Home Bibles 1 राजे 4:6 · मराठी बायबल
1 राजे 4:6 · मराठी बायबल

अहीशार हा राजाच्या महालातील सर्व गोष्टींचा प्रमुख होता.अब्दाचा मुलगा अदोनीराम गुलामांच्या खात्याचा प्रमुख होता.

Cross references

2 शमुवेल 20:24

अदोराम हा कष्टकरीलोकांचा प्रमुख होता. अहीलुदाचा मुलगा यहोशाफाट हा अखबारनवीस होता.

1 राजे 5:13

शलमोनाने वेठबिगारीवर इस्राएलची 30,000 माणसे या कामासाठी नेमली.

1 राजे 9:15

शलमोनराजाने मंदिर आणि महाल यांच्या बांधकामासाठी वेठबिगारीवर मजूर लावले होते. त्यांच्याकडून राजाने आणखीही वास्तू बांधून घेतल्या. मिल्लो, यरुशलेमभोवतीचा कोट तसेच हासोर, मगिद्दो व गेजेर या नगरांची पुनर्बांधणी त्याने करवून घेतली.

1 राजे 12:18

अदोनीराम नावाचा एक माणूस सर्व कामगारांवर देखरेख करत असे. तेव्हा राजा रहबामने त्याला लोकांशी बोलणी करायला पाठवले. पण इस्राएल लोकांनी त्याच्यावर इतकी दगडफेक केली की तो प्राणाला मुकला. तेव्हा राजाने आपल्या रथान बसून पळ काढला आणि तो यरुशलेम येथे आला.

Interlinear

Choose Theme