तो जमिनीची मशागत करतो आणि मग पेरणी करतो. तो निरनिराळ्या बियांची पेरणी निरनिराळ्या तऱ्हेने करतो. तो बडिशेप विखरून टाकतो, जिरे शेतात फेकतो तर गहू ओळीत पेरतो. तो सातू विशिष्ट जागेत पेरतो तर शेताच्याकडेला काठ्या गहू पेरतो.
Cross references
यावेळी सातूचे दाणे तयार होऊन तो कापणीला आला होता व जवसाला बोंडे आली होती. ह्या पिकांचा आता नाश झाला.
देव असेही म्हणाला, “तू भाकरीसाठी थोडे धान्य मिळविले पाहिजे. गहू, सातू, कडधान्य, मसूर, मक्का व खपल्या गहू घे. तो एका भांड्यात एकत्र करुन दळ. भाकरी करण्यासाठी तू हे पीठ वापरशील. तू एका कुशीवर 390 दिवस झोपला असताना फक्त ह्याच पिठाच्या भाकरी खाशील.
परूश्यांनो, नियमशास्त्राच्या शिक्षकांनो, तुम्ही दु:खी व्हाल. तुम्ही ढोंगी आहात! तुमचे जे काही आहे त्याचा दशांश तुम्ही देवाला देता- पुदिना, शेप, जिरे यांचा देखील दंशाश देता. पण नियमशास्त्राच्या महत्त्वाच्या गोष्टी म्हणजे- न्यायाने वागणे, दया दाखविणे व प्रामाणिकपणे वागणे हे तुम्ही पाळत नाही. या गोष्टी तुम्ही केल्या पाहिजेत व तसेच इतरही केल्या पाहिजेत.