पाहा! मी तुझे नाव माझ्या हातावर लिहिले आहे. मी नेहमी तुझाच विचार करतो.
Cross references
“हा सणाचा दिवस म्हणजे जणू काय तुम्हाला आठवण देण्याकरिता तुमच्या हाताला बांधलेल्या दोऱ्यासारखा होईल, तो तुम्हाला डोव्व्यांच्या दरम्यान चिन्ह असा होईल.त्याच्यामुळे तुम्हाला परमेश्वराच्या शिकवणुकीची आठवण होईल. तसेच परमेश्वराने आपल्या सामर्थ्याने तुम्हाला मिसरमधून बाहेर आणले याची आठवण करण्यास तो तुम्हाला मदत करील.
सियोन भोवती फिरा, शहर बघा, बुरुज मोजा.
तू तुझ्या हृदयावर जी मोहोर धारण करतोस, किंवा तुझ्या बोटात तुझा शिक्का असलेली अंगठी घालतोस त्याप्रमाणे तू मला तुझ्या अगदी जवळ ठेव. प्रेम मृत्यूसारखेच शक्तिशाली आहे. वासना थडग्यासारखी शक्तिमान आहे. त्याच्या ठिणग्या ज्वाला बनतात आणि त्याची खूप मोठी आग होते.
त्या वेळेस, यहुदात, लोक पुढील गाणे म्हणतील परमेश्वराने आम्हाला तारण दिले आहे. भक्कम तटबंदी व पुरेशी संरक्षणव्यवस्था असलेले आमचे शहर अभेद्द आहे.
वेशीच्या भिंतीवरील दगड माणकांचे बसवीन. वेशीच्या दारासाठी मी चकाकणारी रत्ने वापरीन. वेशीसाठी मी हिरेमाणके वापरीन.
“तुझ्या देशात पुन्हा कधीही हिंसेची वार्ता ऐकू येणार नाही. लोक तुझ्या देशावर पुन्हा कधीही चढाई करणार नाहीत. आणि तुला लुटणार नाहीत. तू तुझ्या वेशीला ‘तारण’ आणि तुझ्या दरवाजांना ‘स्तुती’ अशी नावे देशील.
“यरूशलेम, तुझ्या वेशीवर मी रखवालदार (संदेष्टा) ठेवतो. ते रखवालदार गप्प बसणार नाही. रांत्रदिवस ते प्रार्थना करीत राहतील.” रखवालदारांनो, तुम्ही देवाची प्रार्थना करीत राहिले पाहिजे त्याच्या वचनाची आठवण तुम्ही त्याला करून दिली पाहिजे. कधीही प्रार्थना करायचे थांबू नका.
“मी निश्र्चितपणे आहे म्हणूनच हे तुझ्याबाबत घडेल” हा परमेश्वराकडून आलेला संदेश आहे, “यहोयाकीन, यहोयाकीमच्या मुला, यहूदाच्या राजा, जरी तू माझ्या उजव्या हातातील मुद्रा असलास, तरीही मी तुला उखडून टाकले असते. तुझ्याबाबतीत असेच घडेल.
सर्वशक्तिमान परमेश्वर ह्या गोष्टी सांगत आहे शल्तीएलच्या मुला, जरुब्बाबेल, तू माझा सेवक आहेस मी तुझी निवड केली आहे, आणि त्यावेळी मी तुझा मुद्रांकित अंगठीप्रमाणे उपयोग करीन. मी ह्या गोष्टी केल्या आहेत ह्याचा तू साक्षी वा पुरावा असशील.”सर्वशक्तिमान परमेश्वराने ह्या गोष्टी सांगितल्या आहेत.
मी आत्म्याने भरुन गेलो असता देवदूत मलाएका उंच पर्वतावर घेऊन गेला. आणि त्याने पवित्र नगर, यरुशलेम, स्वर्गातून देवापासून खाली उतरताना मला दाखविले.