Home Bibles यिर्मया 19:5 · मराठी बायबल
यिर्मया 19:5 · मराठी बायबल

यहूदाच्या राजाने बआल दैवतासाठी उच्चासने बांधली. लोक ह्या जागांचा उपयोग आपल्या मुलांना अग्नीत जाळण्यासाठी करतात. बआल दैवताला होमबली अर्पण केल्याप्रमाणे ते आपली मुले जाळतात. मी त्यांना असे करायला सांगितलेले नाही. मी तुमच्याजवळ तुमच्या मुलांचे बळी मागितलेले नाहीत. अशा कधीही माझ्या मनातही आल्या नाहीत.

Cross references

लेवीय 18:21

“तू तुझ्या लहान मुलांमुलीपैकी कोणाचाही मौलख दैवतासाठी होम करु नको; असे करशील तर तू आपल्या देवाच्या नांवाचा अवमान करुन त्याच्या नांवाला कलंक लावशील! मी परमेश्वर आहे.

गणना 22:41

दुसऱ्या दिवशी सकाळी बालाक बलामला घेऊन बामोथबाल शहरी गेला. तेथून त्यांना इस्राएल लोकांच्या तळाचा शेवटचा भाग दिसू शकत होता.

अनुवाद 12:31

तुमचा देव परमेश्वर याच्या बाबतीत तसे करु नका. कारण परमेश्वराला ज्या गोष्टींचा तिटकारा आहे त्या सर्व गोष्टी हे लोक करतात. ते देवाप्रीत्यर्थ आपल्या मुलाबाळांचा होमसुद्धा करतात.

2 राजे 17:17

आपल्या पोटच्या मुलामुलींचा अग्नित बळी दिला. भविष्याचे कुतूहल शमवण्यासाठी जादूटोणा आणि मंत्रतंत्र यांचा अवलंब केला. परमेश्वराने ज्या कृत्यांचा धिक्कार केला तेच करण्यापायी स्वत:लाही विकले आणि परमेश्वराचा कोप ओढवून घेतला.

2 राजे 21:6

आपल्या मुलाचाच बळी देऊन मनश्शेने त्याला वेदीवर जाळले.जादूटोणा, मंत्रतंत्र, भुतंखेतं यांच्यामार्फत भविष्य जाणून घ्यायचा मनश्शेला नाद होता.परमेश्वराने जे जे गैर म्हणून सांगितले ते ते मनश्शे करत गेला. त्याने परमेश्वराचा कोप झाला.

2 इतिहास 28:3

बेन हिन्नोमच्या खोऱ्यात त्याने धूप जाळला. आपल्या पोटच्या मुलांना त्याने अग्नीमध्ये आहूती करुन बळी दिले. या प्रदेशात राहणारे लोक जे भयंकर पाप करीत तेच त्याने केले. इस्राएल लोकांनी या भूमीवर पाऊल ठेवले तेव्हा परमेश्वराने त्या लोकांना तिथून घालवले होते.

स्तोत्रसंहिता 106:37

तचीच मुले मारली आणि मुले त्या राक्षसांना अर्पण केली.

यिर्मया 7:31

यहूदाच्या लोकांनी बेन हिन्नोमच्या दरीत तोफेतची उच्चस्थाने बांधली आहेत. त्या ठिकाणी लोक स्वत:च्या मुलामुलींना ठार मारतात आणि दैवताला अर्पण करण्यासाठी म्हणून जाळतात. अशी आज्ञा मी कधीही दिलेली नाही. असे काही माझ्या मनातही कधी आलेले नाही.

यिर्मया 32:35

“बेन-हिन्नोमच्या दरीत त्यांना बआल या दैवतासाठी उच्चस्थाने बांधली. ही पूजास्थाने त्यांनी आपल्या मुलामुलींना जाळून मोलेखला बआलबळी देण्यासाठी बांधली. अशा भयंकर गोष्टी करण्याची आज्ञा मी त्यांना कधीच दिली नव्हती. यहूदातील लोक अशा भयंकर गोष्टी करतील, असे माझ्या कधीही मनातसुद्धा आले नव्हते.

यहेज्केल 16:20

देव म्हणाला, “आपल्याला मुले झाली. पण तू आपली मुले घेतलीस व त्यांना ठार करुन खोट्या देवांना अर्पण केलेस. मला फसवून त्या खोट्या देवांकडे जाताना तू जी दुष्कृत्ये केलीस त्यातील ही फक्त काहीच होत.

यहेज्केल 20:26

त्यांच्या दानांबरोबर मी त्यांना अमंगळ होऊ दिले. त्यांनी स्वत:च्याच पहिल्यां अपत्यांचेसुध्दा बळी देण्यास सुरवात केली. अशा रीतीने, मी त्यांचा नाश केल्यावर त्यांना मीच परमेश्वर आहे. हे समजेल!’

यहेज्केल 38:10

परमेश्वर, माझा प्रभू, पुढील गोष्टी सांगतो, “त्या वेळी तुझ्या मनात एक कल्पना येईल, तू एक दुष्ट बेत आखू लागशील.

दानीएल 2:29

राजा, तू तुझ्या शय्येवर झोपला होतास. मग तू भविष्यात घडणाऱ्या गोष्टीबंद्दल विचार करायला लागलास. देव लोकांना रहस्ये सांगू शकतो त्याने तुला भविष्यात काय घडणार ते दाखविले.

Interlinear

Choose Theme