Home Bibles उत्पत्ति 1:17 · मराठी बायबल
उत्पत्ति 1:17 · मराठी बायबल

देवाने त्या ज्योति पृथ्वीवर प्रकाश पाडण्यासाठी आणि दिवसावर व रात्रीवर सत्ता चालविण्यासाठी आकाशात ठेवल्या. त्या ज्योतींनी प्रकाश व अंधार वेगळे केले. आणि देवाने पाहिले की हे चांगले आहे.

Cross references

उत्पत्ति 9:13

मी ढगात साप्तरंगी धनुष्य ठेवले आहे; ते सर्व पृथ्वी व माझ्यामध्ये केलेल्या कराराचा पुरावा म्हणून राहील.

ईयोब 38:12

“ईयोब, तुझ्या आयुष्यात तू कधीतरी पहाटेला आरंभ करायला आणि दिवसाला सुरु व्हायला सांगितलेस का?

स्तोत्रसंहिता 8:1

परमेश्वरा, माझ्या स्वामी तुझे नाव पृथ्वीवरील नावात सर्वात चांगले आहे, थोर आहे. तुझ्या नावाने तुला स्वर्गात गौरव प्राप्तकरुन दिला आहे.

स्तोत्रसंहिता 8:3

परमेश्वरा, तू तुझ्या हातांनी निर्माण केलेल्या आकाशाकडे मी बघतो तू केलेल्या चंद्र आणि ताऱ्यांकडे मी बघतो. आणि मला आश्चर्य वाटते.

प्रेषितांचीं कृत्यें 13:47

प्रभूने आम्हांला हे करण्यास सांगितले आहे. प्रभु म्हणाला:‘दुसऱ्या देशांसाठी मी तुम्हाला प्रकाश असे केले यासाठी की, तुम्ही पृथ्वीवरील सर्व लोकांना तारणाचा मार्ग दाखवू शकाल.”

Interlinear

Choose Theme