एफ्राईमने स्वत:चा आजार व यहूदाने स्वत:ची जखम पाहिली. म्हणून मदतीसाठी ते अश्शुरकडे गेले. त्यांनी सम्राटाला त्यांच्या समस्या सांगितल्या. पण तो सम्राट तुम्हाला बरे करु शकत नाही. तो तुमची जखम भरून काढू शकत नाही.
Cross references
अश्शूरचा राजा पूल इस्राएलवर चाल करुन आला. तेव्हा पूलने आपल्याला पाठिंबा द्यावा आणि आपले राज्य बळकट करावे या इराद्याने मनहेमने पूलला पंचाहत्तर पौंड चांदी दिली.
अश्शूरचा राजा तिग्लथ-पिलेसर हा इस्राएलवर चाल करुन आला. पेकह इस्राएलचा राजा होता तेव्हा हे घडले. तिग्लथ-पिलेसरने इयोन, आबेल, बेथ माका, यानोह, केदेश, हासोर, गिलाद, गालील आणि सर्व नफताली प्रांत घेतला. तसेच तेथील सर्व लोकांना कैद करुन अश्शूरला नेले.
अश्शूरचा राजा तिग्लथ-पिलेसर याच्याकडे आहाजने दूतामार्फत संदेश पाठवला की, “मी तुझा दास आहे, तुझ्या मुलासारखाच आहे. अराम आणि इस्राएलचे राजे माझ्यावर चाल करुन आले आहेत. तेव्हा माझ्या मदतीला ये आणि मला वाचव.” यहूदाचा राजा आहाज
याचवेळी अदोमच्या लोकांनी यहूदावर चढाई करुन त्यांचा पाडाव केला. अदोम्यांनी यहूदी लोकांना कैद करुन नेले. तेव्हा राजा आहाजने अश्शूरच्या राजाकडे मदत मागितली.
तिल्गथ - पिल्नेसर हा अश्शूराचा राजा. यानेही आहाजला मदत करण्याऐवजी त्रासच दिला.
आहाजने परमेश्वराच्या मंदिरातील, राजमहालातील तसेच सरदारांच्या घरातील धनदौलत घेऊन अश्शूरच्या राजाला दिली पण त्याचाही फायदा झाला नाही.
परमेश्वर म्हणतो, “इस्राएलच्या व यहूदाच्या लोकांनो, तुम्हाला कधीही बरी न होणारी जखम झाली आहे, कधीही भरुन न येणारी हानी पोहोचली आहे.
तुम्ही बऱ्याच राष्ट्रांचे मित्र झालात पण ती राष्ट्रे तुमची पर्वा करीत नाहीत. तुमचे ‘मित्र’ तुम्हाला विसरले आहेत. मी शत्रूला दुखवावे, तसे तुम्हाला दुखविले आहे. मी तुम्हाला कडक शिक्षा केली. तुमच्या भयंकर अपराधांसाठी मी हे केले. तुम्ही खूप पापे केलीत, म्हणून मी असे केले.
“मग अहलाने माझा विश्वासघात केला - ती वेश्येसारखी वागू लागली. तिला प्रियकर हवेसे वाटू लागले. ‘तिने अश्शूरच्या सैनिकांना
म्हणजेच एफ्राईम मूर्ख पारव्याप्रमाणे बेअक्कल झाला आहे. लोकांनी मदतीसाठी मिसरला हाक मारली. ते मदत मागायला अश्शूरकडे गेले.
एफ्राईम त्याच्या ‘प्रेमिकाकडे’ गेला. रानटी गाढवाप्रमाणे तो अश्शूरकडे भटकला गेला.
ती मूर्ती अशशूरच्या महान राजाला भेट म्हणून नेली गेली तो, एफ्राईमची लज्जास्पद मूर्ती ठेवील. इस्राएलला आपल्या मूर्तीची लाज वाटेल.
एफ्राईम त्याचा वेळ वाया घालवीत आहे-इस्राएल दिवसभर “वाऱ्याचा पाठलाग करतो.” लोक अधिकाधिक खोटे बोलतात. ते जास्तीतजास्त चोव्या करतात. त्यांनी अश्शूरशी करार केले आहेत. आणि ते जैतून तेल मिसरला नेत आहेत.
“अश्शूर आम्हाला वाचविणार नाही. आम्ही घोड्यांवर स्वार होणार नाही. आम्ही हातांनी बनविलेल्या गोष्टींना ‘आमचा देव’ असे पुन्हा म्हणणार नाही का? कारण अनाथांवर करुणा करणारा तूच एकमेव आहेस.
शोमरोनची जखम भरुन येऊ शकत नाही. तिचा आजार (पाप) यहूदापर्यंत पसरला आहे. तो माझ्या माणसांच्या वेशीपर्यंत पोहोचला आहे. तो पार यरुशलेमपर्यंत पसरला आहे.