Home Bibles यिर्मया 15:13 · मराठी बायबल
यिर्मया 15:13 · मराठी बायबल

यहूदाच्या लोकांकडे बरीच संपत्ती आहे ती संपत्ती मी दूसऱ्या लोकांना देईन. ती त्या लोकांना विकत घ्यावी लागणार नाही. मीच ती त्यांना देईन. का? कारण यहूदाच्या लोकांनी खूप पापे केली. यहूदाच्या प्रत्येक भागात त्यांनी पापे केली.

Cross references

स्तोत्रसंहिता 44:12

देवा, तू आम्हाला कवडीमोलाने विकलेस. तू किंमतीसाठी घासाघीस देखील केली नाहीस.

यशया 52:3

परमेश्वर म्हणतो, “तुला पैशासाठी विकले नव्हते. म्हणून, तुझी मुक्तता करण्यासाठी, मी पैशाचा उपयोग करणार नाही.”

यशया 52:5

काय घडले आहे ते आता पाहा दुसऱ्या एका राष्ट्राने माझ्या लोकांना ताब्यात घेतले आहे. माझ्या लोकांना गुलामाप्रमाणे ताब्यात घेणारे हे राष्ट्र कोणते? माझ्या लोकांना गुलाम म्हणून घेताना त्यांनी काहीही किंमत मोजली नाही. हे राष्ट्र माझ्या लोकांवर सत्ता गाजविते. त्यांची थट्टा करते. ते लोक नेहमीच माझी निंदा करतात.”

यिर्मया 15:8

पुष्कळ स्त्रिया विधवा होतील. समुद्रातील वाळूच्यापेक्षा त्यांची संख्या जास्त असेल. भर मध्यान्ही मी संहारक आणीन. यहूद्यांच्या तरुण मुलांच्या आयांवर तो हल्ला करील. मी यहूदामधील लोकांना क्लेश देईन आणि त्यांच्यात घबराट निर्माण करीन. लवकरच मी हे घडवून आणीन.

यिर्मया 17:3

विस्तीर्ण प्रदेशातील डोंगरावरील त्या वस्तू त्यांना आठवतात यहूदी लोकांकडे बरीच संपत्ती आहे ती सर्व मी दुसऱ्या देशांना देईन. तुम्ही जेथे पूजाआर्चा करता आणि जे पाप आहे, अशी उच्च स्थाने दुसरे लोक नष्ट करतील.

यिर्मया 20:5

यरुशलेमच्या लोकांनी खूप कष्ट करुन वस्तू गोळा केल्या आणि ते श्रीमंत झाले. पण मी त्यांच्या सर्व गोष्टी शत्रूला देईन. यरुशलेमच्या राजाकडे पुष्कळ संपत्ती आहे. पण ती सर्व संपत्ती मी शत्रूला देईन. शत्रू ती सर्व संपत्ती बाबेल देशात नेईल.

Interlinear

Choose Theme