तुमचा देव परमेश्वर याच्या बाबतीत तसे करु नका. कारण परमेश्वराला ज्या गोष्टींचा तिटकारा आहे त्या सर्व गोष्टी हे लोक करतात. ते देवाप्रीत्यर्थ आपल्या मुलाबाळांचा होमसुद्धा करतात.
Cross references
“सर्वजण एखादी गोष्ट करतात म्हणून तुम्हीही ती खरी मानून करु नका. जर एखादा जनसमूह चुकीची गोष्ट करीत असेल तर तुम्ही त्याच्यांत सामील होउ नका; तुम्हीही चुकीची गोष्ट करावी म्हणून त्यांनी तुमचे मन वळविण्याचा प्रयत्न केला तरी त्यांचे मुळीच ऐकू नका; तुम्ही तर जे योग्य व न्याय्य आहे तेच करावे.
तुम्ही ज्या मिसर देशात राहात होता त्या देशातील रीतीरीवाजाप्रमाणे चालू नका! तसेच ज्या कनान देशात मी तुम्हाला घेऊन जात आहे त्या देशातील चालीरीती प्रमाणेही तुम्ही चालू नका! त्यांचे विधी पाळू नका.”
“तू तुझ्या लहान मुलांमुलीपैकी कोणाचाही मौलख दैवतासाठी होम करु नको; असे करशील तर तू आपल्या देवाच्या नांवाचा अवमान करुन त्याच्या नांवाला कलंक लावशील! मी परमेश्वर आहे.
“ह्याकरिता तुम्ही माझे विधी व नियम पाळावे; हे नियम इस्राएल लोकांकरिता आणि त्यांच्यामध्ये राहाणाऱ्या परदेशीय लोकांकरिताही आहेत; तुम्हांपैकी कोणीही असली भयंकर अमंगळ पापकर्मे करु नये.
इतर लोकांनी असली भयंकर अमंगळ पापकृत्ये केली, परंतु तुम्ही माझे विधी व नियम पाळावेत; तसली भयंकर अमंगळ पापकृत्ये करुन तुम्ही आपणाला अमंगळ करुन घेऊ नये! मी तुमचा देव परमेश्वर आहे.”
“तू इस्राएल लोकांना आणखी असे सांग की इस्राएल लोकांपैकी किंवा इस्राएल लोकांमध्ये राहाणाऱ्या परदेशीयापैकी कोणी आपल्या मुलाबाळांतून एखादे मूल मोलख दैवतास अर्पील तर त्या माणसाला जिवे मारावे! आपल्या देशाच्या लोकांनी त्याला धोंडमार करावा!
तुम्ही फार चांगले आहा आणि योग्य मार्गाने जगता म्हणून तुम्ही येथे राहायला जाणार आहात असे नाही. त्यांच्या दुष्टपणामुळे तुमचा देव परमेश्वर त्यांना घालवून देत आहे आणि अब्राहाम, इसहाक व याकोब या पूर्वजांना दिलेला शब्द तो पाळत आहे.
“ते लोक करतात तशी तुम्ही आपला देव परमेश्वर ह्याची उपासना करु नका.
“तुमचा देव परमेश्वर ह्याने दिलेल्या या प्रदेशात राहायला जाल तेव्हा तिकडच्या राष्ट्रातील लोकांप्रमाणे भयंकर कृत्ये करु नका.
आपल्या पोटच्या मुलाबाळांचा यज्ञाची वेदीवर बळी देऊ नका. ज्योतिषी, चेटूक करणारा, मांत्रिक यांच्या नादी लागू नका.
नाहीतर आपापल्या दैवतांची पूजा करताना ते ज्या अमंगळ गोष्टी करतात त्या ते तुम्हाला शिकवतील आणि तसे करणे आपला देव परमेश्वर ह्याच्या दृष्टीने पाप आहे.
मग मवाबच्या राजाने आपल्या थोरल्या मुलाला बरोबर घेतले. हा मुलगा त्याच्यानंतर गादीवर बसणार होता. नगराच्या तटबंदीच्या भिंतीवर या राजाने आपल्या मोठ्या मुलाचा यज्ञात बळी दिला. इस्राएल लोकांना या गोष्टीचा धक्काबसला. मवाबच्या राजाला सोडून ते आपल्या देशात चालते झाले.
या लोकांनी परमेश्वराने पूर्वजांशी केलेले करार आणि नियम धुडकावून लावले. परमेश्वराने बाजवून सांगितले तिकडे दुर्लक्ष केले. क्षुद्र दैवतांच्या नादी लागून त्यांनी काहीच साधले नाही. आपल्या भोवतालच्या राष्ट्रांचे त्यांनी अनुकरण चालवले. परमेश्वराने इस्राएल लोकांना जे करु नका म्हणून सांगितले होत तेच ही राष्ट्रे करत होती.
अळी या लोकांनी निभज आणि तर्ताक केले. सफरावी यांनी आपले दैवत अद्रम्मेलेक आणि अनम्मेलेक यांच्याप्रीत्यर्थ आपल्या मुलांचा बळी दिला.
परमेश्वराने जे करु नका म्हणून सांगितले तेच त्याने केले. इतर राष्ट्रे करत तसे अमंगळ आचरण मनश्शेने केले (आणि इस्राएली आले त्यावेळी याच राष्ट्रांना परमेश्वराने तेथून हुसकून लावले होते.)
त्यांचे आचरण परमेश्वराच्या दृष्टीने वाईट असे होते. वाईट वर्तणुकीमुळे ज्या देशांना परमेश्वराने इस्राएलपुढून हुसकून लावले त्यांच्या निंद्य प्रथांचेच मनश्शेने अनुकरण केले
शिवाय याजकांचे प्रमुख, आणि यहूदातील वडीलधारी मंडळी यांचे दुराचरण वाढत चालले आणि त्यांनी अधिकाधिक पातके केली. ते परमेश्वराच्या बाबतीत अप्रमाणिक झाले. इतर देशांची अमंगळ कृत्यांची उदाहरणे त्यांनी समोर ठेवली. या प्रमुखांनी यरुशलेममधल्या परमेश्वराने पवित्र केलेल्या मंदिराची धूळदाण केली.
यहूदाच्या लोकांनी बेन हिन्नोमच्या दरीत तोफेतची उच्चस्थाने बांधली आहेत. त्या ठिकाणी लोक स्वत:च्या मुलामुलींना ठार मारतात आणि दैवताला अर्पण करण्यासाठी म्हणून जाळतात. अशी आज्ञा मी कधीही दिलेली नाही. असे काही माझ्या मनातही कधी आलेले नाही.
“बेन-हिन्नोमच्या दरीत त्यांना बआल या दैवतासाठी उच्चस्थाने बांधली. ही पूजास्थाने त्यांनी आपल्या मुलामुलींना जाळून मोलेखला बआलबळी देण्यासाठी बांधली. अशा भयंकर गोष्टी करण्याची आज्ञा मी त्यांना कधीच दिली नव्हती. यहूदातील लोक अशा भयंकर गोष्टी करतील, असे माझ्या कधीही मनातसुद्धा आले नव्हते.
तुम्ही तुमच्या पूर्वजांनी अर्पण केलेल्या गोष्टीच आजही दैवताला अर्पण करीत आहात. तुमच्या खोट्या देवांना बळी म्हणून तुम्ही स्वत:चीच मुले आगीत टाकीत आहात. आजसुद्धा तुम्ही त्या घाणेरड्या, अमंगळ देवांबरोबर स्वत:ला घाणेरडे करुन घेत आहात. मी तुम्हाला माझ्याजवळ येऊ देईन आणि तुम्हाला सल्ला देईन. उपदेश करीन असे खरंच तुम्हाला वाटते का? मी परमेश्वर व प्रभू आहे. मी स्वत:ची शपथ घेऊन प्रतिज्ञा करतो की मी तुमच्या प्रश्र्नांना उत्तर देणार नाही वा तुम्हाला मार्गदर्शन करणार नाही.
मिसरबरोबरच्या प्रेम प्रकराणाच्या स्वप्नांचा मी चुराडा करीन. तू पुन्हा त्याच्याकडे ढुंकून पाहणार नाहीस. तू पुन्हा कधीही मिसरची आठवण काढणार नाहीस.”
1,000 मेंढे व 10,000 तेलाच्या नद्या यांनी परमेश्वर प्रसन्न होईल का? माझ्या पापांची किंमत म्हणून मी माझे पहिले अपत्य द्यावे का? माझ्या पोटच्या पोराला माझ्या पापांची किंमत चुकती करण्याकरिता द्यावे का?