माझ्या प्रभूने, सर्वशक्तिमान परमेश्वराने मला सांगितले, ‘राजप्रासादातील कारभारी शेबना याच्याकडे जा. तो राजवाड्याचा कारभार पाहतो.
Cross references
अहीशार हा राजाच्या महालातील सर्व गोष्टींचा प्रमुख होता.अब्दाचा मुलगा अदोनीराम गुलामांच्या खात्याचा प्रमुख होता.
ग, अहाबच्या घराची देखभाल करणारा अधिकारी, नगराधिकारी, वडीलधारी मंडळी आणि त्या मुलांचे पालक यांनी येहूला खालील प्रमाणे संदेश पाठवला, “आम्ही तुझे सेवक आहोत. तू म्हणशील ते आम्ही करु. आम्ही कोणालाच राजा करत नाही. तुला योग्य वाटेल ते कर.”
तेथून त्यांनी राजाला निरोप पाठवला. राजाचा खानगीकडील कारभारी एल्याकिम (हा हिल्कीयाचा मुलगा) चिटणीस शेबना आणि नोंदणी लेखक व आसाफचा मुलगा यवाह हे त्यांना भेटायला तेव्हा पुढे आले.
तेव्हा हिल्कीयाचा मुलगा एल्याकीम, शेबना आणि यवाह हे सेनापतीला म्हणाले, “आमच्याशी तू कृपया अरामी भाषेत बोल. आम्हाला ती भाषा कळते. यहूदी भाषेत बोलू नको. कारण नाही तर तटबंदीवरील लोक आपले बोलणे ऐकतील.”
हिल्कीयाचा मुलगा एल्याकीम (एल्याकीम राजवाड्याचा कारभारी होता) चिटणीस शेबना आणि असाफचा मुलगा यवाह (हा नोंदी करणारा होता.) हिज्कीयाकडे आले. शोकाकुल होऊन त्यांनी वस्त्रे फाडली होती. अश्शूरचा सेनापती काय म्हणाला ते त्यांनी हिज्कीयाला सांगितले.
कारभारी एल्याकीम, चिटणीस शेबना आणि वडीलधारे याजक यांना हिज्कीयाने आमोजचा मुलगा यशया या संदेष्ट्यांकडे पाठवले. त्यांनीही दु:ख प्रदर्शित करणारे जाडेभरडे कपडे घातले होते.
राजाच्या मालमत्तेची जपणूक करणारे आधिकारी पुढीलप्रमाणे:अदीएलचा मुलगा अज्मावेथ हा राजाच्या भांडारांचा प्रमुख होता. शेतीवाडी, नगरे, गावे आणि किल्ले इथे असलेल्या भांडारांचा प्रमुख योनाथान हा होता. हा उज्जीयाचा मुलगा.
यरूशलेममधील तिघेजण सेनापतीशी बोलणी करण्याकरिता गेले. हिज्कीयाचा मुलगा एल्याकीम, आसाफचा मुलगा यवाह आणि शेबना हे ते तिघे होत. ह्यातील एल्याकीम हा राजाचा कारभारी होता. यवाह हा राजाच्या कारकिर्दीची नोंद ठेवणारा होता. तर शेबना राजाचा चिटणीस होता.
एल्याकीम, शेबना व यवाह ह्या यरूशलेममधल्या तिघांनी सेनापतीला सांगितले, “कृपया आमच्याशी अरामी भाषेत बोला. आमच्या यहुदी भाषेत बोलू नका. तुम्ही यहुदी भाषेत बोललात तर कोटावरील लोकांना तुमचे बोलणे समजेल.”
नंतर राजाचा कारभारी (हिज्कीयाचा मुलगा एल्याकीम) राजाचा चिटणीस (शेबना) व राजाच्या कारकिर्दीची नोंद ठेवणारा (आसाफचा मुलगा यवाह) ह्यांनी आपले कपडे फाडले, (ह्याचा अर्थ त्यांना फार दु:ख झाले होते.) ते तिघे हिज्कीयाकडे गेले व त्यांनी सेनापतीचे सर्व म्हणणे त्याला सांगितले.
हिज्कीयाने कारभारी (एल्याकीम) चिटणीस (शेबना) आणि याजकातील वडिलधारी मंडळी (नेते) ह्यांना अमोजचा मुलगा यशया या प्रेषिताकडे पाठविले. त्या सगळ्यांनी खास शोकप्रदर्शक कपडे घातले.
मग फिलिप्प तयार झाला व गेला. रस्त्यात त्याला एक इथिओपियाचा मनुष्य भेटला, तो मनुष्य षंढ होता. तो इथिओपियाच्या कांदके राणीकडे उच्च पदावर अधिकारी म्हणून कामाला होता. तो राणीच्या खजिन्याचा मुख्य होता. तो यरुशलेमला उपासना करण्यासाठी गेला होता.