Home Bibles दानीएल 7:27 · मराठी बायबल
दानीएल 7:27 · मराठी बायबल

मग देवाचे खास लोक राज्य करतील. ते पृथ्वीवरच्या सर्व राज्यांतील सर्व लोकांवर राज्य करतील. हे राज्य कायम राहील. व इतर राज्यातील लोक त्याला मान देतील, त्याची सेवा करतील.”

Cross references

स्तोत्रसंहिता 22:27

दूरदूरच्या परदेशातील लोकांना परमेश्वराची आठवण येवो. आणि ते परमेश्वराकडे परत येवोत. सगळ्या परक्या देशांतील लोक परमेश्वराची उपासना करोत.

स्तोत्रसंहिता 72:11

सागळ्या राजांना आमच्या राजासमोर मुजरे करु दे सगळी राष्ट्रे त्याच्या सेवेत राहू दे.

स्तोत्रसंहिता 86:9

प्रभु तूच प्रत्येकाला निर्माण केलेत. ते सर्व येतील आणि तुझी उपासना करतील आणि तुझ्या नावाला मान देतील अशी मी आशा करतो.

स्तोत्रसंहिता 145:13

परमेश्वरा, तुझे राज्य सदैव राहील. तू सदैव राज्य करशील.

स्तोत्रसंहिता 149:5

देवाच्या भक्तांनो तुमच्या विजयाबद्दल आनंदी व्हा. झोपी गेल्यावरही आनंदी राहा.

यशया 9:7

त्याच्या राज्यात सामर्थ्य आणि शांती नांदेल. आणि दाविदच्या वंशाच्या ह्या राजाच्या काळात ती वाढतच जाईल. हा राजा सदासर्वकाळ सदाचार आणि प्रामाणिक न्यायबुध्दीने राज्य करील.सर्वशक्तिमान परमेश्वराला त्याच्या लोकांबद्दल अतिशय प्रेम आहे. ह्या प्रेमापोटीच ह्या सर्व गोष्टी घडून येतील.

यशया 49:23

राजे तुझ्या मुलांचे शिक्षक असतील. राजकन्या त्यांची काळजी घेतील. ते राजे व राजकन्या तुझ्यापुढे वाकतील. ते तुझ्या पायाची धूळ आपल्या मस्तकी लावतील. मग तुला कळेल की मीच परमेश्वर आहे. आणि माझ्यावर जो विश्वास ठेवतो त्याची निराशा होत नाही.”

यशया 54:3

का? कारण तुझा पसारा खूप वाढणार आहे. खूप राष्ट्रातील लोक तुझ्या मुलांना येऊन मिळणार आहेत. तुझे वंशज राष्ट्रांची व्यवस्था लावतील आणि नाश झालेल्या शहरातून पुन्हा तुझी मुले वस्ती करतील.

यशया 60:11

तुझे दरवाजे सदोदित उघडे राहतील. दिवस असो वा रात्र ते कधीही बंद होणार नाहीत. राष्ट्रे आणि राजे, त्यांची संपत्ती तुझ्याकडे आणतील.

दानीएल 2:44

चौथ्या राजाच्या कारकिर्दीत, स्वर्गातला देव आणखी एक राज्य निर्माण करील. ते कायमचे राहील. त्याचा कधीही नाश होणार नाही. ते दुसऱ्या घराण्याकडे सोपविता येणार नाही. हे राज्य इतर राज्यांना चिरडून टाकील, त्यांचा शेवट करील पण ते राज्य सदासर्वकाळ टिकून राहील.

दानीएल 4:34

ह्या काळाच्या अखेरीला मी नबुखद्नेस्सरने स्वर्गाकडे पाहिले आणि माझे मन ताव्व्यावर आले मग मी परात्पर देवाचे स्तवन केले. त्या चिरंतनाचा मी मान ठेवला त्याचे उपकार मानले.देवाचे प्रभुत्व अंखड आहे. त्याचे राज्य पिढ्यान्पिढ्या राहणारे आहे.

दानीएल 7:14

“मग त्या मनुष्यप्राण्याप्रमाणे दिसणाऱ्याला अधिकार, वैभव व संपूर्ण सत्ता देण्यात आली सर्व लोक राष्ट्रे व निरनिराळे भाषा बोलणारे सर्व त्याची सेवा करणार होते. त्याची सत्ता चिरंतन होती. त्याचे राज्य कायमचे होते. त्याचा कधीही नाश होणार नव्हता.

दानीएल 7:22

प्राचीन राजाने येऊन, त्याचा न्यायनिवाडा करीपर्यंत त्या लहान शिंगाने देवाच्या खास माणसांना ठार मारणे चालूच ठेवले. प्राचीन राजाने लहान शिंगाचा निकाल घोषित केला. त्याचा देवाच्या खास माणसांना फायदा झाला त्यांना राज्य मिळाले.

ओबद्या 1:21

विजेते सियोन पर्वतावर जातील, एसाव पर्वतावर राहणाऱ्या लोकांवर ते राज्य करतील. आणि राज्य परमेश्वराच्या मालकीचे होईल.

सफन्या 3:19

त्या वेळी, तुला हजा करणाऱ्यांना मी शिक्षा करीन. माझ्या इजा झालेल्या माणसांना मी वाचवीन. बळजबरीने दूर पळून जायला लागलेल्या माझ्या माणसांना मी परत आणीन. मी त्यांना कीर्ती मिळवून देईन. सर्व लोक त्यांची प्रशंसा करतील.

जखऱ्या 14:9

त्यावेळी, परमेश्वर सर्व पृथ्वीचा राजा असेल. परमेश्वर एकच आहे व त्याचे नावही “एक”च आहे.

लूक 1:33

याकोबाच्या घराण्यावर सर्वकाळासाठी तो सत्ता चालवील त्याच्या राज्याचा कधीही अंत होणार नाही.”

योहान 12:34

जमाव म्हणाला, “ख्रिस्त सर्वकाळ राहतो असे आम्ही नियमशास्त्रातून ऐकले आहे, तर मनुष्याच्या पुत्राला उंच केले पाहिजे असे तुम्ही का म्हणता? मनुष्याचा पुत्र कोण आहे?”

प्रकटीकरण 11:15

सातव्या देवदूताने त्याचा कर्णा वाजविला. तेव्हा स्वर्गात मोठ्याने आवाज झाले. ते आवाज म्हणाले:“जगाचे राज्य आता आमच्या प्रभुचे व त्याच्या ख्रिस्ताचे झाले आहे. आणि तो अनंतकाळपर्यंत राज्य करील.”

प्रकटीकरण 17:14

ते कोकऱ्याबरोबर युद्ध करतील पण कोकरा त्यांच्यावर मात करील. कारण तो प्रभूंचा प्रभु व राजांचा राजा आहे.आणि त्याच्याबरोबर त्याने बोलाविलेले, निवडलेले, विश्वासू अनुयायी असतील.”

प्रकटीकरण 19:16

त्याच्या झग्यावर आणि त्याच्या मांडीवर हे नाव लिहिले आहे:

प्रकटीकरण 20:4

नंतर ज्यांच्यावर लोक बसलेले आहेत, अशी काही सिंहासने मी पाहिली. या लोकांना न्यायनिवाडा करण्याचा अधिकारदेण्यात आला होता आणि येशूबाबतच्या सत्याविषयी साक्ष दिल्यामुळे व प्रभु देवाच्या संदेशामुळे ज्या लोकांना जिवे मारण्यातआले, त्यांचे आत्मे मी पाहिले. त्या लोकांनी श्र्वापदाची अथवा त्याच्या मूर्तीची उपासना केली नव्हती, आणि त्यांच्याकपाळावर किंवा हातावर त्या जनावराचा शिक्का मारलेला नव्हता. ते परत जिवंत झाले. आणि त्यांनी ख्रिस्ताबरोबर एकहजार वर्षे राज्य केले.

प्रकटीकरण 22:5

त्या नगरात यापुढे कधीहीरात्र होणार नाही. लोकांना प्रकाश मिळविण्यासठी ह्यापुढे कुठल्याही दिव्याची अथवा सूर्याची गरंज पडणार नाही; कारण प्रभुदेव आपला प्रकाश त्यांना पुरवील. आणि ते लोक अनंतकाळ राज्य करतील.

Interlinear

Choose Theme