Home Bibles यशया 21:6 · मराठी बायबल
यशया 21:6 · मराठी बायबल

माझा प्रभू मला म्हणाला, “जा आणि ह्या शहराचे रक्षण करण्यासाठी पहारेकऱ्याची नेमणूक कर. तो जे जे पाहील त्याची त्याने वर्दी द्यावयास हवी.

Cross references

2 शमुवेल 18:25

पहारेकऱ्याने हे राजाला ओरडून मोठ्याने सांगितले.राजा दावीद म्हणाला, “तो एकटाच असेल तर त्याचा अर्थ तो काहीतरी बातमी घेऊन येत आहे.”धावता धावता तो माणूस शहराच्या जवळ येऊन पोचतोय तोच

2 राजे 9:17

इज्रेलमध्ये बुरुजावर एक पहारोकरी होता. त्याने येहूला मोठ्या जमावनिशी येताना पाहिले. तो म्हणाला, “मोठाच जमाव दिसतोय”योरामने त्याला सांगितले, “कोणाला तरी घोड्यावरुन त्यांच्याकडे पाठव. ते सद्भावाने येत आहेत का ते त्या स्वाराला विचारायला सांग.”

यशया 62:6

“यरूशलेम, तुझ्या वेशीवर मी रखवालदार (संदेष्टा) ठेवतो. ते रखवालदार गप्प बसणार नाही. रांत्रदिवस ते प्रार्थना करीत राहतील.” रखवालदारांनो, तुम्ही देवाची प्रार्थना करीत राहिले पाहिजे त्याच्या वचनाची आठवण तुम्ही त्याला करून दिली पाहिजे. कधीही प्रार्थना करायचे थांबू नका.

यिर्मया 51:12

बाबेलच्या तटासमोर झेंडा उभारा. जास्ती रक्षक आणा. पहारेकऱ्यांना त्यांच्या जागी उभे करा. छुपा हल्ला करण्याची तयारी करा. परमेश्वर, त्याने ठरविल्याप्रमाणे करील. बाबेलच्या लोकांविरुद्ध, त्याने सांगितल्याप्रमाणे, तो कारवाई करील.

यहेज्केल 3:17

“मानवपुत्रा, मी तुला इस्राएलचा पहारेकरी करीत आहे. इस्राएलबाबत घडणाऱ्या वाईट गोष्टी मी तुला सांगीन. मग तू इस्राएलला त्या गोष्टींबद्दल इशारा दे.

यहेज्केल 33:2

“मानवपुत्रा, तुझ्या माणसांशी बोल त्यांना सांग, ‘ह्या देशावर हल्ला करण्यासाठी कदाचित्, मी शत्रूसैनिकांना आणीन. त्या वेळेस लोक एकाला पहारेकरी म्हणून निवडतील.

हबक्कूक 2:1

“मी रखवालदारसारखा उभा राहून लक्ष ठेवीन परमेश्वर मला काय सांगतो, त्याची मी वाट पाहीन मी वाट पाहीन आणि तो माझ्या प्रश्नाला कसे उत्तर देतो ते बघीन.”

Interlinear

Choose Theme