने त्यांना विचारले, “आपण आत्ताच रामोथ येथे अरामी फौजेवर चालून जावे का? की काही काळ थांबावे?”संदेष्टे म्हणाले, “तुम्ही खुशाल आत्ताच हल्ला करा. परमेश्वर तुम्हाला जय मिळवून देईल.”
सिद्कीयाचे हे म्हणणे इतर सर्वच संदेष्ट्यांना पटले. पुढे सिद्कीया म्हणाला, “आता तुझ्या सैन्याने चढाई करावी. रामोथ येथे अरामी सैन्यावर हल्ला करावा. विजय तुमचाच आहे. परमेश्वर तुम्हाला यश देईल.”
मीखाया मग राजाकडे आला. राजाने त्याला विचारले, “मीखाया, मी आणि राजा यहोशाफाट हातमिळवणी करु ना? रामोथला अरामच्या सैन्यावर आता चढाई करु का?”मीखाया म्हणाला, “हो तुम्ही आत्ताच ही लढाई करा. परमेश्वर तुम्हाला यश देईल.”
मीखायाला तुरुंगात घालायला त्यांना सांगा. त्याला फक्त भाकर आणि पाणी द्या. युध्दावरुन मी परत येईपर्यंत त्याला तिथेच राहू द्या.”
राजा अहाबला अशा तऱ्हेने मरण आले. काही जणांनी त्याचा देह शोमरोनला आणला. त्याला त्यांनी तिथे पुरले.
मूर्ख जे ऐकतो त्यावर विश्वास ठेवतो. पण शहाणा माणूस प्रत्येक गोष्टीचा काळजीपूर्वक विचार करतो.
संदेष्टे खोटे सांगतात, जे काम करण्यासाठी याजकांची निवड केली आहे, ते काम ते करणार नाहीत. आणि माझ्या लोकांना हे आवडते! पण तुमची शिक्षा जवळ आल्यावर तुम्ही काय कराल?”
मग परमेश्वर मला म्हणाला, “यिर्मया, माझ्या नावावर हे संदेष्टे असत्य कथन करतात. मी त्यांना पाठविलेले नाही. मी त्यांना आज्ञा केली नाही वा त्यांच्याशी बोललोही नाही. ते लोकांपुढे खोटे दृष्टान्त सांगतात, त्यांना मोहजालात फसवितात व स्वत:चे स्वप्नरंजन करतात.
मी त्यांच्याविरुद्ध आहे.” हा परमेश्वराकडून आलेला संदेश आहे. “ते त्यांचे स्वत:चे शब्द वापरतात आणि ते माझेच शब्द आहेत असे भासवितात.
यहूदाचा राजा सिद्कीया याच्या कारकिर्दींच्या चौथ्या वर्षाच्या पाचव्या महिन्यातहनन्या हा संदेष्टा माझ्याशी बोलला. हनन्या हा अज्जूरचा मुलगा होता. तो गिबोन गावचा रहिवासी होता. परमेश्वराच्या मंदिरात तो माझ्याशी बोलला. तेव्हा याजक व इतर सर्व लोक तेथे उपस्थित होते. हनन्या म्हणाला,
“सर्वशक्तिमान परमेश्वर, इस्राएलचा देव असे म्हणतो ‘यहूदाच्या लोकांच्या मानेवर बाबेलच्या राजाने ठेवलेले जोखड मी मोडीन.
नंतर संदेष्टा यिर्मया संदेष्टा हनन्याला म्हणाला, “हनन्या! ऐक! परमेश्वराने तुला पाठविलेले नाही पण तू यहूदाच्या लोकांना लबाडीवर विश्वास ठेवावयास लावले.
सर्वशक्तिमान परमेश्वर, इस्राएलचा देव म्हणतो, “तुमचे संदेष्टे आणि जादू करणारे लोक ह्यांच्याकडून फसू नका. त्यांना पडलेली स्वप्ने ऐकू नका.
“यिर्मया, बाबेलमध्ये असलेल्या सर्व कैद्यांना पुढील निरोप पाठव नेहेलमी घराण्यातील शमाया ह्या माणसाबद्दल परमेश्वर असे म्हणतो ‘शमायाने तुम्हाला उपदेश केला. पण मी त्याला पाठविलेले नाही. शमायाने तुम्हाला खोटे सांगून त्यावर विश्वास ठेवायला लावले.
राजा सिद्कीया, तुझे संदेष्टे कोठे आहेत? त्यांनी तुला खोटा संदेश दिला. ते म्हणाले ‘बाबेलचा राजा तुझ्यावर किंवा यहूदावर हल्ला करणार नाही.’
तुझ्या संदेष्ट्यांनी तुझ्यासाठी दृष्टान्त पाहिले. पण त्यांचे दृष्टान्त म्हणजे निरर्थक व मुर्खपणाचे होते. तुझ्या पापाबद्दल त्यांनी उपदेश केला नाही. त्यांनी स्थिती सुधारण्याचा प्रयत्न केला नाही. पण त्यांनी खोटे संदेश देऊन तुला मूर्ख बनविले.
“परमेश्वर, त्यांचा प्रभू, हे गीत बंद करील’ असे त्यांना सांग. ह्या पुढे ते इस्राएलबद्दल असे काही म्हणणार नाहीत. त्याऐवजी ते पुढील गीत म्हणतील.‘लवकरच संकटे येतीलदृष्टान्त खरे ठरतील.’
“खोट्या संदेष्ट्यांनो, तुम्ही पाहिलेले दुष्टान्त खरे नाहीत. तुम्ही जादू केली व असे घडेल म्हणून सांगितले. पण तुम्ही खोटे बोललात, परमेश्वराने असे सांगितले असे तुम्ही म्हणालात. पण मी तुमच्याशी बोललोच नाही.”
“तुमचे संदेष्टे खोट्या गोष्टी सांगतात. सज्जनांना त्याचा त्रास होतो. मला हे पंसत नाही. तुम्ही वाईट लोकांना पठिंबा देता, त्यांना उत्तेजन देता. त्यांना त्यांचे मार्ग बदलायला सांगत नाही. त्यांचे जीव वाचवायचा प्रयत्न करीत नाही.
“त्या मंत्र - तंत्रांच्या खुणा इस्राएल लोकांना निरर्थक वाटतील त्यांना दिलेली वचने त्यांना पुरेशी आहेत. पण परमेश्वराला त्यांच्या पापाचे स्मरण होईल. मग इस्राएल लोक पकडले जातील.”
तुमचे दृष्टान्त निरुपयोगी आहेत. तुमचे मंत्र-तंत्र तुम्हाला मदत करणार नाहीत. ते म्हणजे असत्याचे गाठोडे आहे. तलवार दुष्टांच्या चाळ्याला भिडली आहे. लवकरच त्यांची फक्त कलेवरे उरतील त्यांची वेळ आली आहे. त्यांची पापे भरली आहेत.
“संदेष्टे लोकांना ताकीद देत नाहीत. ते सत्य झाकून ठेवतात. हे संदेष्टे, तटबंदीची दुरुस्ती न करता, वरवर गिलावा देऊन भगदाडे बुजविणाऱ्या, कामगारांप्रमाणे आहेत. त्यांना फक्त खोटेच दिसते. ते मंत्र-तंत्राच्या आधारे भविष्य जाणून घेतात, पण लोकांशी फक्त खोटेच बोलतात. ते म्हणतात ‘परमेश्वर, माझा देव, पुढील गोष्टी सांगतो.’ पण हे सर्व खोटे आहे. परमेश्वर त्यांच्याशी बोललेला नाही.
लोक, भविष्य जाण्यासाठी, त्यांच्याकडील लहान मूर्तीचा व जादूटोण्याचा उपयोग करतात. पण ते सर्व व्यर्थ आहे. त्यांना दृष्टांन्त होतात आणि ते त्यांना पडलेल्या स्वप्नांबद्दल सांगतात. पण ते सर्व केवळ अर्थहीन थोतांड आहे. लोकांची स्थिती मदतीसाठी रडत सैरभैर फिरणाऱ्या मेंढ्यांसारखी आहे. पण त्यांना वळविणारा कोणीही मेंढपाळ नाही.
पुष्कळ लोक माझ्या नावाने येतील व म्हणतील की, ‘मी तोच आहे’ आणि ते पुष्काळांना फसवतील.
कारण काही लोक आपण रिव्रस्त किंवा संदेष्टे आसल्याचा खोटा दावा करतील आणि शक्य झाले तर ते निवडलेल्या लोकांना फसविण्यासाठी चिन्हे व आश्चर्यकर्म करतील.
आणि या कारणासाठी देवाने त्यांना भ्रम पडेल असे केले. यासाठी की, जे खोटे आहे त्यावर त्यांनी विश्वास ठेवावा.
ते पोकळ बढाया मारतात व जे लोक चुकीचे जीवन जगणाऱ्यांच्या सांगतीपासून सुटकेचा प्रयत्न करु लागलेआहेत, अशांची फसवणूक करुन देहवासनांच्या अनैतिकतेचा मोह टाकतात.