Home Bibles यशया 51:20 · मराठी बायबल
यशया 51:20 · मराठी बायबल

तुझे लोक दुबळे होऊन जमिनीवर पडले आणि तिथेच पडून राहिले. प्रत्येक चौकात ते पडून राहिले. ते जणू जाळ्यात पकडलेले प्राणी होते. त्यांना आणखी शिक्षा सहन न होईपर्यंत परमेश्वराने रागाने त्यांना शिक्षा केली. जेव्हा देव त्यांना म्हणाला की मी तुम्हाला आणखी शिक्षा करीन, तेव्हा ते अगदीच लोळागोळा झाले.

Cross references

स्तोत्रसंहिता 88:15

मी तरुणपणापासूनच अशक्त आणि आजारी आहे. मी तुझा राग सोसला आहे आणि मी असहाय्य आहे.

यशया 5:25

म्हणून परमेश्वर त्यांच्यावर रागावला आहे. तो आपला हात त्यांच्यावर उगारेल आणि त्यांना शिक्षा करील. मग डोंगरसुध्दा भीतीने कापतील. मृतदेह कचऱ्याप्रमाणे रस्त्यावर पडतील. पण तरीही देवाचा राग शांत होणार नाही. त्याचा हात लोकांना शिक्षा करण्याकरीता उगारलेलाच राहील.

यशया 8:21

तुम्ही चुकीच्या आज्ञांचे पालन कराल तर देशावर संकटे येतील आणि उपासमार होईल. लोकांची उपासमार झाल्यावर लोक संतापतील व ते राजा आणि त्याचे देव ह्यांच्याविरूध्द बोलू लागतील. मग मदतीसाठी देवाकडे पाहतील.

यशया 9:19

सर्वशक्तिमान परमेश्वर रागावला आहे म्हणून सर्व भूमी जाळली जाईल. सर्व माणसेही त्यात जाळली जातील. कोणीही आपल्या भावाला वाचविण्याचा प्रयत्न करणार नाही.

यशया 29:9

तुम्ही विस्मित व आश्चर्यचकीत व्हा. तुम्ही धुंद व्हाल पण मद्याने नव्हे. तुम्ही झोक जाऊन पडाल पण दारूने नव्हे.

यशया 40:30

तरूण माणसे थकतात आणि त्यांना विश्रांतीची गरज वाटते. लहान मुलेसुध्दा अडखळतात आणि पडतात.

यशया 49:26

“त्या लोकांनी तुला दुखावले पण त्यांना स्वत:चेच मांस खायला मी लावीन. स्वत:च्याच रक्ताची त्यांना मद्यासारखी धुंदी चढेल. मी तुला वाचविले हे प्रत्येकाला माहीत होईल याकोबच्या सामर्थ्यवान परमेश्वराने तुझे रक्षण केले हे सर्वांना समजेल.”

यशया 51:17

ऊठ, ऊठ, यरूशलेम, जागी हो. परमेश्वर तुझ्यावर फार रागावला होता. म्हणून तुला शिक्षा झाली. विषाचा प्याला प्यायला लागावा तशी ही शिक्षा होती. तू तो विषाचा प्याला प्यायलीस.

यशया 51:21

ऐक, बिचाऱ्या यरूशलेम, ऐक, मद्यप्याप्रमाणे तू दुबळी झाली आहेस. पण तू मद्य घेतले नाहीस. “त्या विषाच्या प्याल्याने” तुला दुर्बल केले आहे.

यिर्मया 14:16

आणि ज्या लोकांशी ते संदेष्टे बोलले, ते लोक रस्त्यावर उघडे पडतील. उपासमार व शत्रू यांचे ते बळी ठरतील. त्यांचे वा त्यांच्या बायकामुलांचे दफन करण्यास कोणीही असणार नाही. मी त्यांना शिक्षा करीन.

यिर्मया 14:18

मी जर त्या देशात गेलो, तर मला तलवारीने मारले गेलेले लोक दिसतील. मी जर शहरात गेलो, तर मला सर्वत्र दौर्बल्य आढळेल. कारण लोकांच्याजवळ अन्न नाही. याजकांना आणि संदेष्ट्यांना परदेशात नेले आहे.”‘

विलापगीत 1:15

“माझ्या शूर सैनिकांना परमेश्वराने दूर लोटले. मग माझ्या विरुध्द लढण्यासाठी व माझ्या तरुण सैनिकांना मारण्यासाठी परमेश्वराने काही लोक आणले. देवाने द्राक्षकुंडातील द्राक्षे तुडविली. ते द्राक्षकुंड यरुशलेमच्या कुमारी कन्येचे आहे.

विलापगीत 1:19

मी माझ्या प्रियकरांना हाका मारल्या पण त्यांनी मला फसविले. माझे पुजारी आणि वृध्द नगरीत वारले. ते स्वत:साठी अन्न शोधीत होते. त्यांना जगायचे होते.

विलापगीत 2:11

रडून रडून माझे डोळे थकले आहेत. माझे अंत:करण अस्वस्थ झाले आहे. माझे हृदय जमिनीवर टाकल्याप्रमाणे तळमळत आहे. कारण माझ्या लोकांचा नाश झाला आहे. मुले आणि तान्ही मूर्छित पडत आहेत. सार्वजनिक चौकांत ती मूर्छित पडत आहेत.

विलापगीत 2:12

ती मुले त्यांच्या आयांना म्हणतात, “भाकर आणि द्राक्षारस कोठे आहे?” मरतानाही ते हाच प्रश्न विचारतात, आणि आपल्या आईच्या मांडीवरच प्राण सोडतात

विलापगीत 3:15

परमेश्वराने मला हे विष (शिक्षा) प्यायला दिले. हे कडू पेय त्याने मला भरपूर पाजले.

विलापगीत 4:2

सियोमच्या लोकांची किंमत भारी आहे. ते आपल्या वजनाचे मोल सोन्यात ठरवितात. पण आता शत्रू त्यांना मातीच्या जुन्या रांजणांप्रमाणे मानतो. कुंभाराने केलेल्या मडक्याप्रमाणे तो त्यांना किंमत देतो.

विलापगीत 4:11

परमेश्वराने आपला सगळा क्रोध प्रकट केला. त्यांने आपला सगळा राग बाहेर काढला. त्याने सियोनमध्ये आग लावली त्या आगीत पायापर्यंत सियोन बेचिराख झाले

विलापगीत 5:13

आमच्या तरुणांना शत्रूने गिरणीत धान्य दळायला लावले. ते तरुण लाकडाच्या ढिगाऱ्याखाली अडखळले.

यहेज्केल 12:13

तो पळून जायचा प्रयत्न करील पण मी (देव) त्याला पकडीन. तो माझ्या सापळ्यात अडकला जाईल. मी त्याला बाबेलमध्ये, खास्द्यांच्या देशात आणीन. पण त्याला कोठे नेले जात आहे, हे तो पाहू शकणार नाही. शत्रू त्याचे डोळे काढून त्याला आंधळा करतील. मग तो तेथेच मरेल.

यहेज्केल 17:20

मी सापळा रचीन व त्यात तो पकडला जाईल. मग मी त्याला बाबेलला आणून शिक्षा करीन. तो माझ्याविरुद्ध गेला म्हणून मी त्याला शिक्षा करीन.

यहेज्केल 39:19

तुम्हाला हवी तेवढी चरबी तुम्ही खाऊ शकाल. पोट भरेपर्यंत रक्त तुम्ही प्याल. तुम्ही मी मारलेल्या बळीला खाल व त्याचे रक्त प्याल.

प्रकटीकरण 14:10

तो मनुष्य देवाच्यारागाच्या सर्व शक्तीनिशी बनवलेला द्राक्षारस पिईल. त्या व्यक्तीला पवित्र देवदूतांसमोर व कोकऱ्यासमोर जळत्या गंधकानेपीडले जाईल.

प्रकटीकरण 16:9

भयंकरअशा उष्णतेमुळे लोक जळाले. त्या लोकांनी देवाच्या नावाला शिव्याशाप दिले की ज्याला या संकटांवर ताबा आहे. पणलोकांनी पश्चात्ताप करण्याचे नाकारले व देवाचे गौरव करण्याचे नाकारले.

Interlinear

Choose Theme