मी प्रकाश निर्माण केला आणि अंधारही. मी शांती निर्माण केली तशी संकटेही. मी परमेश्वर आहे व ह्यासर्व गोष्टी मी करतो.
Cross references
नंतर देव बोलला, “प्रकाश होवो” आणि प्रकाश चमकू लागला.
देवाने त्या ज्योति पृथ्वीवर प्रकाश पाडण्यासाठी आणि दिवसावर व रात्रीवर सत्ता चालविण्यासाठी आकाशात ठेवल्या. त्या ज्योतींनी प्रकाश व अंधार वेगळे केले. आणि देवाने पाहिले की हे चांगले आहे.
मग परमेश्वराने मोशेला सांगितले, “तू आपला हात आकाशात उंच कर म्हणजे अवघा मिसर देश अंधारात गडप होईल तो अंधार इतका दाट असेल की तुम्हाला चाचपडत जावे लागेल.”
अशा रीतीने तो उंच ढग मिसरचे लोक व इस्राएल लोक यांच्यामध्ये उभा राहिला; तेव्हा इस्राएल लोकांना प्रकाश मिळाला परंतु मिसरच्या लोकांभोंवती अंधार राहिला; त्यामुळे त्या रात्री मिसरचे लोक इस्राएल लोकांना गाठण्यासाठी जराही त्यांच्या जवळ जाऊ शकले नाहीत.
तू असे म्हणालास खरा, पण परमेश्वर काय म्हणाला ते तू ऐकले नाहीस काय?’ “पूर्वी, फार फार पूर्वीच मी हे सर्व योजले होते आणि आता त्याप्रमाणेच घडत आहे. मजबूत नगर उद्ध्वस्त होऊन तिथे नुसती दगडांची रास उरली आहे, हे तुझ्याहातून घडले ते माझ्यामुळेच.
ईयोबने बायकोला उत्तर दिले, “तू एखाद्या मूर्ख बाईसारखी बोलत आहेस. देव जेव्हा आपल्याला चांगल्या गोष्टी देतो तेव्हा आपण त्यांचा स्वीकार करतो. तसाच आपण संकटांचाही स्वीकार तक्रार न करता केला पाहिजे.” त्याच्या संकटकाळातसुध्दा ईयोबने पाप केले नाही. तो देवाच्याविरुध्द बोलला नाही.
परंतु तू हे तुझ्या हृदयात लपवून ठेवलेस तू तुझ्या हृदयात याची गुप्तपणे आखणी केलीस हे मला माहित आहे. तुझ्या मनात हेच होते याची जाणीव मला आहे.
देव गरीबांची मदतीसाठी हाक ऐकतो. परंतु गरीबांना मदत करायची नाही असे देवाने ठरवले तरी देवाला कुणी अपराधी ठरवू शकणार नाही. देवाने जर लोकांपासून लपून राहायचे असे ठरवले तर कोणालाही तो सापडू शकणार नाही. तो लोकांवर आणि राज्यांवर राज्य करणारा राज्यकर्ता आहे.
परमेश्वरा, तू तुझ्या हातांनी निर्माण केलेल्या आकाशाकडे मी बघतो तू केलेल्या चंद्र आणि ताऱ्यांकडे मी बघतो. आणि मला आश्चर्य वाटते.
परमेश्वर त्याच्या लोकांचे रक्षण करो. परमेश्वर त्याच्या माणसांना आशीर्वाद देवो.
देवा, तू दिवसावर आणि रात्रीवर नियंत्रण ठेवतोस. सूर्य आणि चंद्र तूच निर्माण केलेस.
देव न्यायाधीश आहे. कोणी मोठे व्हायचे ते देवच ठरवतो. देव एखाद्याला वर उचलतो आणि त्याला मोठे बनवतो. देव एखाद्याला खाली उतरवतो आणि त्याला मोठा करत नाही.
तू काळोखाला रात्र केलेस अशा वेळी रानटी जनावरे बाहेर येतात आणि इकडे तिकडे फिरतात.
देवाने केलेल्या गोष्टी पाहा. एखादी गोष्ट चुकीची आहे असे तुम्हाला वाटले तरी तुम्ही ती बदलू शकत नाही.
देव म्हणेल, “मी अश्शूरचा उपयोग छडीप्रमाणे करीन. रागाच्या भरात मी अश्शूरकडून इस्राएलला शिक्षा करीन.
पण खरा ज्ञानी परमेश्वर आहे. त्यांच्यावर संकटे आणणारा परमेश्वरच असेल. परमेश्वराची आज्ञा बदलण्याची ताकद लोकांत असणार नाही. पापी लोकांच्याविरूध्द (यहुदाच्याविरूद्द) देव उभा राहील आणि लढेल. ह्या पापी लोकांना मदत करणाऱ्या लोकांविरूध्द म्हणजे मिसरच्या लोकांविरूध्दही देव लढेल.
तू आता आहेस तसा तुला परमेश्वराने बनविले. तू आईच्या गर्भात असताना परमेश्वराने हे केले. परमेश्वर म्हणतो, “मी, परमेश्वराने प्रत्येक गोष्ट निर्माण केली. मी स्वत: आकाश तेथे ठेवले आणि माझ्यासमोर जमीन पसरली.”
परमेश्वराचा, तुमच्या देवाचा मान राखा. त्याचे स्तवन करा, नाहीतर तो अंधकार पसरवील. अंधकारमय टेकड्यांवर पडण्याआधीच त्याचे स्तुतिस्तोत्र गा. तुम्ही यहूदाचे लोक प्रकाशाची वाट पाहता, पण परमेश्वर प्रकाशाचे गाढ अंधकारात रुपांतर करेल. तो प्रकाशाला दाट अंधारात बदलेल.
मी राष्ट्र व राज्य ह्याबद्दल बोलण्याची वेळ येण्याचा संभव आहे. मी कदाचित् त्या राष्ट्राला वर ओढीन असे म्हणेन वा त्या राष्ट्रांला खाली खेचून त्या राष्ट्राचा वा राज्याचा नाश करीन असेही म्हणेन.
परमेश्वर म्हणतो, “परमेश्वर दिवसा सूर्याला प्रकाशित करतो आणि रात्री चंद्र व तारे यांना प्रकाशित करतो. परमेश्वर समुद्र घुसळतो म्हणून समुद्राच्या लाटा किनाऱ्यावर आदळतात. सर्वशक्तिमान परमेश्वर असे त्याला म्हणतात.”
परमेश्वर म्हणतो, “बाबेल, तू माझा दंडुका आहेस. तुझा उपयोग मी राष्ट्रांची शकले व राज्यांचा नाश करण्यासाठी केला.
सर्वश्रेष्ठ देवच इष्ट वा अनिष्ट घडण्याची आज्ञा देतो.
देव म्हणाला, “अथवा, कदाचित् मी हिंस्र प्राणी त्या देशात सोडीन आणि ते सर्व लोकांना ठार मारतील. त्या हिंस्र प्राण्यांमुळे कोणीही त्या देशामधून प्रवास करणार नाही.
तुझ्यावर पडणारा आकाशातील सर्व प्रकाश मी निस्तेज करीन. मी तुझ्या संपूर्ण देशाला अंधारात ठेवीन.” माझा प्रभु परमेश्वर ह्या गोष्टी म्हणाला आहे.
तो काळोखा, विषण्ण दिवस असेल. तो अंधकारमय व ढगाळ दिवस असेल. सूर्याेदयाच्या वेळी, तुम्हाला पर्वतावर सैन्य पसरलेले दिसेल. ते सैन्य प्रचंड न शक्तिशाली असेल. यापूर्वाे कधी झाले नाही आणि यापुढे पुन्हा असे कधी होणार नाही.
जर इषाऱ्याची रणशिंगे फुंकली गेली, तर लोक भीतीने थरथर कापणारच. जेव्हा नगरीवर संकट येते, तेव्हा परमेश्वर त्याला कारणीभूत असतो.
मी कोण आहे? पर्वत निर्माण करणारा मीच तो एकमेव! मी तुमच्या मनाची निर्मिती केली. मीच लोकांना कसे बोलायचे ते शिकविले. मीच पहाटेचे अंधारात परिवर्तन करतो. मी पृथ्वीवरील पर्वत माझ्या पायाखाली तुडवतो मी कोण आहे? माझे नाव याव्हे मी सैन्याचा परमेश्वर आहे.”
परमेश्वराकडे जा आणि जगा. तुम्ही परमेश्वराकडे गेला नाहीत, तर योसेफच्या घराला आग लागेल. ती आग योसेफचे घर भस्मसात करील. बेथेलमधील ही आग कोणीही विझवू शकणार नाही.
पण त्याच्या शत्रूंचा तो पूर्णपर्ण नाश करील पुराच्या लोंढ्याप्रमाणे परमेश्वर त्याना धुवून टाकील अंधारातून तो त्याच्या शत्रूंचा पाठलाग करील.
त्यांनी तुझी योजना प्रत्यक्षात आणली, हे सर्व तुइया सामर्थ्याने व तुइया इच्छेने घडले.
कारण देव, जो म्हणाला, “अंधारातून प्रकाश होवो.” त्याने तो प्रकाश, आमच्या अंत:करणात ख्रिस्ताच्या चेहेऱ्यात देवाच्या गौवाच्या ज्ञानात दाखवावा.
प्रत्येक उत्तम व परिपूर्ण देणगी वरून येते. स्वर्गीय प्रकाश ज्याने निर्माण केला त्या पित्यापासून ती येते. आणि ज्याच्यावर तारांगणाच्या हालचालीचा काहीही परिणाम होत नाही, अशा पित्यापासून ती देणगी येते.
तसेच ज्या देवदूतांनी आपली सार्वभौम सत्ता टिकवली नाही, परंतु आपली रहाण्याची जागा सोडून दिली, त्यांची देखीलतुम्हाला आठवण करुन द्यायला पाहिजे. देवाने त्यांना सर्वकालच्या बंधनांनी जखडून काळोखात ठेवले यासाठी की शेवटच्यामहान दिवशी त्यांचा न्याय करता यावा.
ते लोक आपल्या लज्जास्पद कामामुळेफेसाळणाऱ्या समुद्राच्या लाटांप्रमाणे आहेत, ते जणू काळ्याकुटृ अंधारात दडलेले तारे असे आहेत.