Home Bibles होशेय 5:12 · मराठी बायबल
होशेय 5:12 · मराठी बायबल

कसर ज्याप्रमाणे कापडाच्या तुकड्याचा नाश करते, तसाच मी एफ्राईमचा नाश करीन. लाकडाचा तुकडा सडून नष्ट होता, तसेच मा यहूदाला नष्ट करीन.

Cross references

ईयोब 13:28

म्हणून मी कुजलेल्या लाकडासारखा, कसरीने खाल्लेल्या कापडासारखा क्षीण होत चाललो आहे”

नीतिसूत्रे 12:4

नवरा चांगल्या बायकोबद्दल आनंदी आणि अभिमानी असतो. पण जर बाई आपल्या नवऱ्याला लाज आणत असेल. तर ती त्याच्या शरीरातल्या आजारा सारखी असते.

यशया 50:9

पण लक्षात ठेवा, माझा प्रभु मला मदत करतो. म्हणून कोणीही मला पापी ठरवू शकणार नाही. ते सर्व लोक जीर्ण जुन्या वस्त्राप्रमाणे होतील. कसर त्यांना खाईल.

यशया 51:8

का? त्यांची अवस्था जुन्या वस्त्राप्रमाणे होईल. कसर त्याना खाईल. ते लाकडाप्रमाणे होतील. वाळवी त्यांना खाईल. पण माझा चांगुलपणा चिरंतन राहील. माझे तारण अखंड चालू राहील.”

योना 4:7

दुसऱ्या दिवशी सकाळी वेलीचा काही भाग खाण्याकरिता परमेशवराने एक किडा पाठविला किड्याने वेल खायला सुरवात केली व वेल मेला.

मार्क 9:43

जर तुझा उजवा हात तुला पाप करायला प्रवृत्त करतो तर तो तोडून टाक. दोन हात असून नराकात न विझणाऱ्या अग्नीत जाण्यापेक्षा व्यंग असून जीवनात जाणे बरे.

Interlinear

Choose Theme