Home Bibles यिर्मया 1:14 · मराठी बायबल
यिर्मया 1:14 · मराठी बायबल

परमेश्वर मला म्हणाला, “उत्तरेकडून काहीतरी भयंकर आपत्ती येईल. ती ह्या देशातील सर्व लोकांवर येईल.

Cross references

यशया 41:25

“मी उत्तरेकडील एका माणसालाउठविले तो उगवत्या सूर्याच्या दिशेकडून म्हणजे पूर्वेकडून येत आहे. तो माझी उपासना करतो. कुंभार ज्याप्रमाणे चिखल तुडवितो, त्याप्रमाणे तो विशिष्ट माणूस राजांना तुडवेल.”

यिर्मया 4:6

खुणेचे ध्वज सियोनच्या दिशेने दाखवा. जीव वाचविण्यासाठी पळा. वाट पाहू नका. कारण मी उत्तरेकडून अरिष्ट आणीत आहे. मी भयानक विध्वंस घडवून आणीत आहे.”

यिर्मया 6:1

बन्यामीनच्या लोकांनो, जीव वाचविण्यासाठी पळा. यरुशलेमपासून दूर पळा. तकोवामध्ये तुतारी फुंका. बेथ-हक्करेमवर धोक्याचा इशारा देणारे निशाण उभारा. हे सर्व करा कारण उत्तरेकडून अरिष्ट येत आहे. भयानक नाश तुमच्याकडे येत आहे.

यिर्मया 6:22

परमेश्वर पुढे असे म्हणतो: “उत्तरेकडून सैन्य येत आहे. पृथ्वीवरच्या अतीदूरच्या ठिकाणाहून मोठे राष्ट्र येत आहे.

यिर्मया 10:22

मोठा आवाज ऐका! तो आवाज उत्तरेकडून येत आहे; यहुदातील शहरांचा तो नाश करील. युहदाचे निर्जन वाळवंट होईल. तेथे कोल्ह्यांची वस्ती होईल.

यिर्मया 25:9

म्हणून मी लवकरच उत्तरेकडील कुळांना बोलावून घेईन.” हा परमेश्वराचा संदेश आहे. “मी लवकरच बाबेलचा राजा नबुखद्नेस्सर ह्याला निरोप पाठवीन. तो माझा सेवक आहे. मी त्यांना यहूदा व यहूदातील लोक यांच्याविरुध्द उठवीन. तुमच्या देशाभोवतालच्या राष्ट्रांच्यासुद्धा विरोधात मी त्यांना आणीन. मी त्या सर्व देशांचा नाश करीन. मी त्या भूमीचे कायमचे ओसाड वाळवंट बनवीन. लोक ते देश व त्याचा वाईट प्रकारे झालेला नाश पाहतील व हळहळतील.

यिर्मया 31:8

लक्षात ठेवा, मी त्या उत्तरेकडच्या देशातून इस्राएलला आणीन. जगातील दूरदूरच्या ठिकाणाहून मी इस्राएलच्या लोकांना एकत्र करीन. काही लोक आंधळे आणि पंगू असतील. काही बायका गर्भवती असतील आणि त्यांच्या प्रसूतींची वेळ आली असेल. पण खूप खूप लोक परत येतील.

यिर्मया 46:20

“मिसर सुंदर गायीप्रमाणे आहे. पण उत्तरेकडून एक गोमाशी तिला त्रास देण्यास येत आहे.

यिर्मया 50:9

मी उत्तरेकडून खूप राष्ट्रांना एकत्र आणीन. ते बाबेलविरुद्ध लढायला सज्ज होतील. उत्तरेकडचे लोक बाबेल काबीज करतील. ते बाबेलवर बाणांचा वर्षाव करतील. ते बाण, युद्धावरुन रिकाम्या हाताने कधीच न परतणाऱ्या, सैनिकांप्रमाणे असतील.

यिर्मया 50:41

“पाहा! उत्तरेकडून लोक येत आहेत. ते एका शक्तिशाली राष्ट्रांतून येत आहेत. सर्व जगातील पुष्कळ राजे एकत्र येत आहेत.

योएल 2:20

मी उत्तरेकडून आलेल्या लोकांना तुमचा देश सोडायला भाग पाडीन. मी त्यांना रूक्ष आणि ओसाड देशात जायला लावीन. त्यातील काही पूर्व समुद्राकडे जातील. तर काही पश्चिम समुद्राकडे जातील. त्या लोकांनी फारच भयंकर कृत्ये केली आहेत. ते मृतांप्रमाणे व सडलेल्या गोष्टींसारखे होतील. तेथे भयंकर दुर्गधी पसरेल.”

Interlinear

Choose Theme