Home Bibles यशया 49:14 · मराठी बायबल
यशया 49:14 · मराठी बायबल

पण आता सियोन म्हणते, “परमेश्वराने मला सोडून दिले, माझा प्रभु मला विसरला.”

Cross references

स्तोत्रसंहिता 13:1

परमेश्वरा, तू मला आणखी किती काळ विसरुन जाणार आहेस? तू मला कायमचाच विसरणार आहेस का? किती काळापर्यंत तू माझा स्वीकार करायला नकार देणार आहेस?

स्तोत्रसंहिता 22:1

माझ्या देवा, माझ्या देवा तू मला का सोडून गेलास? तू इतका दूर आहेस की मला मदत करु शकणार नाहीस. तू इतका दूर आहेस की मी मदतीसाठी मारलेल्या हाका तुला ऐकू येणार नाहीत.

स्तोत्रसंहिता 31:22

मी घाबरलो आणि म्हणालो, “देव मला पाहू शकणार नाही अशा जागेत मी आहे.” परंतु देवा, मी तुझी प्रार्थना केली आणि तू माझी मदतीसाठी मोठ्याने केलेली प्रार्थना ऐकलीस.

स्तोत्रसंहिता 77:6

रात्री मी माझ्या गाण्याचा विचार करण्याचा प्रयत्न करतो. मी स्व:तशीच बोलतो आणि समजून घेण्याचा प्रयत्न करतो.

स्तोत्रसंहिता 89:38

पण देवा, तू तुझ्या निवडलेल्या राजावर रागावलास आणि तू त्याला एकटे सोडून दिलेस.

यशया 40:27

याकोब, हे खरे आहे इस्राएल, तू ह्यावर विश्वास ठेवावा. मग तुम्ही “मी कसा जगतो हे परमेश्वराला दिसू शकत नाही. देव मला शोधून शिक्षा करणार नाही.” असे का म्हणता?

यशया 54:6

तू परित्यक्ता स्त्रीप्रमाणे होतीस. तू मनातून फार दु:खी होतीस. पण देवाने तुला आपली मानले. पतीने तरूणपणीच सोडून दिलेल्या स्त्रीप्रमाणे तुझी अवस्था होती. पण परमेश्वराने तुला आपली मानले.

यिर्मया 23:39

पण तुम्ही माझ्या संदेशाला ‘भारी बोजाच’ म्हणालात. म्हणून मी तुम्हाला. मोठ्या ओझ्याप्रमाणे वर उचलून माझ्यापासून लांब फेकून देईन. मी तुमच्या पूर्वजांना यरुशलेम नगरी दिली. पण मी तुम्हाला आणि त्या नगरीला माझ्यापासून दूर फेकीन.

यिर्मया 31:3

खूप लांबून परमेश्वर लोकांना दर्शन देईल. परमेश्वर म्हणतो, “लोकांनो, मी तुमच्यावर प्रेम करतो आणि ते चिरंतर राहील. तुमची निष्ठ मी कायमची सांभाळीन.

विलापगीत 5:20

परमेश्वर आम्हाला कायमचा विसरला आहेस असे दिसते. तू आम्हाला दीर्घकाल सोडून गेला आहेस.

रोमकरांस 11:1

तर मग मी म्हणतो, “देवाने आपल्या लोकांना सोडून दिले आहे काय?” खात्रीने नाही! कारण मीही इस्राएली आहे. अब्राहामापासूनचा, बन्यामिन वंशातला.

Interlinear

Choose Theme