का? कारण परमेश्वर चांगल्यांचे रक्षण करतो आणि वाईटाचे निर्दालन करतो.
Cross references
सज्जनांना तो आधार देतो. त्यांना लटपटू देत नाही. पण दुर्जनांचा संहार करतो. त्यांना गर्तेत ढकलतो दुर्जनांचे बळ अशा वेळी कुचकामी ठरते.
परंतु देवाला मी माहीत आहे. तो माझी परीक्षा घेत आहे. आणि मी सोन्यासारखा शुध्द असेन याकडे तो लक्ष पुरवेल.
शत्रूचा निपात झाला परमेश्वरा, तू त्यांच्या शहरांचा नाश केलास. आता केवळ पडकी घरे उभी आहेत त्या दुष्ट लोकांच्या आठवणी खातर आता काहीही शिल्लक उरले नाही.
परमेश्वर शुध्द माणसांचे आयुष्यभर रक्षण करतो त्यांचे वतन सदैव त्याच्याजवळ राहाते.
दुष्ट लोक हे बघतात आणि रागावतात. ते रागाने त्यांचे दांत खातील आणि नंतर ते नाहीसे होतील दुष्ट लोकांना जे खूप हवेहवेसे वाटते ते मिळणार नाही.
परमेश्वरा, तू माझी परीक्षा घेतलीस तुला माझ्याबद्दल सर्व काही माहीत आहे.
माझ्या शत्रूंनी माझ्यासाठी सापळा रचला आहे मी आता आशा सोडण्याच्या तयारीत आहे. पण माझे काय होत आहे ते परमेश्वराला माहीत आहे.
मी भोवताली बघतो पण मला माझे कुणीही मित्र दिसत नाहीत. पळून जाण्यासाठी मला कुठलीही जागा नाही. मला वाचवण्याचा कुणीही प्रयत्न करीत नाही.
परमेश्वर आपल्या देशातल्या परक्यांचे रक्षण करतो. परमेश्वर विधवांची आणि अनांथांची काळजी घेतो. परंतु परमेश्वर वाईट लोकांचा नाश करतो.
लोकांना वाटत असते हाच मार्ग बरोबर आहे. पण तो मार्ग फक्त मरणाकडे नेतो.
दुष्ट लोक ज्या प्रकारे जगतात ते परमेश्वराला आवडत नाही. जे लोक सत्कृत्य करायचा प्रयत्न करतात त्यांच्यावर परमेश्वर प्रेम करतो.
परमेश्वर फार चांगला आहे. संकटसमयी तो सुरक्षित आश्रयस्थान आहे त्याच्यावर विश्वास ठेवणाऱ्यांची तो काळजी घेतो
“अरूंद दरवाजाने आत जा. कारण नाशाकडे जाण्याचा दरवाजा रूंद आहे, व मार्ग पसरट आहे. आणि त्यातून आत जाणारे पुष्कळ आहेत.
“मी मेंढरांची (लोकांची) काळजी घेणारा मेंढपाळ आहे. जसा पिता मला ओळखतो तसा मी माझ्या मेंढरांना ओळखतो. आणि जसा मी पित्याला ओळखतो तशी माझी मेंढरे मला ओळखतात. या मेंढरांसाठी मी आपला जीव देतो.
माझी मेंढरे माझी वाणी ऐकतात. मी त्यांना ओळखतो. आणि ती माझ्यामागे येतात.
तथापि देवाने घातलेला भक्क म पाया त्यावर असलेला शिक्का यासह स्थिर राहतो. “प्रभु जे त्याचे आहेत त्यांना ओळखतो.”“ जो कोणी प्रभूचे नाव घेतो त्याने वाईटापासून वळलेच पाहिजे.”
परंतु हे लोक ज्यांना पकडून मारुन टाकावे अशा देहस्वभावानुसार चालणाऱ्या बुद्धीहीन पशूंसारखे आहेत.ज्या गोष्टींबद्दल ते अज्ञानी आहेत, त्याविरुद्ध हे लोक बोलतात. ज्याप्रमाणे प्राण्यांचा नाश केला जातो, त्याचप्रमाणे (खोट्याशिक्षकांचाही) नाश केला जाईल.