Home Bibles यशया 14:29 · मराठी बायबल
यशया 14:29 · मराठी बायबल

पलेशेथ देशा, तुला पराभूत करणारा राजा गेला म्हणून तुला आनंद झाला आहे. पण खरे तर तुला आनंद व्हायचे काही कारण नाही. हे खरे आहे की त्या राजाची सत्ता संपली आहे. पण राजाचा मुलगा गादीवर बसेल व राज्य करील. हे एका सापाने दुसऱ्या अती विषारी सापाला जन्म दिल्यासारखे होईल. हा नवा राजा तुझ्या दृष्टीने चपळ व भयानक सापासारखा असेल.

Cross references

यहोशवा 13:3

मिसरमधील शीहोर नदीपासून उत्तरेस एक्रोनच्या सीमेपर्यंतचा भागही अजून काबीज केलेला नाही. त्या भूमीवर अजूनही कनानी लोकांचा ताबा आहे. गज्जा, अश्दोद, अष्कलोन, गथ व एक्रोन या पलिष्टचांच्या पाच नेत्यांचा तुला पराभव करायचा आहे.

1 शमुवेल 6:17

अशाप्रकारे पलिष्ट्यांनी आपल्या पापक्षालनार्थ परमेश्वराला गळवांच्या पाच सुवर्ण प्रतिमा दिल्या. प्रत्येक पलिष्टी गावातर्फे एक अशा त्या होत्या. अश्दोद, गज्जा, अष्कलोन, गथ, एक्रोन ही ती पाच गावे होत.

2 राजे 18:8

थेट गज्जा आणि त्याच्या भोवतालच्या प्रदेशापर्यंत त्याने पलिष्ट्यांचा पराभव केला. लहान खेड्यापासून मोठ्या नगरापर्यंत सर्व पलिष्टी गावे त्याने जिंकली.

2 इतिहास 26:6

उज्जीयाने पलिष्ट्यांबरोबर युध्द केले. गथ, यब्ने व अश्दोदचे कोट पाडून टाकले. अश्दोद जवळ व पलिष्ट्यांच्या वस्तीत इतरत्र उज्जीयाने नगरे वसवली.

2 इतिहास 28:18

पलिष्ट्यांनीही डोंगराळ तळवटीच्या भागातल्या गावांवर आणि दक्षिण यहूदावर हल्ला केला. बेथ - शेमेश, अयालोन, खदेरोथ, सोखो, तिम्ना आणि गिम्जो ही गावे त्यांच्या आसपासच्या खेड्यांसह काबीज केली.

नीतिसूत्रे 24:17

तुमचा शत्रू संकटात असतो तेव्हा आनंद मानू नका. तो पडतो तेव्हा आनंदून जाऊ नका.

यशया 11:8

तान्हे मूलसुध्दा नागाच्या वारूळाजवळ खेळू शकेल. ते सापाच्या बिळात त्याचा हात घालू शकेल.

यशया 30:6

नेगेवमधल्या प्राण्यांविषयी शोक संदेश:नेगेव ही धोकादायक जागा आहे. ही भूमी सिंह, फुरसे व उडणारे साप ह्यांनी व्यापलेली आहे. पण काही लोक नेगेवमधूनच प्रवास करीत आहेत. ते मिसरला जात आहेत. त्यांनी आपली धन संपत्ती गाढवांवर व उटांवर लादली आहे. ह्याचा अर्थ त्यांना मदत न करू शकणाऱ्या राष्ट्रांवर ते विसंबले आहेत.

यहेज्केल 26:2

“मानवपुत्रा, सोरने यरुशलेमबद्दल वाईट उद्गार काढले. ती म्हणाली, ‘अहा! लोकांचे रक्षण करणाऱ्या प्रवेशद्वाराचा नाश झाला आहे. आता मला द्वार मोकळे झाले आहे. नगरीचा (यरुशलेमचा) नाश झाला. त्यामुळे तेथून मला खूप मौल्यवान वस्तू मिळतील.”

यहेज्केल 35:15

इस्राएलचा नाश झाल्यावर तुला आनंद झाला होता. मी तुलाही अगदी तशीच वागणूक देईन. सेईर पर्वताचा व संपूर्ण अदोम देशाचा नाश होईल. मगच तुला समजेल की मी परमेश्वर आहे.”

होशेय 9:1

इस्राएल, इतर राष्ट्राप्रमाणे आनंदोत्सव करू नकोस! तू वेश्येप्रमाणे वागलास आणि देवाचा त्याग केलास. प्रत्येक खव्व्यावर तू व्यभिचाराचे पाप केलेस.

ओबद्या 1:12

तुझ्या भावाच्या संकटांना तू हसलास. तू असे करायला नको होतेस. लोकांनी जेव्हा यहूदाचा नाश केला तेव्हा तू आनंद मानलास, तू तसे करायला नको होतेस. त्याच्या संकटसमयी तू प्रौढी मिरविलीस; असेही तू करायला नको होतेस.

मीखा 7:8

मी पडलो आहे. पण शत्रूंनो, मला हसू नका. मी पुन्हा उठेन आता मी अंधारात बसतोय पण परमेश्वरच माझा प्रकाश होईल.

सफन्या 3:11

“मग, यरुशलेम, तुझ्या लोकांनी माझ्याविरुध्द केलेल्या दुष्कृत्यांची तुला लाज वाठणार नाही. का? कारण त्या वाईट लोकांना मी यरुशलेममधून बाहेर घालवीन. त्या गर्विष्ठांना मी दूर नेईन. माझ्या पवित्र पर्वतावर त्या माणसांतील कोणीही गर्विष्ठ असणार नाही.

Interlinear

Choose Theme