Cross references
देवाने इस्राएल लोकांचे हाल पाहिले आणि त्यांना लगेच मदत करावयाचे ठरवले.
तुमच्या सर्व कार्यात तुमचा देव परमेश्वर याचे तुम्हाला आशीर्वाद आहेत. तुमच्या या रानातील वाटचालीकडे त्याचे लक्ष आहे. गेली चाळीस वर्षे तुमचा देव परमेश्वरा ह्याने तुम्हाला साथ दिली आहे. तुम्हाला कशाचीही वाण पडली नाही.
विषारी नाग आणि विंचू असलेल्या निर्जल, रखखीत अशा भयंकर रानातून त्याने तुम्हाला आणले. त्याने तुमच्यासाठी खडकातून पाणी काढले.
“याकोब (इस्राएल) त्याला सापडला वाळवंटात भणभणत्या वाऱ्याच्या वैराण प्रदेशात. परमेश्वराने त्याला आपल्या कवेत घेतले आणि डोळ्यात तेल घालून त्याला सांभाळले.
का? कारण परमेश्वर चांगल्यांचे रक्षण करतो आणि वाईटाचे निर्दालन करतो.
देवा, तुझा दयाळूपणा मला आनंदी बनवतो तू माझे कष्ट पाहिले आहेस. तुला माझ्या संकटाची जाणीव आहे.
देवा, तू माझा देव आहेस आणि तू मला खूप हवा आहेस. माझा आत्मा आणि माझे शरीर तुझ्यासाठी शुष्क, बरड आणि पाणी विरहित जमिनी प्रमाणे तहाननेले आहे.
माझ्या शत्रूंनी माझ्यासाठी सापळा रचला आहे मी आता आशा सोडण्याच्या तयारीत आहे. पण माझे काय होत आहे ते परमेश्वराला माहीत आहे.
“यिर्मया, जा आणि यरुशलेममधील लोकांशी बोल. त्यांना सांग:“तुमचे राष्ट्र तरुण होते त्या वेळी तुम्ही माझ्याशी निष्ठावंत होता. नववधूप्रमाणे तुम्ही मला अनुसरलात. तुम्ही वाळवंटातून आणि पडिक जमिनीतून माझ्या मागे आलात.
तुमचे पूर्वज असे म्हणाले नाहीत ‘परमेश्वराने आम्हाला मिसरहून आणले. परमेश्वराने आम्हाला वाळवंटातून पार नेले. त्यानेच आम्हाला ओसाड आणि खडकाळ प्रदेशातून बाहेर नेले. काळोख व धोका असलेल्या, निर्जन, जेथून कोणीही प्रवास करीत नाही अशा प्रदेशातून देवाने आम्हाला पार केले. तो परमेश्वर आता कोठे आहे?”
एफ्राईमला मी ओळखून आहे. इस्राएलची कृत्ये मला महीम आहेत. एफ्राईम, आता, यावेळी तू वश्येप्रमाणे वागत आहेस. इस्राएल पापाने बरबटली आहे.
वाळवंटातील ताज्या द्राक्षांप्रमाणे त्यावेळी इस्राएल होता. तुमचे पूर्वज मोसमातील अंजिराच्या पहिल्या बहराप्रमाणे मला दिसले. पण मग ते बाल-पौरा कडे आले आणि ते बदलले. ते कुजल्यासारखे झाले ते ज्यांच्यावर प्रेम करीत त्या भयंकर गोष्टीसारखे (दैवतांसारखे) झाले.
परमेश्वर फार चांगला आहे. संकटसमयी तो सुरक्षित आश्रयस्थान आहे त्याच्यावर विश्वास ठेवणाऱ्यांची तो काळजी घेतो
पण जर कोणी देवावर प्रीति करतो तर देवाला तो माहीत असतो.
परंतुआता तुम्ही देवाला ओळखता किंवा आता देवाने तुमची ओळख करुन घेतली आहे. तर मग आता तुम्ही ज्यांचे गुलामहोण्याचे प्रयत्न करीत आहात त्या दुर्बल आणि निरुपयोगी नियमाकडे कसे वळता?