Home Bibles ☰ Books यशया 38:6 · मराठी बायबल
यशया 38:6 · मराठी बायबल

मी अश्शूराच्या राजापासून तुझा व ह्या शहराचा बचाव करीन.”‘22पण हिज्कीयाने यशयाला विचारले, “मी बरा होईन ह्याची खात्री पटण्यासाठी परमेश्वराचा संकेत काय असेल? मी परमेश्वराच्या मंदिरात जाण्यायोग्य होईन हे कसे ओळखायचे?”

Cross references

2 इतिहास 32:22

अशाप्रकारे परमेश्वराने अश्शूरचा राजा सन्हेरीब आणि त्याचे सैन्य यांच्यापासून हिज्कीया आणि यरुशलेमचे लोक यांचे संरक्षण केले. परमेश्वराला हिज्कीयाची आणि यरुशलेमच्या प्रजेची काळजी होती.

यशया 12:6

सीयोनवासीयांनो, तुम्ही गजर करा. कारण इस्राएलचा एकमेव पवित्र देव समर्थपणे तुमच्यामध्ये आहे. तेव्हा आनंदी व्हा..

यशया 31:4

परमेश्वराने मला सांगितले, “जेव्हा एखादा सिंह किंवा त्याचा छावा, खाण्यासाठी, जनावर पकडतो तेव्हा तो त्या मारलेल्या प्राण्यापाशी उभा राहून डरकाळ्या फोडतो. त्या वेळी कोणीही त्या शक्तिशाली सिंहाला घाबरवू शकत नाही. जरी माणसे आली आणि त्यांनी आरोळ्या ठोकल्या तरी तो सिंह भिणार नाही. लोकांनी कितीही कोलाहल केला तरी तो सिंह पळून जाणार नाही.”ह्याचप्रमाणे सर्वशक्तिमान परमेश्वर खाली उतरून सियोन पर्वतावर येईल. तो तेथे लढेल.

यशया 37:35

देव म्हणतो:मी ह्या शहराचे रक्षण करीन. आणि त्याला वाचवीन. मी हे माझ्यासाठी आणि माझा सेवक दाविदासाठी करीन.”

2 तीमथ्थाला 4:17

प्रभु माझ्या बाजूने उभा राहिला आणि मला सामर्थ्य दिले यासाठी की, माझ्याकडून संदेशाची पूर्ण घोषणा व्हावी व सर्व विदेश्यांनी ती ऐकावी. सिंहाच्या मुखातून त्याने मला सोडविले.

Interlinear

Choose Theme