Home Bibles यशया 37:31 · मराठी बायबल
यशया 37:31 · मराठी बायबल

“यहुदाच्या वंशातील काही लोक वाचले त्या थोड्या लोकांचे खूप मोठे राष्ट्र होईल. मुळे खोलवर रूजून भक्कम वाढणाऱ्या झाडांप्रमाणे ते लोक असतील मुळे खोल रूजलेल्या झाडांना खूप फळे लागतात. त्याचप्रमाणे ह्या लोकांना पुष्कळ संतती होईल.

Cross references

2 राजे 19:30

यहूदाच्या घराण्यातील उरल्यासुरल्या लोकांचा वंश वाढेल.

स्तोत्रसंहिता 80:9

तू त्या “वेलीसाठी” जमीन तयार केलीस. त्या “वेलीची” मुळं जोमाने वाढावीत म्हणून प्रयत्न केलेस. थोड्याच अवधीत ती वेल सर्व देशभर पसरली.

यशया 1:9

सर्व शक्तिमान परमेश्वराने काही लोकांना जिवंत ठेवले नसते तर सदोम अथवा गमोरा ह्या शहरांप्रमाणे आपला संपूर्ण नाश झाला असता.

यशया 6:13

पण लोकसंख्येचा दहावा हिस्सा ह्या भूमीवर राहतील. त्यांचा नाश होणार होता तरीही ते परमेश्वराकडे परत येतील. हे लोक एलाच्या झाडाप्रमाणे असतील. एलाचे झाड कापले तरी बुडखा शिल्लक राहतोच. हे राहिलेले लोक त्या बुडख्याप्रमाणे असतील. हे लोक खास बीज म्हणजेच देवाची लाडकी लेकरे असतील.

यशया 10:20

त्यावेळी याकोबचे जे वंशज इस्राएलमध्ये राहत असतील ते त्यांना मारणाऱ्या माणसावर अवलंबून राहणे सोडतील आणि इस्राएलच्या पवित्र परमेश्वरावर मनापासून श्रध्दा ठेवायला शिकतील.

यशया 10:21

याकोबचे हे राहिलेले वंशज पुन्हा सामर्थ्यशाली देवाला अनुसरतील.

यशया 10:22

समुद्रकाठच्या वाळूच्या कणांप्रमाणे तुझे लोक खूप असले तरी त्यातील फक्त थोडेच परमेश्वराकडे परत येतील. ते देवाकडे वळतील पण त्यापूर्वी देशाचा नाश केला जाईल. देवाने घोषित केले आहे की तो देश उध्वस्त करणार आहे. नंतर चांगुलपणा देशात येईल. तो दुथडीभरून वाहाणाऱ्या नदीसारखा असेल.

यशया 27:6

ज्याप्रमाणे खोलवर गेलेली मुळे झाडालाभक्कम आधार देतात. त्याप्रमाणे माझ्याकडे आलेली ही माणसे याकोबचे हात मजबूत करतील. ही माणसे, फुलू लागलेल्या झाडाप्रमाणे, इस्राएलचा विकास करतील. फळांनी बहरलेल्या वृक्षाप्रमाणे इस्राएलची मुले हा देश व्यापून टाकतील.”

यशया 65:9

मी याकोबच्या (इस्राएलच्या) काही लोकांना ठेवीन. यहूदातील काही लोकांना माझा डोंगर मिळेल. माझे सेवक तेथे राहतील. तेथे राहण्यासाठी मी लोकांची निवड करीन.

यिर्मया 30:19

“तेथील लोक स्तुतिस्तोत्रे गातील. तेथे हास्याच्या लहरी उठतील. त्यांना मी पुष्कळ संतती देईन इस्राएल व यहूदा यांचा आकार लहान राहणार नाही मी त्यांना मान मिळवून देईन. कोणीही त्यांना खाली पाहणार नाही.

यिर्मया 44:28

काही लोक तलवारीच्या वारातून निसटतील ते मिसरमधून यहूदाला परत येतील पण असे लोक फारच थोडे असतील. मग वाचलेल्या व मिसरमध्ये राहायला आलेल्या लोकांना कोणाचे शब्द खरे ठरले ते कळेल. ‘माझे शब्द खरे ठरले की त्यांचे’ ते त्यांना समजेल.

रोमकरांस 9:27

आणि यशया इस्राएलाविषयी असे ओरडून सांगतो की,“जरी इस्त्राएलाविषयी मुलांची संख्या समुद्राच्या वाळूसारखी असली तरी त्यांच्यातील फक्त थोडेच तारण पावतील.

रोमकरांस 11:5

त्याच प्रमाणे हल्ली देवाच्या कृपेच्या निवडीप्रमाणे काही शिल्लक राहिले आहेत.

गलतीकरांस 3:29

आणि जर तुम्ही ख्रिस्ताचे आहात तर तुम्ही अब्राहामाचे संतान आणि देवाने अब्राहामाला

Interlinear

Choose Theme