शुष्क वाळवंट सुखी होईल. वाळवंट आनंदी होईल आणि फुलासारखे फुलेल.
Cross references
देवा, सियोन पर्वत आनंदी आहे यहूदाची शहरे तुझ्या चांगल्या निर्णयामुळे उल्हासित झाली आहेत.
सियोन ऐक आणि आनंदी हो यहुदाच्या शहरांनो, आनंदी व्हा का? कारण परमेश्वर योग्य निर्णय घेतो.
ह्याच वेळी परमेश्वराचे रोपटे (यहुदा) खूप सुंदर व महान होईल. त्या वेळी इस्राएलमध्ये राहणाऱ्यांना भूमीतून पिकणाऱ्या सर्व गोष्टींचा अभिमान वाटेल.
ज्याप्रमाणे खोलवर गेलेली मुळे झाडालाभक्कम आधार देतात. त्याप्रमाणे माझ्याकडे आलेली ही माणसे याकोबचे हात मजबूत करतील. ही माणसे, फुलू लागलेल्या झाडाप्रमाणे, इस्राएलचा विकास करतील. फळांनी बहरलेल्या वृक्षाप्रमाणे इस्राएलची मुले हा देश व्यापून टाकतील.”
त्या वेळेला तटबंदी असलेले शहर वाळवंटाप्रमाणे ओसाड होईल. सर्व लोक दूर पळून गेलेले असतील. ते शहर चरायचे कुरण होईल. तेथे वासरे चरतील. गुरे वेलींची पाने खातील.
हे सत्य आहे: काही काळानंतर कर्मेलच्या डोंगरावरील भूमीप्रमाणे लबानोनची भूमी सुपीक होईल आणि कर्मेलच्या भूमीवर घनदाट जंगल माजेल.
देव वरून त्याचा आत्मा आम्हांला देईपर्यंत असेच घडत राहील. आता या भूमीवर चांगुलपणा राहिला नाही. ही भूमी जणू वाळवंट झाली आहे. पण भविष्यात, ते वाळवंट कर्मेल प्रमाणे होईल. तेथे योग्य न्याय नांदेल आणि कर्मेल हिरव्यागार रानासारखे होईल. चांगुलपणा तेथे वस्ती करील.
ऐका! कोणीतरी ओरडत आहे, “परमेश्वरासाठी वाळवंटातून मार्ग काढा. आमच्या देवासाठी वाळवंटात सपाट रस्ता तयार करा.
वैराण टेकड्यांवर मी नद्या वाहायला लावीन आणि दऱ्यांतून झऱ्याचे पाणी वाहायला लावीन. मी वाळवंटाचे रूपांतर पाण्याने भरलेल्या सरोवरात करीन. त्या शुष्क भूमीवर पाण्याचे झरे वाहतील.
त्याचप्रमाणे परमेश्वर सियोनचे आणि तिच्या उदध्वस्त ठिकाणांचे सांत्वन करील. परमेश्वराला तिच्याबद्दल आणि तिच्या लोकांबद्दल खूप वाईट वाटेल. तो तिच्यासाठी खूप काही करील. परमेश्वर वाळवटांचे रूप बदलेल. ते एदेनच्या बागेसारखे होईल. ती ओसाड जमीन देवाच्या बागेसारखी होईल. तेथील लोक खूप खूप सुखी होतील. ते आनंद व्यक्त करतील. ते आभाराची व विजयाची गीते गातील.
यरूशलेमा, तुझ्या नाश झालेल्या इमारती पुन्हा आनंदित होतील. तुम्ही सर्व मिळून आनंद साजरा कराल का? कारण परमेश्वराने त्याच्या लोकांना सुखी केले आहे. त्याने यरूशलेमला मुक्त केले आहे.
माझे शब्द आनंदाने बाहेर जातील आणि शांती घेऊन येतील. डोंगर आणि टेकड्या आनंदाने नाचू लागतील. शेतांतील झाडे आनंदाने टाळ्या वाजवतील.
“परमेश्वर मला अत्यंत सुखी ठेवतो. देवामुळे मी सर्वस्वी सुखी आहे. परमेश्वर मला तारणाचे कपडे घालतो. हे कपडे स्वत:च्या लग्नात घालायच्या कपड्यांप्रमाणे सुंदर आहेत. परमेश्वर चांगुलपणाचा अगंरखा मला घालतो. वधूवेशाप्रमाणे हा अंगरखा सुंदर आहे.
यरूशलेम, सुखी हो! यरूशलेमवर प्रेम करणारे तुम्ही लोकहो, सुखी व्हा! यरूशलेमला दु:खकारक गोष्टी घडल्या म्हणून तुमच्यातील काही लोकांना दु:ख झाले आहे. पण आता तुम्ही सुखी व्हावे.
वाटसरु म्हणतील, ‘पूर्वी, ह्या प्रदेशाचा विद्ध्वंस झाला. पण आता तोच एदेनच्या बागेप्रमाणे झाला आहे. शहरांचा नाश झाला. ती उद्ध्वस्त व ओसाड झाली. पण आता ती सुरक्षित आहेत आणि त्यांत लोकांनी वस्ती केली आहे.”
मी इस्राएलासाठी दहिवराप्रमाणे होईन. इस्राएल लिलीप्रमाणे फुलेल, लबानोनमधील गंधसरूंप्रमाणे तो फोफावेल.
यानंतर मी मोठ्या जनसमुदायाच्या गर्जनेसारखा स्वर्गातून आवाज ऐकला. ते म्हणत होते:“हालेलुया! तारण, गौरव आणि सत्ता आमच्या देवाची आहेत