Home Bibles 2 इतिहास 32:14 · मराठी बायबल
2 इतिहास 32:14 · मराठी बायबल

माझ्या पूर्वजांनी इतर देशांना मातीला मिळवले. आपल्या लोकांना विनाशातून सोडवण्याची माझ्यासमोर कोणत्याही देवताची प्राज्ञा नाही. तेव्हा तुमचे दैवत तरी तुम्हाला वाचवू शकेल असे वाटते का?

Cross references

निर्गम 14:3

त्यामुळे इस्राएल लोक रानात वाट चुकले आहेत व गोंधळल्यामुळे राहण्यासाठी त्यांना जागा सापडत नाही असे फारोला वाटेल.

निर्गम 15:9

शत्रु म्हणाला, ‘मी त्यांचा पाठलाग करीन, त्यांना गाठीन, मी त्यांची सर्व संपत्ती लुटून घेईन; त्यामुळे माझा जीव तृप्त होईल. माझ्या तलवारीने त्यांचे सर्व काही हिरावून घेईन; माझ्या हातांनी त्यांचे सर्वकाही मी स्वत: करिता घेईन.’

यशया 10:10

मी त्या दुष्ट राज्यांचा पराभव केला आणि आता मी त्यांच्यावर सत्ता गाजवितो. त्यांच्या पूजेच्या मूर्ती यरूशलेममधील व शोमरोनमधील मूर्तीपेक्षा चांगल्या आहेत.

यशया 10:11

मी शोमरोनचा व तेथील मूर्तीचा पराभव केला. तसेच मी यरूशलेमचे करीन.”‘

यशया 42:8

“मी परमेश्वर आहे माझे नाव यहोवा, मी माझे गौरव दुसऱ्यांना देणार नाही. माझ्याकरिता असलेली स्तुती मी मूर्तीच्या (खोट्या देवांच्या) वाट्याला येऊ देणार नाही.

Interlinear

Choose Theme