Home Bibles इब्री लोकांस 5:14 · मराठी बायबल
इब्री लोकांस 5:14 · मराठी बायबल

परंतु याउलट सकस अन्र हे प्रौढांसाठी योग्य असते. ख्रिस्ती लोकांची इंद्रिये ख्रिस्ती जीवनाच्या सरावामुळे चागंले व वाईट यांतील भेट ओळखण्यास तयार झालेली असतात.

Cross references

उत्पत्ति 3:5

कारण देवाला हे माहीत आहे की जर तुम्ही त्या झाडाचे फळ खाल तर बरे व वाईट काय आहे हे तुम्हांला समजेल आणि तुम्ही देवासारखे व्हाल.”

2 शमुवेल 14:17

स्वामी, तुमच्या शब्दांनी मला दिलासा मिळेल हे मी जाणून होते. कारण तुम्ही देवदूतासारखेच आहात. बरेवाईट तुम्ही जाणता. आणि देव परमेश्वराची तुम्हाला साथ आहे.”

1 राजे 3:9

तेव्हा राज्य करायला आणि लोकांशी न्यायबुध्दीने वागायला आवश्यक ते शहाणपण तू मला दे. त्यामुळे मला बऱ्यावाईटामधील फरक समजेल. त्याखेरीज एवढ्या लोकांवर राज्य करता येणे अशक्य आहे.”

1 राजे 3:11

म्हणून देव त्याला म्हणाला, “तू स्वत:साठी दीर्घायुष्य किंवा सुखसमृध्दी मागितली नाहीस. तसेच शत्रूंचा नि:पात व्हावा असे म्हणाला नाहीस. तू फक्त न्यायबुध्दी आणि विवेक याची मागणी केलीस.

ईयोब 6:30

मी खोटे बोलत नाही आणि खऱ्या-खोट्यातला फरक मला कळतो.”

ईयोब 12:11

ज्याप्रमाणे तोंडाला आवडत्या आणि नावडत्या अन्नातील फरक कळतो त्याप्रमाणे कानालाही शहाणपणाच्या आणि मूर्खपणाच्या शब्दातील फरक कळतो.

ईयोब 34:3

तुमची जीभ ज्या अन्नाला स्पर्श करते त्याची चव तिला कळते आणि तुमच्या कानांवर जे शब्द पडतात ते त्यांना पारखता येतात.

स्तोत्रसंहिता 119:103

माझ्या तोंडात तुझे शब्द मधापेक्षाही गोड आहेत.

गीतरत्न 1:3

तुझ्या अत्तराचा खूप चांगला वास येत आहे, पण तुझे नाव मात्र उत्तम अत्तरापेक्षाही गोड आहे. त्यामुळेच तरुणी तुझ्यावर प्रेम करतात.

गीतरत्न 2:3

प्रियकरा इतर पुरुषांमध्ये तू रानटी झाडांमध्ये असलेल्या सफरचंदाच्या झाडासारखा आहेस.मला माझ्या प्रियकराच्या सावलीत बसायला आवडते. त्याचे फळ मला गोड लागते.

यशया 7:15

इम्मानुएल मध व लोणी खाईल. अशा रीतीने जगत असतानाच ह्यातूनच तो चांगले करावे व वाईट सोडावे हे शिकेल.

मत्तय 5:48

म्हणून जसा तुमचा स्वर्गातील पिता परिपूर्ण आहे तसे तुम्हीही परिपूर्ण व्हा.

मत्तय 6:22

डोळा शरीराचा दिवा आहे. म्हणून जर तुमचे डोळे चांगले असतील तर तुमचे सर्व शरीर प्रकाशमय होईल.

रोमकरांस 14:1

जो विश्वासात दुर्बल आहे त्याचा स्वीकार करा. पण मतभेदावरुन भांडणाच्या हेतूने नव्हे.

1 करिंथकरांस 2:6

परंतु जे प्रौढ आहेत त्यांना आम्ही ज्ञान देतो. या युगाच्या अधिकाऱ्यांना नव्हे, ज्यांचा शेवट करण्यासाठी आणण्यात येत आहे.

1 करिंथकरांस 2:14

स्वाभाविक मनुष्य देवाच्या आत्म्याने प्रगट झालेल्या गोष्टी ग्रहण करीत नाही. कारण त्या त्याला मूर्खपणाच्या आहेत. आणि त्या त्याला समजत नाहीत, कारण त्यांची आध्यात्मिक रितीने पारख केली जाते.

इफिसकरांस 1:18

मी असे सांगतो की, तुमच्या अंत:करणाचे डोळे प्रकाशित होवोत यासाठी की तुम्हाला तुमच्या पाचारणाची आशा व संतांमध्ये त्याच्या वतनाच्या वैभवाची श्रीमंती किती आहे हे कळावे.

इफिसकरांस 4:13

आम्हा सर्वांना आमच्या पित्यातील एकत्वापणामुळे विश्वासाची आणि देवाच्या पुत्राविषयीच्या ज्ञानाची जाणीव होते आणि पूर्णत्वाची जी परिमाणे ख्रिस्ताने आणली आहेत त्या उच्चतेपर्यंत पोहोंचून परिपक्व मनुष्य होण्यासाठी आमची वाढ होते.

फिलिप्पैकरांस 1:9

आणि माझी हीच प्रार्थना आहे: की तुमचे प्रेम अधिकाधिक वाढत जाईल पूर्ण ज्ञान व सर्व प्रकारच्या समजबुद्धीने वाढत जाईल.

फिलिप्पैकरांस 3:15

तेव्हा आपण सर्व जे परिपक्व (प्रौढ) त्या आम्ची एकच प्रवृती आहे आणि एखाद्या मुद्यावर तुम्ही वेगळा विचार केला तरी देव तुम्हांस तेही प्रकट करील.

1 थेस्सलनीकाकरांस 5:21

पण हे देवाकडून आले आहेत याची परीक्षा करुन खात्री करुन घेण्याची सवय करा. जे चांगले ते धरुन ठेवा.

याकोब 3:2

मी तुम्हाला सावध करीत आहे, कारण आपण पुष्कळ पापे करतो आणि जर कोणी त्याच्या बोलण्यात चुका करीत नाही तर तो परिपूर्ण मनुष्य आहे.

Interlinear

Choose Theme