मी उत्तरेकडून खूप राष्ट्रांना एकत्र आणीन. ते बाबेलविरुद्ध लढायला सज्ज होतील. उत्तरेकडचे लोक बाबेल काबीज करतील. ते बाबेलवर बाणांचा वर्षाव करतील. ते बाण, युद्धावरुन रिकाम्या हाताने कधीच न परतणाऱ्या, सैनिकांप्रमाणे असतील.
Cross references
योनाथानच्या धनुष्याने आपल्या वाटच्या शत्रुंचे पारिपत्य केले शौलाच्या तलवारीने ही आपले बळी घेतले. सक्ताचे पाट वाहवून त्यांनी लोकांना वधिले, बलदंडांची हत्या केली.
कोरेश पारसचा राजा असताना त्याच्या कारकीर्दीच्या पहिल्या वर्षी परमेश्वराने त्याला एक घोषण करायला उद्युक्त केले. कोरेशने राज्यभर या फर्मानाची दवंडी पिटवली तसेच ते लिहूनही काढले. यिर्मयाच्या तोंडून परमेश्वराने वदविलेले वचन प्रत्यक्षात यावे म्हणून देवाची ही प्रेरणा होती. घोषणा पुढीलप्रमाणे होती:
देव म्हणाला,“जेथे काहीही उगवत नाही अशा ओसाड डोंगरावर ध्वज उभारा. लोकांना हाका मारा. हातांनी खुणा करा. त्यांना प्रतिष्ठितासाठी असलेल्या दारातून प्रवेश करायला सांगा.”
देव म्हणतो, “पाहा! बाबेलोनवर हल्ला करण्यासाठी मी मेदीचे सैन्य वापरीन. मेदीच्या सैन्याला चांदी, सोने दिले तरी ते हल्ला करीतच राहील.
काहीतरी भयंकर घडणार असल्याचा दृष्टान्त मला होत आहे. विश्वासघातकी तुझ्याविरूध्द जाताना मला दिसत आहे. लोक तुझी संपत्ती लुटून नेताना मी पाहतोय, एलाम, जा आणि लोकांवर चढाई कर. मादया, शहराला वेढा घाल आणि त्याचा पाडाव कर. त्या शहरातील सर्व दुष्कृत्ये मी नाहीशी करीन.
“मी उत्तरेकडील एका माणसालाउठविले तो उगवत्या सूर्याच्या दिशेकडून म्हणजे पूर्वेकडून येत आहे. तो माझी उपासना करतो. कुंभार ज्याप्रमाणे चिखल तुडवितो, त्याप्रमाणे तो विशिष्ट माणूस राजांना तुडवेल.”
परमेश्वराने स्वत: निवडलेल्या राजाला, कोरेशला पुढील गोष्टी सांगितल्या,“मी कोरेशचा उजवा हात धरीन. इतर राजांकडून सत्ता काढून घेण्यास मी त्याला मदत करीन. नगराच्या वेशी कोरेशला थोपवू शकणार नाहीत. मी वेशी खुल्या करीन. आणि कोरेश आत जाईल.”
यहूदातील लोकांनो, मी तुम्हाला तुमच्या शत्रूचे गुलाम करीन. तुम्हाला अनोळखी असलेल्या प्रदेशात तुम्ही गुलाम व्हाल. मी खूप रागावलो आहे. माझा राग प्रखर अग्नीसारखा आहे. त्यात तुम्ही जाळले जाल.”
उत्तरेकडचे राष्ट्र बाबेलवर चढाई करील. ते राष्ट्र बाबेलचे ओसाड वाळवंट करील. तेथे कोणीही राहणार नाही. माणसे व प्राणी, दोघेही, तेथून पळ काढतील”
“बाबेलविरुद्ध लढण्यास सज्ज व्हा. धनुर्धाऱ्यांनो बाबेलवर बाणांचा वर्षाव करा. त्यात कमतरता करु नका. बाबेलने परमेश्वराविरुद्ध पाप केले आहे.
परमेश्वर म्हणतो, “मराथाईमवर हल्ला करा. पकोडच्या लोकांवर चढाई करा. त्यांच्यावर हल्ला करा. त्यांना ठार करा. त्यांचा संपूर्ण नाश करा. माझ्या आज्ञेप्रमाणे करा.
दूरवरुन बाबेलवर चालून या. तिची धान्याची कोठारे फोडा. बाबेलचा संपूर्ण नाश करा. कोणालाही जिवंत सोडू नका. धान्याच्या राशीप्रमाणे प्रेतांच्या राशी घाला.
“धनुर्धाऱ्यांना बोलवा. त्यांना बाबेलवर हल्ला करायला सांगा. त्यांना शहराला वेढा घालायला सांगा. कोणालाही पळू देऊ नका. तिने केलेल्या दुष्कृत्यांची परतफेड करा. तिने इतर राष्ट्रांशी जसे वर्तन केले, तसेच तिच्याशी करा. बाबेलने परमेश्वराला मान दिला नाही. इस्राएलच्या पवित्र परमेश्वराशी तिने उध्दटपणा केला. म्हणून बाबेलला शिक्षा करा.
“पाहा! उत्तरेकडून लोक येत आहेत. ते एका शक्तिशाली राष्ट्रांतून येत आहेत. सर्व जगातील पुष्कळ राजे एकत्र येत आहेत.
परमेश्वर म्हणतो, “मी जोरदार वादळ निर्माण करीन. त्या वादळाचा तडाखा बाबेलला व तिच्या लोकांना देईन.
बाण धारदार करा! ढाली घ्या. परमेश्वराला मेद्यांच्या राजाकडून बाबेल नष्ट करायचे होते, म्हणून त्याने त्यांना स्फूर्ती दिली. बाबेलच्या लोकांना योग्य अशी शिक्षा परमेश्वर करील. बाबेलच्या सैन्याने यरुशलेममधील परमेश्वराचे मंदिर उध्वस्त केले. त्याबद्दल परमेश्वर त्यांना यथायोग्य शिक्षा करील.
“देशात युद्धाचे निशाण उभारा! सर्व राष्ट्रांमध्ये कर्णा फुंका. बाबेलविरुद्ध लढण्यासाठी राष्ट्रांना सज्ज करा. अरारात, मिन्नी, आष्कनाज या राज्यांना बाबेलवर चढाई करण्यासाठी बोलवा. तिच्याविरुद्ध लढणाऱ्या सैन्याच्या सेनापतीची निवड करा. टोळधाडीप्रमाणे घोडे पाठवा.