इस्राएलचा नाश झाल्यावर तुला आनंद झाला होता. मी तुलाही अगदी तशीच वागणूक देईन. सेईर पर्वताचा व संपूर्ण अदोम देशाचा नाश होईल. मगच तुला समजेल की मी परमेश्वर आहे.”
Cross references
यरुशलेम नेहमी माझा सर्वांत मोठा आनंद असेल असे मी वचन देतो.
काही लोक गरीबांची थट्टी करतात. ज्यांच्यापुढे समस्या असतात त्यांना ते हसतात. या वरुन असे दिसते की ते वाईट लोक, ज्या देवाने त्यांची निर्मिती केली त्या देवाचा आदर करीत नाहीत. त्यांना शिक्षा होईल.
परमेश्वर म्हणतो, “माझी आकाशातील तलवार रक्ताने माखेल तेव्हा हे सर्व घडेल.” पाहा! परमेश्वराची तलवार अदोमला आरपार कापील. परमेश्वराने तेथील लोकांना अपराधी ठरविले आहे आणि त्यांना मेलेच पाहिजे.
“बाबेल, तू आनंदी व उल्हसित आहेस तू माझी भूमी घेतलीस. धान्यात शिरलेल्या गायीप्रमाणे तू नाचतेस. तू आनंदाने घोड्याप्रमाणे खिंकाळतेस.
अदोमच्या लोकांनो, आनंदित व्हा. ऊस देशात राहणाऱ्यांनो, हर्षित व्हा. पण लक्षात ठेवा की परमेश्वराच्या क्रोधाचा प्याला तुमच्याकडेसुध्दा येईल. तुम्ही जेव्हा त्यातील पेय (शिक्षा) प्याल, तेव्हा झिंगाल आणि विवस्त्र व्हाल.
परमेश्वर असे म्हणतो, की यरुशलेमचा नाश झाला म्हणून तुम्हाला आनंद झाला. तुम्ही टाळ्या पिटल्यात व थै थै नाचलात. इस्राएलच्या अपमानाची तुम्हाला मजा वाटली.
त्याला सांग ‘परमेश्वर, माझा प्रभू, पुढील गोष्टी सांगतो:“सेईर पर्वता, मी तुझ्याविरुद्ध आहे. मी तुला शिक्षा करीन. मी तुला उजाड करीन.
मी तुला कायमचा ओसाड करीन. तुझ्या शहरांतून कोणीही राहाणार नाही. मग तुला पटेल की मीच परमेश्वर आहे.”
त्यांना सांग की परमेश्वर आणि प्रभू पुढील गोष्टी सांगतो. ‘शत्रू तुमच्याविषयी वाईट बोलताना सुखावले, ते म्हणाले की अरे वा! आता प्राचीत पर्वत आमचे होतील.’
“म्हणून मी वचन देतो की माझ्या बोलण्यात आवेश असेल. मी अदोम आणि इतर राष्ट्रांना माझा राग जाणवून देईन. माझी जमीन त्या लोकांनी स्वत:साठी घेतली, त्या वेळी त्यांना खूप आनंद झाला. त्यांनी ती फक्त लुटण्यासाठी आणि नाश करण्यासाठी घेतली.”
देव म्हणाला, “मागोगमध्ये व किनाऱ्यावर सुरक्षिपणे राहणाऱ्या लोकांमध्ये मी आग लावीन. मग त्यांना ‘मी परमेश्वर आहे’ हे समजेल.
तुझ्या भावाच्या संकटांना तू हसलास. तू असे करायला नको होतेस. लोकांनी जेव्हा यहूदाचा नाश केला तेव्हा तू आनंद मानलास, तू तसे करायला नको होतेस. त्याच्या संकटसमयी तू प्रौढी मिरविलीस; असेही तू करायला नको होतेस.
परमेश्वराचा दिवस लवकरच सर्व राष्ट्रांकडे येत आहे; तू दुसऱ्या लोकांशी वाईट कृत्ये केलीस त्या वाईट गोष्टी तुझ्या बाबतीत घडतील. तू केलेली दुष्कर्मे तुझ्या डोक्यावर येऊन आदळतील.
कारण तो करीत असलेल्या कृत्यांविषयी त्यांनी ऐकले व यरुशलेम, इदूमिया, यार्देनेच्या पलीकडच्या प्रदेशातून, सोर व सीदोनच्या आसपासच्या प्रदेशातून मोठा लोकसमुदाय येशूकडे आला.