Home Bibles यिर्मया 15:8 · मराठी बायबल
यिर्मया 15:8 · मराठी बायबल

पुष्कळ स्त्रिया विधवा होतील. समुद्रातील वाळूच्यापेक्षा त्यांची संख्या जास्त असेल. भर मध्यान्ही मी संहारक आणीन. यहूद्यांच्या तरुण मुलांच्या आयांवर तो हल्ला करील. मी यहूदामधील लोकांना क्लेश देईन आणि त्यांच्यात घबराट निर्माण करीन. लवकरच मी हे घडवून आणीन.

Cross references

यशया 3:25

त्याच वेळी लढाईत तुमची माणसे तलवारीने मारली जातील. वीर लढाईत कामी येतील.

यिर्मया 4:16

“ही बातमी ह्या देशाला कथन करा. यरुशलेमच्या लोकांत ही बातमी पसरवा दुरवरच्या देशांतून शत्रू येत आहेत. यहुदाच्या विरुद्ध ते युद्धाची घोषण करीत आहेत.

यिर्मया 5:6

ते देवाच्या विरुद्ध गेले म्हणून जंगलातील सिंह त्यांच्यावर हल्ला करील. जंगलातील लांडगा त्यांना ठार मारील. चित्ता त्यांच्या शहराजवळ लपला आहे. शहरातून बाहेर येणाऱ्या प्रत्येकाचे तो तुकडे तुकडे करील. यहूदातील लोकांनी पुन्हा पापे केल्याने हे घडून येईल. ते, अनेक वेळा, देवापासून दूर भटकत गेले आहेत.

यिर्मया 6:4

“यरुशलेमविरुद्ध लढण्यास तयार व्हा. उठा! आपण दुपारी नगरावर हल्ला करु पण आधीच उशीर होत आहे. संध्याछाया लांबत आहेत.

यिर्मया 6:26

माझ्या लोकांनो, शोकवस्त्रे घाला. राखेत लोळा. मृतांसाठी आक्रोश करा. एकुलता एक मुलगा गेल्याप्रमाणे आकांत करा. कारण नाश करणारा अगदी लवकरच आपल्याकडे येईल.

लूक 21:35

खरोखर, तो पृथ्वीवर असणाऱ्या सर्व जिवंतांवर येईल.

Interlinear

Choose Theme