Home Bibles यशया 12:6 · मराठी बायबल
यशया 12:6 · मराठी बायबल

सीयोनवासीयांनो, तुम्ही गजर करा. कारण इस्राएलचा एकमेव पवित्र देव समर्थपणे तुमच्यामध्ये आहे. तेव्हा आनंदी व्हा..

Cross references

गणना 23:21

देवाला याकोबाच्या माणसात काही चूक दिसली नाही. इस्राएल लोकांमध्ये देवाला पाप दिसले नाही. परमेश्वर त्यांचा देव आहे आणि तो त्यांच्या बरोबर आहे. थोर राजा त्यांच्या बरोबर आहे.

अनुवाद 23:15

“एखादा गुलाम कधी त्याच्या मालकाकडून पळून जाऊन तुमच्याकडे आला तर त्याला मालकाच्या स्वाधीन करु नका.

स्तोत्रसंहिता 9:11

सीयोनमध्ये राहाणाऱ्या लोकांनो, तुम्ही परमेश्वराची स्तुती करा. परमेश्वराने ज्या महान गोष्टी केल्या त्याबद्दल इतर देशांना सांगा.

स्तोत्रसंहिता 68:16

बाशान, तू सियोन पर्वताकडे तुच्छेतेने का पाहतोस? देवाला तो पर्वत (सियोन) आवडतो. परमेश्वराने कायमचे तिथेच राहाणे पसंत केले.

स्तोत्रसंहिता 71:22

आणि मी तंतुवाद्य वाजवून तुझी स्तुती करीन. देवा, तुझ्यावर विश्वास टाकणे शक्य आहे असे गाणे मी गाईन. माझ्या तंतुवाद्यावर मी इस्राएलाच्या पवित्र देवासाठी गाणी वाजवीन.

स्तोत्रसंहिता 89:18

परमेश्वरा, तू आमचा रक्षणकर्ता आहेस. इस्राएलचा पवित्र देव आमचा राजा आहे.

स्तोत्रसंहिता 99:2

सियोन मधला परमेश्वर महान आहे. तो सर्व लोकांवरचा महान नेता आहे.

स्तोत्रसंहिता 132:14

परमेश्वर म्हणाला, “ही जागा सदैव माझी राहील, मी माझ्यासाठी ही जागा निवडली. मी नेहमी इथे राहीन.

स्तोत्रसंहिता 135:21

परमेश्वराला सियोनहून त्याचे घर असलेल्या यरुशलेममधून धन्यवाद मिळोत. परमेश्वराची स्तुती करा.

यशया 8:18

“माझी मुले आणि मी इस्राएल लोकांकरिता निशाणी आणि पुरावे आहोत. सीयोनच्या डोंगरावर राहणाऱ्या सर्वशक्तिमान परमेश्वराने आम्हाला पाठविले आहे.”

यशया 10:24

माझा प्रभू, सर्वशक्तिमान परमेश्वर म्हणतो, “माझ्या सीयोनवासीयांनो, अश्शूरला घाबरू नका. मिसरने पूर्वी तुम्हाला जसे हरविले होते तसेच अश्शूर तुम्हाला हरवील. जणू काही अश्शूर तुम्हाला काठीने मारील.

यशया 24:23

यरूशलेममधील सीयोन पर्वतावर परमेश्वराचे राज्य असेल. त्या देवाचे तेज नेत्यांना दिसेल. त्याच्या तेजापुढे चंद्र ओशाळेल आणि सूर्याला लाज वाटेल.

यशया 30:19

यरूशलेमच्या सियोन डोंगरावर परमेश्वराची माणसे राहतील. तुमचा शोक थांबेल तुमचे रडणे परमेश्वर ऐकेल व तुमचे सांत्वन करील. परमेश्वर तुमचे म्हणणे ऐकेल आणि तुम्हाला मदत करील.

यशया 33:21

का? कारण सर्वशक्तिमान परमेश्वर तेथे आहे. त्या भूमीवर झरे व रूंद पात्रांच्या नद्या आहेत. पण तेथे शत्रूंच्या नावा अथवा जहाजे नसतील. त्या नावांवर काम करणारे तुम्ही लोक दोऱ्या सोडतात तसेच काम सोडू शकाल. तुम्ही डोलकाठी पुरेशी घट्ट करू शकणार नाही. तुम्हाला शीड उभारता येणार नाही का? कारण परमेश्वर आमचा न्यायाधीश आहे. परमेश्वरच आमचे कायदे करतो. परमेश्वर आमचा राजा आहे. तो आमचे रक्षण करतो. म्हणून तो आम्हाला खूप संपत्ती देईल. पंगूनासुध्दा युध्दात खूप धन मिळेल.

यशया 33:24

येथे राहणारा कोणीही “मी विटलो आहे” असे म्हणणार नाही. ज्यांना क्षमा केली गेली आहे असेच लोक तेथे राहतात.

यशया 40:9

सियोन, तुझ्याकडे सांगण्यासाठी एक सुर्वाता आहे. उंच डोंगरावर चढून जा आणि ही सुवार्ता ओरडून सांग. यरूशलेम, तुझ्यासाठी चांगली वार्ता आहे. घाबरू नकोस. मोठ्याने बोल.यहुदातील सर्व शहरांना ही वार्ता सांग, “हा पाहा तुमचा देव!

यशया 41:14

बहुमोल यहुदा, घाबरू नकोस. इस्राएलमधील माझ्या लाडक्या लोकांनो, भिऊ नका. मी खरोखरच तुम्हाला मदत करीन.” परमेश्वराने स्वत:च ह्या गोष्टी सांगितल्या. जो तुम्हाला वाचवितो तोच इस्राएलचा पवित्र देव हे बोलला.

यशया 41:16

तुम्ही त्या फेकून द्याल आणि वाऱ्याबरोबर वाहत जाऊन त्या सगळीकडे विखुरल्या जातील. नंतर तुम्ही परमेश्वराबद्दल आनंद मानाल. तुम्हाला इस्राएलच्या पवित्र (देवाबद्दल) अभिमान वाटेल.”

यशया 49:26

“त्या लोकांनी तुला दुखावले पण त्यांना स्वत:चेच मांस खायला मी लावीन. स्वत:च्याच रक्ताची त्यांना मद्यासारखी धुंदी चढेल. मी तुला वाचविले हे प्रत्येकाला माहीत होईल याकोबच्या सामर्थ्यवान परमेश्वराने तुझे रक्षण केले हे सर्वांना समजेल.”

यशया 52:7

“शांती प्रस्थापित झाली आहे चांगुलपणा आला आहे. तारण झाले आहे. सियोन, तुमचा देव हाच राजा आहे.” अशी घोषणा देवदूताकडून ऐकणे असे शुभवर्तमान घेऊन टेकड्यांवरून येणारा देवदूताचा आवाज ऐकणे ही खरोखरच विस्मयकारक गोष्ट आहे.

यशया 52:8

टेहळणी करणारेआरडाओरडा करतात. ते सर्व मिळून आनंद व्यक्त करीत आहेत का? कारण त्यांच्यातील प्रत्येकाने परमेश्वराला सियोनला परत येताना पाहिले आहे.

यशया 54:1

स्त्रिये, सुखी हो. तुला मुले नाहीत. पण तू सुखी असावेस. परमेश्वर म्हणतो, “एकट्या असणाऱ्या बाईला.नवरा असणाऱ्या बाईपेक्षा जास्त मुले होतील.”

यहेज्केल 43:7

मंदिरातील आवाज मला म्हणाला, “मानवपुत्रा, ही माझ्या सिंहासनाची व चरणासनाची जागा आहे. येथे मी इस्राएलच्या लोकांमध्ये कायमचा राहीन. इस्राएलचे लोक माझ्या पवित्र नावाला पुन्हा कलंक लावणार नाहीत. राजे आणि राजघराण्यातील लोक, व्याभिचाराचे पाप करुन अथवा राजांची प्रेते ह्या जागी पुरुन पुन्हा कधीही माझ्या नावाला बट्टा लावणार नाहीत.

यहेज्केल 48:35

“नगरीभोवतीचे अंतर 18,000 हात (6 मैल) असेल. या क्षणापासून नगरीचे नाव परमेश्वर तेथे आहे”असे पडेल.

योएल 2:27

मी इस्राएलच्या बाजूने आहे हे तुम्हाला समजेल. मीच परमेश्वर म्हणजे तुमचा देव आहे, हेही तुम्हाला कळून येईल. माझ्याशिवाय दुसरा कोणताच परमेश्वर नाही. माझ्या लोकांना पुन्हा कधीही लज्जित व्हावे लागणार नाही.”

सफन्या 2:5

पलिष्ट्यांनो, समुद्राकाठी राहणाऱ्या लोकांनो, परमेश्वराचा हा संदेश तुमच्यासाठी आहे. कनान मधील या फिलिस्ताईनच्या भूमीचा नाश होईल ते देश निर्जन होतील.

सफन्या 3:14

यरुशलेम, गा आणि सुखी हो! इस्राएल, आनंदाने जल्लोष कर!यरुशलेम, आनंदात राहा! मजा कर!

जखऱ्या 2:5

परमेश्वर म्हणतो, ‘मी तिचे रक्षण करणारा अग्नीची भिंत बनेन. तिला वैभव प्राप्त व्हावे म्हणून मी स्वत: तेथे राहीन.”

जखऱ्या 2:9

बाबेलच्या लोकांनी माझ्या लोकांना कैदी म्हणून पकडून नेले. आणि त्यांना गुलाम बनवले. पण मी त्यांचा पराभव करीन आणि ते माझ्या लोकांचे गुलाम होतील. तेव्हा तुम्हाला पटेल की सर्वशक्तिमान परमेश्वराने मला पाठविले आहे.”

जखऱ्या 2:10

परमेश्वर म्हणतो, “सियोने, खूष हो! का? कारण मी येत आहे व मी तुझ्या नगरीत राहीन.

जखऱ्या 8:3

परमेश्वर म्हणतो, “मी सियोनला परत आलो आहे. मी यरुशलेमला रहात आहे. यरुशलेम “निष्ठावान नगरी म्हणून ओळखली जाईल. सर्व शक्तिमान परमेश्वराचा पर्वत, “पवित्र पर्वत” म्हणून ओळखला जाईल.”

लूक 19:37

जेव्हा तो जैतून डोंगराच्या उतरणीवर आला तेव्हा सर्व जनसमुदाय, त्यांनी जे चमत्कार पाहिले होते त्याबद्दल मोठ्या आनंदाने देवाची स्तुति करु लागले.

Interlinear

Choose Theme