Home Bibles यशया 3:24 · मराठी बायबल
यशया 3:24 · मराठी बायबल

आता या स्त्रियांजवळ मधुर सुवासाची अत्तरे आहेत पण देव त्यांना शिक्षा करील त्या वेळी त्या अत्तरांना बुरशी येऊन कुजट घाण येईल. आता या स्त्रिया कमरपट्टे वापरतात पण त्या ऐवजी दोऱ्या वापरण्याची वेळ त्यांच्यावर येईल. आता त्या विविध केशरचना करतात पण नंतर त्यांच्या डोक्यावर केसच नसतील. त्यांचे केशवपन होईल. त्यांच्या मेजवान्यांसाठी असलेल्या विशेष वस्त्रप्रावरणांऐवजी त्यांना जे कपडे घालावे लागतील त्यातून त्यांची वाईट स्थिती दिसून येईल. त्यांच्या चेहेऱ्यावरील सौंदर्यखुणांच्या जागी भाजल्याचे डाग पडतील.

Cross references

लेवीय 26:16

तुम्ही तसे कराल तर मग तुम्हावर भयंकर संकटे येतील असे मी करीन; क्षयरोग व ताप ह्यांनी मी तुम्हाला पीडीन; ती तुमची दृष्टी नष्ट करतील, व तुमचा जीव घेतील; तुम्ही बियाणे पेराल पण तुम्हाला यश मिळणार नाही-तुम्हाला पीक मिळणार नाही-आणि तुमचे शत्रू तुमचे धान्य खाऊन टाकतील.

अनुवाद 28:22

परमेश्वर तुम्हाला रोग, ताप, सूज यांनी शिक्षा करील. उष्णता भयंकर वाढेल आणि अवर्षण पडेल. पिके होरपळून आणि कीड पडून करपून जातील. तुमचा नाश होईपर्यंत ही संकटे तुमच्या पाठीस लागतील.

अनुवाद 32:24

भुकेने ते कासावीस होतील. भयंकर रोगराईने ते नेस्तनाबूत होतील. वन्यपशू त्यांच्यावर सोडीन. विषारी साप व सरपटणारे प्राणी त्यांना दंश करतील.

एस्तेर 2:12

राजा अहश्वेरोशकडे जाण्याची पाळी येण्यापूर्वी प्रत्येक मुलीला पुढील सोपस्कारातून जावे लागे. तिला बारा महिने सौदर्येपचार घ्यावे लागत. त्यापैकी सहा महिने गंधरसाच्या तेलाचे व सहा महिने सुंगधी द्रव्ये आणि प्रसाधने यांचे उपचार होत.

ईयोब 16:15

“मी फार दु:खी आहे म्हणून मी दु:खाचे कपडे घालतो. मी इथे धुळीत आणि राखेत बसतो आणि मला पराभूत झाल्यासारखे वाटते.

नीतिसूत्रे 7:17

मी माझ्या अंथरुणावर अत्तर शिंपडले आहे. मी बोळ, अगरु आणि दालचिनीचा वापर केला आहे.

नीतिसूत्रे 31:24

ती खूप चांगली उद्योगी - स्त्री असते. ती कपडे आणि पट्टे तयार करते आणि ती त्या वस्तू त्या व्यापाऱ्यांना विकते.

यशया 4:4

सीयोनमधील स्त्रियांचे रक्त परमेश्वर धुवून टाकील. यरूशलेमलाही परमेश्वर निर्मळ करील. देव न्यायीपणाचा आत्मा वापरून योग्य न्याय करील आणि प्रत्येक गोष्ट जळणाऱ्या आत्म्याद्वारे शुध्द करील.

यशया 15:2

राजघराणे व दीबोनमधील लोक गाऱ्हाणे गायला पूजास्थानाला जात आहेत. नबो व मेदबा यांच्यासाठी मवाबचे लोक रडत आहेत. आपले दु:ख प्रकट करण्यासाठी सर्वांनी मुंडन केले आहे व दाढी केली आहे.

यशया 15:3

मवाबमधील सर्वांनी घरादारातील सर्वांनी काळे कपडे घातले आहेत व ते रडत आहेत.

यशया 22:12

म्हणून माझा प्रभू, सर्वशक्तिमान परमेश्वर तुमच्या मृत मित्रांसाठी शोक करण्यास व रडण्यास सांगेल. लोक मुंडन करून शोकप्रदर्शक वस्त्रे घालतील.

यशया 32:9

तुम्ही काही स्त्रिया आता शांत आहात. तुम्हाला आता सुरक्षित वाटते आहे. पण तुम्ही जरा उभे राहून माझे म्हणणे ऐकावे.

यशया 57:9

तुम्ही मोलेखला चांगले दिसावे म्हणून तेले आणि अत्तरे वापरता. तुम्ही तुमचे दूत अती दूरच्या देशांत पाठविले. हे तुमचे कृत्यु तुम्हाला अधोलोकात पोहोचवील.

यिर्मया 4:8

म्हणून शोकवस्त्रे घाला आणि मोठ्याने आक्रोश करा. का? कारण परमेश्वर आमच्यावर रागावला आहे.”

यिर्मया 6:26

माझ्या लोकांनो, शोकवस्त्रे घाला. राखेत लोळा. मृतांसाठी आक्रोश करा. एकुलता एक मुलगा गेल्याप्रमाणे आकांत करा. कारण नाश करणारा अगदी लवकरच आपल्याकडे येईल.

यिर्मया 48:37

प्रत्येकाने मुंडन व दाढी केली आहे. प्रत्येकाचा हात कापला आहे व त्यातून रक्त वाहत आहे.प्रत्येकजण शोकप्रवर्तक वस्त्रे कमरे भोवती गुंडाळत आहे.

यिर्मया 49:3

“हेशबोनच्या लोकांनो, रडा का? कारण आयचा नाश झाला आहे. अम्मोनच्या राब्बातील स्त्रियांनो, शोक करा. शोकप्रदर्शक कपडे घालून रडा! सुरक्षेसाठी शहराकडे पळा! का? कारण शत्रू येत आहे. ते मिलकोम दैवताला, त्याच्या पुजाऱ्याला व इतर अधिकाऱ्यांना नेतील.

विलापगीत 2:10

सियोनेची वडिल धारी मंडळी अगदी मूकपणे धुळीत बसते. ते डोक्यात माती भरून घेतात. ते गोणपाटाचे कपडे घालतात. यरुशलेमच्या तरुणी दु:खाने मान खाली घालून बसतात.

यहेज्केल 7:18

ते शोकप्रदर्शक कपडे घालतील आणि अतिशय भयभीत होतील. प्रत्येक चेहरा लज्जित झालेला तुम्हाला दिसेल. दु:ख प्रकट करण्यासाठी ते आपली डोकी भादरतील.

यहेज्केल 27:31

ते तुझ्यासाठी डोक्यावरचे सर्व केस कापतील. शोकप्रदर्शक कपडे घालतील. मृतासाठी करतात तसे ते तुझ्यासाठी शोक करतील.

योएल 1:8

एखाद्या तरुण वाग्दत्त वधूचा भावी पती मारला गेल्यावर ती जशी रडते, तसे रडा!

आमोस 8:10

मी तुमचे उत्सव शोकदिनांत बदलीन. तुमची सर्व गाणी ही मृतांसाठीची शोकागीते होतील. मी प्रत्येकाला शोकप्रदर्शक कपडे घालीन. मी प्रत्येक डोक्याचे मुंडन करीन. एकुलता एक मुलगा गेल्यावर जसा आकांत होतो, तसा मी करीन. तो फारच कडू शेवट असेल.”

मीखा 1:16

म्हणून केसा कापा, मुंडन करा.का? कारण तुम्हाला प्रिय असलेल्या मुलांसाठी तुम्ही शोक कराल. गरुडा प्रमाणे तुम्ही स्वत:चे डोक्याचे मुंडन करुन कराल. गरुडा प्रमाण तुम्ही स्वत:चे डोक्याचे मुंडन करुन घ्या आणि दु:ख प्रगट करा. का? कारण तुमच्या मुलांना तुमच्यापासून दूर नेले जाईल.

1 पेत्र 3:3

तुमची सुंदरता बाह्यस्वरुपाची नसावी म्हणजे वेगवेगळ्या प्रकारे केस सुशोभित करण्याने, सोन्याचे दागिने वापरण्याने किंवा चांगले कपडे घातल्याने आलेली नसावी.

प्रकटीकरण 11:3

आणि मी माझ्या दोन साक्षीदारांना सामर्थ्य देईन.ते देवाचा संदेश 1,260 दिवस देतील. ते तागाची वस्त्रेघालतील.”

प्रकटीकरण 16:9

भयंकरअशा उष्णतेमुळे लोक जळाले. त्या लोकांनी देवाच्या नावाला शिव्याशाप दिले की ज्याला या संकटांवर ताबा आहे. पणलोकांनी पश्चात्ताप करण्याचे नाकारले व देवाचे गौरव करण्याचे नाकारले.

प्रकटीकरण 18:9

पृथ्वीवरील ज्या राजांनी त्या स्त्रीशी व्यभिचार केला, आणि जे तिच्या विलासाच्या दिवसाचे भागीदार झाले, ते ती जळतअसताना निघणारा धूर पाहून रडतील आणि तिच्याबद्दल शोक करतील.

Interlinear

Choose Theme